' दीपिकाचा 'गेहराइयां' सिनेमा म्हणजे भोजपुरी अश्लील सिनेमांची टुकार नक्कल!

दीपिकाचा ‘गेहराइयां’ सिनेमा म्हणजे भोजपुरी अश्लील सिनेमांची टुकार नक्कल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साली बडी सतावेली, जींस वाली भौजी या अशा बी किंवा सी ग्रेड भोजपुरी सिनेमांचं polished व्हर्जन म्हणजे दीपिका पदुकोणचा आगामी सिनेमा गेहराइयां!

 

gehraiyaan IM

 

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून पुढील महिन्यात हा सिनेमा amazon prime या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, या सिनेमातल्या बोल्ड सीन्सविषयी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

साधारणपणे वहिनी भाऊजी, साली आणि जिजाजी यांच्या नात्यावर “तसल्या” सिनेमात जे काही दाखवलं जातं तेच सगळं या अशा बड्या बॅनरच्या सिनेमातसुद्धा दाखवलं जातं!

फरक फक्त इतकाच की या मोठ्या सिनेमात बक्कळ पैसा लावलेला असतो, मोठमोठ्या स्टार्सचे चेहेरे आपल्याला दिसतात, महागडी लोकेशन्स आणि काहीतरी गंभीर मुद्दा मांडण्याचा आविर्भाव आपल्याला या गेहराइयां सारख्या सिनेमात बघायला मिळतो. बाकी स्टोरी कॉन्सेप्टच्या लेव्हलवर दोन्ही सिनेमे सारखेच!

 

gehraiyaan 2 IM

 

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे या सिनेमातही बॉलिवूडने पुन्हा त्याच गोष्टीचा किस पाडला आहे ती म्हणजे लग्नबाह्य संबंध किंवा कॉम्प्लेक्स रिलेशनशिप.

बॉलिवूडकडे सध्या बायोपिक आणि रिमेकचा तुटवडा भासू लागल्याने त्यांनी पुन्हा आपला मोर्चा Extra marital affair कडे वळवलाय हे या गेहराइयांचा ट्रेलर बघून जाणवतं!

 

biopic 2 IM

 

 

सिनेमामध्ये आपल्या प्रेयसीच्या बहिणीसोबतच फिजिकल होणारा आणि त्यानंतर अगदी निर्ढावलेल्या पद्धतीने त्यावर भाष्य करणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीच्या पात्रातून दिग्दर्शक शकुन बत्रा काय सांगू पाहतोय हे तोच जाणे.

मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान सिद्धांतने अनन्याच्या करवी साऱ्या स्टारकिड्सना एक सणसणीत टोला हाणला होता, तो एक सिनेमाच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट होता का असंच आता लोकांना वाटायला लागलं आहे.

 

siddhant chaturvedi IM

दीपिका पदुकोण जिने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत नाव कमावलं तिला या अशा सिनेमात expose करताना बघून एकच शंका मनात येते की हिला काम मिळायचं बंद झालंय का?

बी किंवा सी ग्रेड सिनेमातल्या ज्या गोष्टी आपण vulgar किंवा cheap म्हणून हिणवतो त्याच गोष्टी दीपिकासारख्या अभिनेत्रीने केल्या तर त्याला बोल्ड आणि सेक्सी बिरुद लागतात, आपल्या देशातल्या बहुतांश बुद्धिजीवी लोकांचा याबाबत हाच युक्तिवाद असतो ही खूप मोठी शोकांतिका आहे.

 

deepika padukone 2 IM

 

ओटीटीच्या माध्यमातून nudity प्रमोट करणाऱ्या बॉलिवूडच्या हा गेहराइयां सिनेमा काही लोकांना आवडेल तर काहींना आवडणार नाही, ते येणारी वेळच ठरवेल पण या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातून मांडलेलं कथानक बघता याच्यात आणि त्या सी ग्रेड सिनेमात काहीच अंतर नाही हे मात्र नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?