' IIT चे शोधकार्य, हिमालयात सापडलीये कोरोनाचा नायनाट करणारी ‘संजीवनी’ – InMarathi

IIT चे शोधकार्य, हिमालयात सापडलीये कोरोनाचा नायनाट करणारी ‘संजीवनी’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सध्या चांगलाच उच्छाद मांडला आहे. दोन डोस घेतल्यानंतरही या नव्या ‘ओमायक्रॉन’च्या जाळ्यात अडकणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. कोरोनाच्या उपचार पद्धतीसाठी आपल्या भारतीय ‘आयुर्वेद’ उपचार पद्धतीचा वापर करणारे लोक फार कमी होते, पण ज्यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर केला त्यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढली आणि त्यांनी कोरोनावर मात केली असे कित्येक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत.

आयुर्वेद पद्धतीने उपचार करण्यात केवळ एक फरक आहे की, “गोळी घ्या आणि बरे व्हा” इतकी ती पद्धत ‘झटपट’ नसते. रोगाचं योग्य निदान आणि समूळ नाश करण्यास आयुर्वेदिक पद्धतीला थोडा जास्त वेळ लागतो असाच आजवरचा अनुभव आहे, पण नुकतंच आयआयटी मंडीने हिमालयातील एका अशा वनस्पतीचा शोध लावला आहे ज्यामध्ये ‘फ्यटो’ हे रसायन आहे, ज्याचा लेप शरीराला लावल्याने कोरोना समूळ नष्ट होतो असा दावा आयआयटी मंडीने केला आहे.

 

buransh inmarathi

 

हा दावा खरा ठरला तर रामायणात जसं हनुमानाने बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणवर उपचार करण्यासाठी हिमालयातील सुमेरू पर्वत उचलून आणला होता त्याची आठवण लॉकडाऊन मध्ये रामायण बघितलेल्या सर्वांना नक्की होईल. कोणती आहे ही वनस्पती? त्याचा कोणी शोध लावला आणि काय आहे ही उपचार पद्धती? जाणून घेऊयात.

डॉक्टर शामकुमार मसकपल्ली जे की आयआयटी मंडीच्या ‘बायोक्स सेंटर’ म्हणजेच स्कुल ऑफ बेसिक सायन्सचे असोसिएट प्रोफेसर आहेत त्यांनी हिमालयातील या अनमोल वनस्पतीचा शोध लावला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे की, “जागतिक आरोग्य संस्थेने मान्य केलेल्या उपचारांसोबतच जर हिमालयातील वनस्पतींच्या ‘फ्यटो’ रसायनाचा शरीरावर वापर केला, तर रोग प्रतिकारक शक्ती कित्येक पटीने वाढते आणि त्याचे कोणतेही ‘साईड इफेक्ट’ शरीरावर होत नाहीत. हिमालयात सापडणाऱ्या या वनस्पतीचं नाव ‘बुरांश’ हे आहे. या वनस्पतीचं शास्त्रीय नाव हे ‘ऱ्होडोडेंड्रॉन अर्बोरियम’ हे आहे. या वनस्पतीचा वापर त्या भागात राहणारी जनता ही मोठ्या प्रमाणावर करत असते आणि कित्येक रोगांवर मात करत असते.”

आयआयटी मंडी यांनी या संशोधनात दिल्लीच्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग’ या संस्थेची सुद्धा मदत घेतली होती. हिमालयातील वनस्पतींमधील ‘फ्यटो’ रसायनांचं प्रमाण तपासणे आणि त्याचा उपयोग संसर्गजन्य जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी कसा करावा? या उद्देशाने हे संशोधन सुरू करण्यात आलं होतं.

 

buransh inmarathi1

 

‘बुरांश’ या वनस्पतीच्या पानांमध्ये संशोधकांना ‘फ्यटो’ रसायनाचं सर्वाधिक प्रमाण आढळून आलं. “हिमालयात आढळणाऱ्या वनस्पतीमधील रासायनिक द्रव्यांचा वापर केल्यास कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सुद्धा आपलं शरीर सक्षम होऊ शकतं” असं प्रतिपादन दिल्लीच्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग’ मधील डॉक्टर रंजन नंदा यांनी सुद्धा केलं आहे.

‘बुरांश’ वनस्पतीवर झालेल्या संशोधनाची माहिती नुकतीच ‘बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स’ या पत्रकात प्रकाशित करण्यात आली होती. ‘बुरांश’ वनस्पतीची पानं जर गरम पाण्यात टाकली, तर त्यातून ‘क्यूनिक ऍसिड’ हे रसायन सुद्धा उपलब्ध होतं ज्यामुळे कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी दोन फायदे होत असतात.

१. ‘प्रोटिस’ या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या द्रव्याची शरीरात निर्मिती करणे.
२. ‘अँजिओस्टीन’ या द्रव्याची शरीरात निर्मिती करणे ज्यामुळे व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखता येईल.

 

buransh inmarathi2

 

‘बुरांश’ वनस्पतीच्या पानातून काढलेल्या रसाचा परिणाम बघण्यासाठी आफ्रिकन माकडांवर प्रयोग देखील करण्यात आला आहे. माकडांच्या किडनीमध्ये आढळणाऱ्या ‘वेरो’ पेशींवर हा प्रयोग करण्यात आला होता, ज्यामुळे त्या पेशींना कोणतीही इजा पोहोचली नव्हती.

‘ऱ्होडोडेंड्रॉन अर्बोरियम’ या वनस्पतीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे आणि लवकरच कोरोना बाधित व्यक्तींच्या उपचारासाठी त्याचा वापर करण्यासाठी त्याचा वापर सुरू करण्याचा संबंधित शास्त्रज्ञांचा मानस आहे.

बुरांश वनस्पती मधील नेमके कोणते गुणधर्म कोविड-१९ या विषाणूला मारक आहेत याचं उत्तर येत्या काळात विज्ञान जगताला देण्याचं लक्ष्य आयआयटी मंडी यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे.

कोरोना किंवा तत्सम सर्व आजारांना हरवण्यात जर ही ‘बुरांश’ ही वनस्पती संजीवनी बुटी ठरली तर हा आयुर्वेद आणि पर्यायाने भारताचं मोठं यश असेल. डॉक्टर मसकपल्ली आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या संशोधनामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?