' हार पत्करून थेट राष्ट्रप्रमुख पदी झेप घेणाऱ्या आधुनिक “द्रौपदी”ची कहाणी बरंच काही शिकवून जाते – InMarathi

हार पत्करून थेट राष्ट्रप्रमुख पदी झेप घेणाऱ्या आधुनिक “द्रौपदी”ची कहाणी बरंच काही शिकवून जाते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात सध्या राष्ट्रपती निवडणुकीचे वेध लागले आहेत. भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून कोण विराजमान होणार याच्या नाक्या नाक्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार, मोहम्मद आरीफ खान, सुमित्रा महाजन  यांची नावं या शर्यतीमध्ये आघाडीवर होती. पण यांच्यासोबत अजून एक नाव आहे, ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ते नाव म्हणजे- द्रौपदी मुर्मू!

एक आदिवासी महिला, ज्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यांचा आजवरचा प्रवास इतका प्रेरणादायी आहे की तो प्रत्येक भारतीयाला आणि खासकरून महिलेला ठावूक असला पाहिजे, चला तर जाणून घेऊया ह्या अज्ञात व्यक्तिमत्त्वाबद्दल!

Draupadi Murmu-marathipizza01
sundayguardianlive.com

ओडीसा राज्यातील मयूरभंग जिल्ह्यामध्ये उपरबेडा हे आदिवासी गाव आहे, या गावातील छोट्याश्या आदिवासी कुटुंबातून द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास सुरु झाला. १९९७ मध्ये त्यांनी राजकारणामध्ये पाउल ठेवले आणी तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी जी घौडदौड सुरु ठेवली आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्या शिक्षकी पेशात कार्यरत होत्या.

१९९७ साली राजकारणात उतरल्यावर त्याच वर्षी त्यांच्यातील राजकीय गुण पाहून भारतीय जनता पक्षाने त्यांना ओडीसा आदिवासी मोर्चाचे उपाध्यक्ष केले.

Draupadi Murmu-marathipizza02
rajnathsingh.in

ओडीसा मधील पटनायक सरकारच्या कार्यकाळात (२०००-२००४) त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. पुढील दोन वर्षामध्ये त्यांनी ओडीसाच्या राजकारणामध्ये स्वत:चे वेगळे वर्चस्व निर्माण केले. २००७ साली ओडीसामधील सर्वोत्तम आमदार म्हणून ओडीसा विधानसभेतर्फे त्यांना प्रतिष्ठीत अश्या नीलकांता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांना हे सारे यश सहज मिळाले असे नाही, त्यासाठी आयुष्यातील प्रत्येक संकटाशी त्यांनी निकराने लढा दिला. आपल्या पती आणि दोन मुलांना गमावून देखील त्यांनी हार मानली नाही, सारे दु:ख विसरून त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि स्वत:ला सिद्ध केले.

२०१५ साली वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी इतिहास घडवला, कारण त्या वर्षी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.

Draupadi Murmu-marathipizza03
indianexpress.com

तब्बल २० वर्षांच्या दांडग्या अनुभवासह त्यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे दिसून येते, आज त्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी चेहरा म्हणून ओळखल्या जातात.

त्यांच्या कौतुकास्पद आणि कार्यक्षम कारकिर्दीमुळेच राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. जर भारतीय जनता पक्षाने पुढील राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केली तर भारतीय जनता पक्षाची ती एक स्मार्ट खेळी मानली जाईल, यामुळे त्यांची अदिवासी विकास विरोधी प्रतिमा तर पुसली जाईलच, पण सोबतच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आदिवासी समाजाची भरघोस मतं देखील त्यांच्या पदरात पडतील. याच गोष्टींमुळे की काय पण नरेंद्र मोदी यांनी देखील द्रौपदी मुर्मू यांनाच राष्ट्रपतीपदासाठी पदासाठी पसंती दिली आहे.

Draupadi Murmu-marathipizza04
thequint.com

जर द्रौपदी मुर्मू या भारताच्या १४ व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्या तर ती नक्कीच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असेल. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?