' कसाब ते संजय गांधी – भारतात खळबळ माजविणाऱ्या ८ अजब ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ – InMarathi

कसाब ते संजय गांधी – भारतात खळबळ माजविणाऱ्या ८ अजब ‘कॉन्स्पिरसी थिअरी’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींबाबत नेहमीच काही ना काही समज -गैरसमज परसलेले असतात.

ती व्यक्ती हयात असेल तर आपल्याबद्दलचे गैरसमज खोडून काढते, परंतु हयातीत नसलेल्या व्यक्तींबद्दल असलेले गैरसमज किंवा त्यांच्या मृत्युबद्दलचे गैरसमज खोडून काढणे कठीण असते.

आपल्या सर्वांनाच खळबळजनक गोष्टींचे थोडेबहुत आकर्षण असते.

अभ्यासकांच्या मते जगात तीन प्रकारच्या कॉन्स्पिरसी थिअरीजबद्दल बोलले जाते. हे तीन प्रकार म्हणजे एखाद्याचा अचानक झालेला मृत्यू, बुडालेला व्यवसाय आणि व्यक्ती, विमाने आणि जहाजे अचानकपणे गायब होणे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतातही अश्याच काही खळबळजनक कॉन्स्पिरसी थिअरीज सांगितल्या जातात.

१. महात्मा गांधी ह्यांचा भगतसिंग ह्यांच्या फाशीमध्ये हात होता?

भगतसिंग ह्यांना शहीद ए- आझम असे म्हटले जाते. भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला होता.

 

bhagat singh marathipizza

 

ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे त्यांचे ध्येय होते. अहिंसात्मक पद्धतीने लढा देऊन नव्हे तर सशस्त्र क्रांती करूनच भारताला स्वातंत्र्य मिळू शकेल असे त्यांचे मत होते.

भगतसिंग ह्यांचे नाव आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. त्यांनी नौजवान भारत सभा, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ह्या संघटनांमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य लढा दिला.

त्यांनी व बटुकेश्वर दत्त ह्यांनी संसदेत बॉम्ब फोडल्याच्या आरोपावरून तसेच त्यांनी व शिवराम राजगुरू ह्यांनी जॉन सॉंडर्स ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केल्यावरून त्यांना, शिवराम राजगुरू व सुखदेव (थापर) ह्यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरमध्ये फाशी देण्यात आली.

त्यांची फाशी रद्द व्हावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. महात्मा गांधी ह्यांनाही अनेकांनी विनंती केली ब्रिटिश सरकारशी चर्चा करून भगतसिंग, राजगुरू व सुखदेव ह्यांची फाशी रद्द करण्यात यावी.

असे म्हणतात की महात्मा गांधी ती फाशी रद्द करू शकत होते. परंतु महात्मा गांधी हे अहिंसेचे उपासक असल्याने भगतसिंग ह्यांची सशस्त्र क्रांती त्यांना मान्य नव्हती.

महात्मा गांधींचा शब्द हा देशातील लाखो लोकांसाठी अंतिम शब्द होता. ही फाशी रद्द करून कदाचित देशातील जनतेला अहिंसा सोडून सशस्त्र क्रांतीचा संदेश गेला असता. म्हणूनच त्यांनी ही फाशी रद्द केली नाही असे म्हणतात.

 

 

ह्याबाबतीत दुसरी थेअरी अशी सांगितली जाते की भगतसिंग ह्यांचा सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनेक लोकांना खुणावू लागला होता. ते देशातील जनतेमध्ये दिवसेंदिवस जास्त लोकप्रिय होत चालले होते.

महात्मा गांधींना हे स्वतःच्या लोकप्रियतेवर आलेले संकट वाटले. म्हणूनच त्यांनी भगतसिंग ह्यांच्या अटकेला व फाशीला विरोध केला नाही.

गांधीजींनी ठरवले असते तर ते भगतसिंग ह्यांच्याबरोबर राजगुरू आणि सुखदेव ह्यांचीही फाशी रद्द करू शकत होते. पण असे झाले नाही.

