' विराट कोहली पितो ‘काळं पाणी’; सातासमुद्रापलीकडून येणाऱ्या पाण्यात काय आहे खास? – InMarathi

विराट कोहली पितो ‘काळं पाणी’; सातासमुद्रापलीकडून येणाऱ्या पाण्यात काय आहे खास?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सेलिब्रिटीजपासून सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाचाच हल्ली आपल्या परीने स्वतःला फीट ठेवण्याचा प्रयत्न असतो. जिमपासून योगापर्यंत सगळ्या प्रकारचे व्यायाम करून सेलिब्रिटीज आणि सामान्य माणसं स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात.

जितका व्यायाम महत्त्वाचा तितकंच डाएटही महत्त्वाचं. या सगळ्याच गोष्टी सेलिब्रिटीज आणि सामान्य माणसं दोघांनाही लागू होत असल्या तरी सेलिब्रिटीजच्या बाबतीत त्यांच्या महागड्या जिम्स, त्यांचे डाएट्स यांच्या चर्चा कमालीच्या रंगतात. सामान्य माणूस तब्येतीला घेऊन कितीही जागरूक असला तरी या सगळ्या गोष्टींवर खर्च करण्यापूर्वी तो आधी आपला खिसा चाचपतो. आपल्याला परवडेल त्यानुसारच हे सगळे पर्याय वापरतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सेलिब्रिटीजच्या बाबतीत मात्र तसं नसतं. त्यांच्या जिमवर, डाएटवर सेलिब्रिटीज पाण्यासारखा पैसा ओतताना दिसतात, पण अजूनही पाण्यासारख्या काही अत्यंत मूलभूत गोष्टी सामान्य माणूस आणि सेलिब्रिटीज या दोघांच्याही बाबतीत सारख्याच होता. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही.

एक महागडं पाणी सेलिब्रिटीज हल्ली ‘फ्लॉन्ट’ करताना दिसतात. हे ‘ब्लॅक वॉटर’ असून भारतीय क्रिकेटमधला फिट अँड फाईन खेळाडू विराट कोहलीच्या हातातही हे ‘काळं पाणी’ दिसलं होतं. सेलिब्रिटीज पासून जगभरातले मोठमोठे खेळाडू हे ‘ब्लॅक वॉटर’ पितात. या ‘ब्लॅक वॉटर’ मुळे सोशल मीडियावर चर्चेला चांगलंच उधाण आलं.

विराट कोहली पीत असलेलं हे ‘ब्लॅक वॉटर’ नेमकं आहे तरी काय? जाणून घेऊयात त्याविषयी सर्वकाही.

 

virat kohli im

 

विराट कोहली आणि काही इतर सेलेब्स पीत असलेलं हे ‘ब्लॅक वॉटर’ वैद्य आणि आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार एक विशेष पाणी समजलं जातं. यात फ्यूलविक ऍसिड, काही इतर खनिज तत्त्वं आणि जीवनसत्त्वंही असतात. या पाण्याला ‘हेल्थ ड्रिंक’, ‘नॅच्युरल अल्कलाईन ड्रिंक’, ‘फ्युलवीक ड्रिंक’ आणि ‘स्पोर्ट्स ड्रिंक’ असंही म्हटलं जातं.

यामध्ये अल्कलाईनची पातळी बरीच जास्त असते. या पाण्यामुळे आपल्याला हायड्रेटेड राहायला मदत होते. या पाण्यातली ‘पीएच’ पातळी आपण जे पाणी पितो त्यापेक्षा जास्त असते. आपण जे पाणी पितो त्यातली ‘पीएच’ पातळी साधारण ६.५ ते ७.५ इतकी असते. साध्या पाण्यातली ही पातळी हवामान, पाणी कुठून आलेलं आहे, पाण्यातले जंतू मारण्यासाठी ते फिल्टर केलं गेलेलं आहे की नाही अश्या बऱ्याच गोष्टींमुळे खालीवर होत असते.

‘ब्लॅक वॉटर’ मधली ही ‘पीएच’ पातळी मात्र ७.५ पेक्षा जास्त असते. ‘ब्लॅक वॉटर’ हे अतिशय शुद्ध पाणी असल्याचं समजलं जातं. ‘पीएच’ पातळी जास्त असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी हे पाणी चांगलं असतं. रोगप्रतिकारक क्षमतेसाठी आणि आपल्या एकूणच शारीरिक स्वास्थ्यासाठीही ते फायदेशीर ठरतं.

 

black water im

 

ही ‘पीएच’ पातळी ७.५ पेक्षा जास्त असल्यामुळे आपलं औषधांवर अवलंबून राहण्याचं प्रमाणही कमी होतं. या पाण्याचे नाना फायदे आहेत. या पाण्यामुळे आपलं वजन आटोक्यात राहायला मदत होते. हे पाणी नैराश्याशी सामना करायलाही उपयुक्त ठरतं.

ज्यांना ज्यांना उच्च रक्तदाबाचा, मधुमेहाचा त्रास असतो, ज्यांच्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं त्यांनाही हे पाणी प्यायल्यामुळे फायदा होता. या पाण्यातले मॉलेक्यूल्स फार लहान असतात त्यामुळे शरीरातल्या पेशींना ते अगदी सहज शोषून घेता येतात. आपल्या शरीराला पुरवली गेलेली पोषकमूल्येसुद्धा या ‘ब्लॅक वॉटर’ च्या सेवनाने फार पटकन शरीरात कायम ठेवली जातात.

असं सगळं असलं तरी या पाण्याची किंमत जर तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला घाम फुटेल. आपल्याला आपलं १ लिटर साधं पाणी सहसा २० ते ३० रुपयांत मिळतं, पण या ‘ब्लॅक वॉटर’ची किंमत शेकड्यांच्याही नाही तर हजारांच्या घरात आहे.

 

black water im1

 

या १ लिटर ‘ब्लॅक वॉटर’ची किंमत जवळपास ३,००० ते ४,००० रुपये इतकी आहे. आपण जर हे ऑनलाईन खरेदी केलं तर ते कमी दरातही आपल्याकरता उपलब्ध आहे.  काही काही ई- कॉमर्स साईट्सवरून या ‘ब्लॅक वॉटर’ची अर्धा लिटरची बाटली ९० रुपयांतही मिळत असल्याचं आढळून आलंय.

विराट कोहलीला २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाठीचं गंभीर दुखणं उद्भवलं होतं. त्यावेळी त्याने पूर्ण शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. मागे वळून बघताना आपल्या या निर्णयाविषयी विराट खुश आहे. आपण हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता अशी खंतही तो व्यक्त करतो. यापूर्वी एकदा पॅपराझ्झीने हातात ‘ब्लॅक वॉटर’ची बाटली धरलेल्या अभिनेत्री मलायका अरोराला कॅमेऱ्यात कैद केले होते.

 

malaika im

फिटनेससाठी म्हणून का असेना, पाण्यासारखी जीवनावश्यक गोष्टही बड्या मंडळींसाठी आता वेगळी असणार आहे तर!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?