' KBC Vs शार्क टँक; स्पर्धकांची अब्रू वेशीवर टांगण्याचा नवा प्रकार...

KBC Vs शार्क टँक; स्पर्धकांची अब्रू वेशीवर टांगण्याचा नवा प्रकार…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या भारतात दोनच गोष्टींची जबरदस्त चर्चा होताना दिसतीये, एक म्हणजे अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा आणि दुसरी म्हणजे नवीनच सुरू झालेला शार्क टॅंक इंडिया हा रीयालिटि शो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

परदेशात हा शो प्रचंड लोकप्रिय आहे आणि नुकतंच त्यांनी या शोचं भारतीय व्हर्जन सोनी टेलिव्हिजनवर रिलीज झालं आहे. या कार्यक्रमाची कन्सेप्ट तशी भारतीयांसाठी नवीन आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आणि कमी कालावधीत यशस्वी झालेले काही entrepreneurs एकत्र येतात आणि होतकरू तरूणांच्या बिझनेस आयडियामध्ये पैसे गुंतवतात.

 

shark tank india IM

 

बघायला गेलं तर ही कन्सेप्ट तशी नवीन आहे. या शोमध्ये हे सगळे entrepreneurs तरूणांच्या स्टार्ट-अपच्या आयडिया समजून घेतात, आणि त्यांना जी कल्पना आवडते त्यात ते अमुक अमुक रक्कम गुंतवतात.

एकंदरच हा शो भारतात entrepreneurship ही संकल्पना रुजवण्यात यशस्वी ठरणार हे नक्की, कारण यातून अनेक तरूणांमध्ये स्वतःचा बिझनेस करायचा आत्मविश्वास मिळणार शिवाय आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांच्या बऱ्याच समस्यासुद्धा दूर होणार.

बोट कंपनीचा सर्वेसर्वा अमन गुप्ता, लेन्सकार्टचे सीईओ पेयूष बंसल, भारतपेचे कोफऊंडर अशनीर ग्रोवरपासून विनीता सिंग, नमिता थापरसारखे entrepreneurs यामध्ये जज म्हणून भूमिका बजावत आहेत.

 

judges IM

 

या सगळ्या तरूणांच्या आयडिया नीट ऐकून घेऊन, समजून घेऊन त्यावर त्यांना रीप्लाय देणं आणि एखादी आयडिया न पटल्यास त्यातली त्रुटि काय ते सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणं हे या जजेसचं काम आहे.

पण या शोमध्ये थोडंफार वेगळे आणि काही विचित्र अनुभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. या शोमधले काही जजेस हे काही स्पर्धकांशी उद्दामपणे बोलताना किंवा त्यांच्या आयडियावर कुत्सितपणे हसताना आपल्याला काही एपिसोडमध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे या शोच्या कन्सेप्टवरच प्रश्नचिन्हं उभं राहतंय.

‘भारतपे’चे कोफाऊंडर तर अत्यंत निर्विकार चेहेरा करून बसलेले असतात आणि कोणालाच सकारात्मक प्रतिक्रिया देत नाहीत असा काही प्रेक्षकांचा सुर सध्या ऐकायला मिळतोय. या शोमधल्या जजेसची स्पर्धकांपप्रती वर्तणूकसुद्धा चांगली नाही हे शोच्या काही एपिसोडमधून समोर आलेलं आहे.

 

ashneer grover IM

 

या शोमध्ये स्पर्धक स्वतःची स्वप्नं उराशी बाळगून येतात, ज्यांच्या आयडिया या जजेसना आवडत नाहीत ते त्यांना विचित्र पद्धतीने ते दर्शवून देतात ज्यामुळे त्या स्पर्धकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

एकंदरच रीयालिटि शोमध्ये हा सगळा प्रकार आपल्यासाठी काही नवीन नाही. इंडियन आयडल, रोडीजसारख्या शोमध्ये तर उघडपणे स्पर्धकांचा अपमान करताना आपण पाहिलेलं आहे, आजही त्या शोमधल्या बऱ्याच वेगवेगळ्या क्लिप्स आजही व्हायरल होत असतात.

 

reality shows IM`

 

शिवाय कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येसुद्धा कशाप्रकारे प्रेक्षकांची खिल्ली उडवली जाते, तेही आपण अनुभवलं आहे. किंबहुना प्रत्येक रीयालिटि शोमध्ये हा माल मसाला भरलेला असतोच.

या सगळ्या गोष्टींमुळे हे कार्यक्रम चांगलेच हीट होतात, बिग बॉससारखा कार्यक्रम केवळ या अशा गोष्टींमुळेच चर्चेत आहे.

सध्याच्या या रीयालिटि शोच्या गर्दीत एकमेव शो असा आहे ज्याने त्याची पातळी कधीच गाठली नाही. तो कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती. हा कार्यक्रमसुद्धा विदेशी शोची कॉपी, पण या कार्यक्रमाचं सादरीकरण आजही कित्येकांना भुरळ घालतं.

फिल्मी विश्वाचा शेहेनशाह खुद्द अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहेत तरी प्रत्येक स्पर्धकाशी त्यांची अदबीने आणि सन्मानाने संवाद साधायची पद्धत, आणि स्पर्धकाचं मन जिंकण्याची स्टाइल हे आपल्याला इतर कोणत्याही शोमध्ये पाहायला मिळणार नाही.

 

KBC IM

 

इतर कार्यक्रमात जो प्रकार सुरू असतो तो तुम्हाला कौन बनेगा करोडपतीमध्ये कधीच पाहायला मिळणार नाही, याबरोबरच स्पर्धकाच्या खिलाडू वृत्तीला किंवा त्यांच्या परिश्रमाला जी योग्य दाद KBC सारख्या शोजमधून मिळते त्याच प्रकारचं प्रोत्साहन शार्क इंडियासारख्या शोजकडून अपेक्षित आहे.

या सगळ्या रीयालिटि शोमध्ये आपल्याला जे काही बघायला मिळतं त्यात फारफार तर १०% वास्तव असतं, बाकी इतर गोष्टी या scripted असतात हे आपण जाणतोच, तरी या शोजपेक्षा KBC आजही लोकं आवडीने बघतात ते त्या शोमधल्या decency मुळे.

आज मास्टर शेफ असो किंवा शार्क टॅंक इंडिया हे शोज जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यामध्ये नियमितपणे होणारं स्पर्धकांचं खच्चीकरण आणि त्यांचा होणारा अपमान ही गोष्ट गंभीर आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?