ह्या तिघा क्रांतीकारकांना फाशी दिल्यानंतर त्यांची पार्थिव शरीरे सुद्धा त्यांच्या कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आली नाही उलट रात्रीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून टाकण्यात आले होते.

खरे खोटे काय घडले ते ठाऊक नाही. पण महात्मा गांधींवर भगतसिंगांच्या बाबतीत आजही असा आरोप केला जातो.

२. भारतावर आजही ब्रिटिशांचे राज्य आहे?

भारताचे स्वातंत्र्य म्हणजे एकच घटना नसून अनेक लहान मोठ्या घटनांची मालिका आहे. १९४७ साली अखेर ट्रान्सफर ऑफ पावर ऍग्रिमेंटद्वारे आपल्या देशाचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.

ह्या थियरीच्या अनुसार स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारत अजूनही कॉमनवेल्थ देश असून जगातील सगळे कॉमनवेल्थ देश हे व्हिक्टोरिया राणीचीच कॉलनी (वसाहत) समजली जाते.

ह्या देशांत (कॉलोनीजमध्ये) जाण्यासाठी ब्रिटिश राणीला पासपोर्ट आणि व्हिजासुद्धा लागत नाही. म्हणूनच ही थियरी अस्तित्वात आली असे म्हणतात.

 

queen victoria and abdul-inmarathi04

 

ब्रिटिश राणी असंख्य वेळा भारतात येऊन गेल्या आणि जेव्हा १९९७ साली त्या परत भारतात आल्या तेव्हा आणखी एक थियरी सांगितली जाऊ लागली की’

आपले राष्ट्रगीत “जन गण मन” हे मुळात राणीच्या सन्मानार्थ लिहिले गेले होते.

आता ही थियरी खरी की खोटी ते माहिती नाही पण खळबळजनक नक्कीच आहे.

३. विमानाचा शोध कुणी लावला? राईट बंधू की शिवकर बापूजी तळपदे?

असे म्हणतात की राईट बंधूंनी यशस्वीपणे पहिल्यांदा विमान उडवण्याच्या आठ वर्ष आधीच शिवकर बापूजी तळपदे ह्या भारतीय शास्त्रज्ञाने विमानाचा शोध लावला होता.

शिवकर बापूजी तळपदे हे भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी अनेक वर्ष अभ्यास करून विमानाचे डिझाईन तयार केले. त्यांच्या ह्या शोधासाठी त्यांना बडोद्याच्या महाराजांचे आर्थिक सहकार्य लाभले.

तळपदे ह्यांचे विमान जमिनीपासून १५०० फूट उंचीवर यशस्वीपणे उडू शकत होते. पण जेव्हा बडोद्याच्या महाराजांना ब्रिटिश सरकार कडून धमक्या मिळाल्या तेव्हा त्यांना त्यांची आर्थिक मदत थांबवावी लागली.

हे सगळे १८९५ साली घडले, म्हणजेच राईट बंधूंच्या शोधाच्या आठ वर्ष आधी!

 

Shivkar_Bapuji_Talpade-inmarathi

 

तळपदे ह्यांच्या आयुष्यावर आयुष्यमान खुराणाचा “हवाईझादा” हा चित्रपट सुद्धा आला होता.

विमान ह्या विषयावर आपल्याकडे सुरुवातीपासूनच वाद आहेत. आपल्या वेदांत व पुराणांत सुद्धा विमानांचा उल्लेख आलेला आहे. वेदांमध्ये अनेक विषयांचे ज्ञान आहे.तत्वज्ञानापासून तर आयुष्यातील समस्यांचे व्यावहारिक उत्तर हे सगळे वेदांत दिले आहे असे म्हणतात.

ह्या थियरीप्रमाणे दोन प्रकारची विमाने असतात. एक म्हणजे आपल्या आजच्या विमानांसारखी विमाने तर दुसरी विमाने ही यूएफओ सारखी आहेत.

पण प्रश्न असा आहे की प्राचीन भारतीय संस्कृतीसह इतर प्राचीन संस्कृतींमध्येही विमानाचा उल्लेख किंवा त्याचे चित्र कोरलेले आढळले आहे.

४. लालबहादूर शास्त्रींचा खून झाला होता?

