' रक्तचंदन ते नदीत बाईक, सुपरहिट ‘पुष्पा’मधल्या “साऊथ स्टाइल्स”च्या ६ चूका! – InMarathi

रक्तचंदन ते नदीत बाईक, सुपरहिट ‘पुष्पा’मधल्या “साऊथ स्टाइल्स”च्या ६ चूका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पुष्पा’ सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. एखाद्या गुन्हेगार व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर इतका यशस्वी होऊ शकतो हे प्रेक्षकांच्या बदललेल्या मानसिकतेचं प्रतिक म्हणता येईल.

 

pushpa 1 im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नायक हा नेहमी सज्जन, सदाचारी, राजश्री प्रॉडक्शन मध्ये दिसायचा तसा ‘प्रेम’ सारखा असला पाहिजे ही अपेक्षा आता संपली आहे. वेबसिरीज मध्ये वेगवेगळ्या पात्रांना बघून नायकाबद्दलची प्रतिमा ही आज खूपच लवचिक झाली आहे असं म्हणता येईल. असो.

‘पुष्पा’ने प्रेक्षकांना थिएटरची वाट धरायला भाग पाडलं हे सत्य नाकारता येणार नाही. इतकंच नाही, तर ‘पुष्पा’ची ट्यून सुद्धा सध्या प्रत्येक कट्ट्यावर, ऑफिसमध्ये ऐकायला येते हेसुद्धा त्या पूर्ण टीमचं यश म्हणता येईल.

 

pushpa final inmarathi

 

दिग्दर्शन, पार्श्वसंगीत आणि सतत तिरपा उभा असलेला अल्लू अर्जुनचा अभिनय याच्या जोरावर आज हा साधारण कथा असलेला ‘पुष्पा’ मल्याळम, तेलगू, तामिळ, कन्नड आणि हिंदी या पाचही भाषेत बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडतोय आणि सिनेमातील चुकांकडे दुर्लक्ष करायला प्रेक्षकांना भाग पाडतोय हे नक्की.

‘अतिशयोक्ती’ हे दक्षिणेकडील सिनेमात असतेच हे सर्वश्रुत आहे. पण, ‘पुष्पा’ ने त्याचा सुद्धा विक्रम केला आहे. कसा ? ते जाणून घेऊयात:

१. ‘पुष्पा’चा जवळचा मित्र केशव हा त्याला त्याच्या प्रत्येक गुन्ह्यात साथ देत असतो. त्याची फक्त एक मर्यादा दाखवण्यात आली आहे की, त्याला मारुती व्हॅन चालवता येत नसते, त्याला गाडीचं दारही उघडता येत नाही असं दाखवण्यात आलं आहे.

 

car im

 

पण, तोच केशव सिनेमाच्या उत्तरार्धात मारुती व्हॅन चालवून ‘पुष्पा’ला घेऊन जातांना दाखवण्यात आला आहे. कधी शिकला तो गाडी चालवणं ?

२. एका सीनमध्ये पुष्पा हा पोलिसांपासून वाचून पळत असतो. त्याच्याकडे एक ट्रक असतो. तो त्या ट्रकला रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात सोडून देतो. त्याच रस्त्यावरून जेव्हा पोलीस गाडी चालवत पुष्पाला पकडण्यासाठी तिथे पोहोचतात तेव्हा त्यांना तो खड्डा दिसतही नाही.

 

pushpa im

 

पुष्पाला पकडण्यासाठी गाडीतून उतरल्यावर पोलिसांना त्या कच्च्या रस्त्यावर ट्रकच्या टायरचे मार्क्स सुद्धा पोलिसांना दिसत नाहीत हे मोठं आश्चर्य आहे. त्या ठिकाणी जर ‘मुंबई पोलीस’ असली असती तर त्यांनी अशी चूक केली नसती.

३. पाण्यात बाईक चालवणे हा एक ‘पुष्पा’ मधील सर्वात जास्त अतिशयोक्ती असलेला सीन म्हणता येईल. ज्या पाण्यात मोठे दगडं आहेत तिथे गाडी चालवणे आणि ती गोल फिरवणे हे सामान्य माणसाला तरी अशक्य आहे. विज्ञानाचा जरी अभ्यास केला आपण तरीसुद्धा गाडीचं इंजिन, चाकांमध्ये पाणी जाऊन गाडी बंद पडणे हे तर होऊच शकतं. तेसुद्धा इथे घडत नाही,

 

pushpa bike im

 

मग निदान ती बाईक कोणत्या कंपनीची आहे तरी निर्मात्यांनी प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. असे सीन आपण आधी सलमान खानच्या सिनेमात बघितले होते जिथे विज्ञानाला सुद्धा लाज वाटली असावी. अल्लू अर्जुनने सुद्धा तेच करून दाखवलं.