स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचे अनुयायी होते. पंडित नेहरूंनंतर तेच पंतप्रधान झाले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. पण त्यांचा मृत्यू हे आजही न उकललेले एक गूढ आहे.

ताश्कंद येथे गेले असताना त्यांचा हृदयविकाराने अकस्मात मृत्यू झाल्याचे सगळीकडे सांगण्यात आले.पण अनेकांना असा आजही दाट संशय येतो की त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांना कुणीतरी राजकीय हेतूने विषप्रयोग करून ठार मारले.

भारताचे पंतप्रधान असून आणि परदेशात असताना अचानक मृत्यू झाला असून देखील त्यांच्या पार्थिव शरीराचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले नाही.

तसेच शास्त्रीजींच्या मुलाने अधिकाऱ्यांना त्यांच्या शरीरावर काही ठिकाणी दिसत असलेल्या निळ्या रंगांच्या डागांविषयी तसेच त्यांच्या पोटावर असलेल्या कापल्याच्या व्रणांबाबत विचारले.

 

lal-bahadur-shastri-marathipizza

 

शास्त्रीजींचे पोटाचे कुठलेही ऑपरेशन झाले नसतानाही त्यांच्या पोटावर असे व्रण कसे आले? तसेच त्या निळ्या डागांचे काय? हे आजही अनुत्तरीत आहे.

ग्रेगरी डग्लस हे एक पत्रकार होते. त्यांनी सीआयए ऑपरेटिव्ह रॉबर्ट क्रॉली यांच्याबरोबर झालेल्या एका मुलाखतीत हे स्पष्ट केले होते की डॉक्टर होमी भाभा व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांच्या मृत्यूमागे सीआयएचा हात होता.

५. डॉक्टर होमी जहांगीर भाभा ह्यांच्या मृत्यूमागे कुणाचा हात होता?

भारताच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमचे जनक डॉक्टर होमी भाभा हे भारतातील व जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्यांपैकी एक न्यूक्लिअर फिजिसिस्ट (परमाणु भौतिकशास्त्रज्ञ) होते.

१९६६ साली फ्रांस मधील मॉँट ब्लॅक येथे झालेल्या एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. एका थियरीनुसार अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने रचलेले हे षडयंत्र होते.

भारताची आण्विक प्रगती रोखण्यासाठी आणि हानी करण्यासाठी सीआयएने योजना आखून डॉक्टर होमी भाभा ह्यांना ठार केले.

 

homibhabha-inmarathi

 

हे विमान चालवणारे हे भारताच्या सर्वोत्तम वैमानिकांपैकी एक वैमानिक होते आणि रेडियोवरील संभाषणानुसार विमान अगदी उत्तम स्थितीत होते.

हे विमान लगेज कंपार्टमेंट मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे कोसळले असे सांगण्यात येते. ह्या षड्यंत्रात /अपघातात डॉक्टर होमी भाभा व इतर ११६ जणांचे प्राण गेले.

६. संजय गांधींच्या हत्येत त्यांच्याच आईचा हात होता?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचा मुलगा संजय गांधी ह्यांचाही मृत्यू गूढ परिस्थितीत झाला.

असे म्हणतात की इंदिरा गांधी ह्या अत्यंत प्रभावी राजकारणी होत्या आणि आपले पद सुरक्षित ठेवण्यासाठी, सत्ता राखण्यासाठी त्या काहीही करू शकत होत्या.

त्यांचे पुत्र संजय गांधी हे स्वत: उत्तम पायलट होते. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की त्यांचा मृत्यू चक्क एका विमान अपघातात झाला.

असे म्हणतात की संजय गांधी ह्यांची लोकप्रियता वाढत चालली होती. त्यांच्या कृत्यामुळे त्यांच्या आईच्याच सत्तेला धोका निर्माण होत होता आणि ते स्वत:च्याच आईला ब्लॅकमेल करत होते.

 

sanjay-gandhi-inmarathi

म्हणूनच खुद्द त्यांच्या आईनेच त्यांचा काटा काढण्यासाठी ह्या विमान अपघाताची योजना आखली. हे खरे की खोटे हे आजही स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा – फाशीची शिक्षा दिल्यानंतर जज साहेब पेनाची निब का तोडतात?