४. ‘पुष्पा’ सिनेमा अजून एका ठिकाणी आश्चर्यचकित करतो जेव्हा पोलिसांच्या भीतीने पुष्पा वर्षानुवर्षं जमा करून ठेवलेले रक्तचंदनाचे लाकूड पाण्यात सोडून देतो. पूर्ण सिनेमा ज्या थीमवर आधारित आहे त्यामध्येच एक ढोबळ चूक करण्यात आली आहे.

 

pushpa scene 1 im

 

चंदनाचं लाकूड हे पाण्यात बुडण्यासाठी ओळखलं जातं. पाण्यात जे बुडतं ते चंदनाचं लाकूड चांगलं असं एक प्रमाण देश विदेशात मानलं जातं. पुष्पा मध्ये मात्र तेच लाकूड छान पाण्यावर तरंगत जातांना दाखवलं आहे. सिनेमात दाखवलेलं चंदनाचं लाकूड हे फायबर आणि फोमने तयार करण्यात आलेलं आहे हे त्यांच्याकडे बघून लगेच कळतं. पण, सिनेमा बघतांना आपण हे विज्ञान साफ विसरून जातो.

खाली पडत असलेल्या लाकडांवरून पळत जाणं कसं शक्य आहे ? हा सुद्धा अनुत्तरित प्रश्नच आहे.

५. ‘पुष्पा’ मधील एका सीनमध्ये नायक हा ट्रकच्या बोनटवर उभा असलेला दाखवण्यात आला आहे. गाडी सुरू असतांना हा भाग इंजिनमधून येणाऱ्या गरम वाफेमुळे प्रचंड तापलेला असतो. तिथे उभं राहणं हे सामान्य माणसाला तरी शक्य नसतं. पण, पुष्पा हे कृत्य अगदी सहज करून दाखवतो.

 

allu arjun im

 

अजून एक आश्चर्य म्हणजे या सीनमध्ये ट्रक सुरू असतो. पण, ट्रक कोण चालवतोय ? हे मायबाप प्रेक्षकांना दाखवण्यात सुद्धा आलेलं नाहीये.

६. ‘पुष्पा’ जेव्हा नायिकेला गुंडांपासून वाचवतो तेव्हा मध्यरात्री झालेली असते. पुष्पा तिला घरी सोडायला जातो, तेव्हा नायिकेची आई पुष्पाला एक टिफिन आणून देते. हा टिफिन ते घरी येण्याच्या आधीच कसा तयार होता ? शिवाय, ज्या स्त्रीचा नवरा आणि मुलगी गुंडांच्या कैदेत आहे ती निवांत घरी स्वयंपाक कशी करू शकते ? हा एक प्रश्नच आहे. एकवेळ झोमॅटोचं पार्सल आलेलं बघतांना पटलं असतं.

‘पुष्पा’ मधील वरील लॉजिकल चुकांव्यतिरिक्त कथा सादरीकरणात सुद्धा काही चुका आहेत. जसं की, पोस्टरवर दाखवलेली भलीमोठी स्टारकास्ट ही सिनेमा बघतांना दिसतच नाही किंवा सगळे एकसारखेच दिसतात. लक्षात राहतो तो फक्त आणि फक्त पुष्पा.

 

pushpa featured IM

 

शिवाय, फहाद फाझील या पोलीस अधिकाऱ्याचं पात्र पहिल्या भागातच दाखवून निर्मात्यांनी दुसऱ्या भागात काय असेल ? हे एकाप्रकारे आधीच सांगितलं आहे. त्याला जर फक्त दाखवलं असतं तर पुढच्या भागाची उत्सुकता अजून ताणली गेली असती. भाग २ तयार करण्याची कल्पना निर्मात्यांना शुटिंग सुरू असतांना आली असावी हे सुद्धा सिनेमा बघतांना लगेच लक्षात येतं.

डोकं घरी ठेवून सिनेमा बघायला जाऊ शकलो तर मात्र या चुका विसरून आपण ‘पुष्पा’ खूप एन्जॉय करू शकतो हे ही तितकंच खरं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?