पण इंदिरा गांधी ह्यांची राजकारण करण्याची हातोटी बघता आणि त्यांच्या हातात असलेली सत्ता बघता हे शक्य असल्याचे अनेकांचे मत आहे.

७. नेताजी सुभाषचंद्र बोस खरंच “त्या” अपघातात गेले का?

आपल्या देशातील सशस्त्र क्रांतिकारकांपैकी एक असलेले, आझाद हिंद सेनेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस हे इंडियन नॅशनल काँग्रेसमधील प्रमुख नेते होते.

त्यांचा मृत्यू हा आजही वादाचा विषय आहे. आजही अनेकांना वाटते की त्या तथाकथित अपघातात त्यांचा मृत्यू झाला नाही.

कारण ज्या प्रकारे हा अपघात झाला त्यावरून असाच संशय येतो की हे नेताजींविरुद्ध रचलेले एक षडयंत्र होते.

१९४५ नेताजी टोकियोला जात होते, ह्या प्रवासादरम्यानच त्यांचे विमान कोसळले. असे म्हणतात की ह्या अपघातातच जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

पण इतका मोठा अपघात होऊन सुद्धा ना त्यांचे पार्थिव शरीर सापडले ना त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र सापडले.

अनेक लोक असेही म्हणतात की नेताजींनी स्वत:च ह्या अपघाताची योजना रचली व त्यानंतर ते भूमिगत झाले. असे ते आधीही भूमिगत झाले होते.

 

netaji-subhas-chandra-bose-inmarathi

 

एक थियरी अशीही आहे की अपघातानंतर एका वर्षाने नेताजी त्यांच्या अंगरक्षकाला भेटले होते. त्यानंतर ते फैझाबादला गेले व तिथे त्यांना लोक गुमनामी बाबा म्हणून ओळखत.

गुमनामी बाबा नेताजींसारखेच दिसत असत. त्यांचा मृत्यू १९८५ साली झाला.

८. अजमल कसाबला खरंच फाशी दिली का?

कुप्रसिद्ध पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व त्याच्या सहकाऱ्यांनी २६/११/२००८ रोजी मुंबईमध्ये अतिशय भयानक दहशतादी हल्ला केला.

ह्या हल्ल्यात मुंबईकर व अख्ख्या जगाने मृत्यूचे तांडव व ह्या दहशतवाद्यांच्या क्रूरतेची परिसीमा डोळ्यांदेखत बघितली.

ह्या हल्ल्यात अनेकांनी प्राण गमावले, अनेक शूर सैनिक हुतात्मा झाले. पण भारताच्या शूर सुपुत्राने, म्हणजेच तुकाराम ओंबळेंनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले.

त्याच्यावर अनेक दिवस केस चालली आणि अचानक २१ नोव्हेंबर २०१२ला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्याला फाशी दिल्याचे जाहीर करण्यात आले.

अनेकांना हे खरे वाटले नाही कारण त्याच्या मृत्यूचा कुठलाच पुरावा जाहीर करण्यात आला नाही. तसेच संसदेवरील हल्ल्याचा आरोपी अफझल गुरूच्या आधी अजमल कसाबला का फाशी दिली हा प्रश्न अनेकांना पडला.

 

kasab-mumbai-terror-attach-marathipizza

 

असे म्हणतात की येरवडा जेलच्या सुपरिटेन्डन्टला कसाबची खरी ओळख तेव्हाच कळली जेव्हा कसाब डेंग्यूने आजारी पडला.

असे म्हणतात की कसाब खरे तर डेंग्युनेच मरण पावला. आणि घाईघाईत त्याचे शरीर दफन करण्यात आले आणि सगळीकडे बातमी पसरवली की प्रचंड गुप्तता ठेवून कसाबला फाशी देण्यात आले.

तर ह्या कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत ज्यांच्याविषयी सगळे बोलतात पण नेमके सत्य काय आहे हे अजूनही गूढ आहे.

हे ही वाचा – सम्राट अशोकाचं गुपित – जगाच्या रक्षणासाठी आजही कार्यरत आहेत ९ जण!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?