' ‘नवरा विकणे आहे’.. चिडलेल्या बायकोने दिली जाहिरात, त्याची चूक तर बघा – InMarathi

‘नवरा विकणे आहे’.. चिडलेल्या बायकोने दिली जाहिरात, त्याची चूक तर बघा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संसार म्हटला, की भांड्याला भांड लागणारच. अनेक जोडपी जरी बऱ्याचदा वरून सगळं ‘गुडी गुडी’ असल्याचं, एकमेकांमध्ये कधीच भांडण होत नसल्याचं भासवत असली तरी ते काही खरं नसतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नवराबायकोचं नातं म्हटलं की काहीबाही कुरकुरी आल्याच. असे छोटेमोठे खटके उडाले नाहीत तर संसाराला रंगतही येणार नाही. काही काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. “आमचे ‘हे’ मला समजून घेत नाहीत” अशी आधीच्या पिढ्यांमधल्या एकजात सगळ्या बायकांची तक्रार असायची. आजच्या पिढीतल्या मुलींच्या बाबतीतही हे सत्य बदललेलं नाही.

fighting couple inmarathi

 

 

आता लॉकडाऊनच्या काळात ऑफिसच्या कामाच्या बरोबरीने अंगावर पडलेल्या अनंत जबाबदाऱ्यांमुळे तर महिलांना हे अधिकच जाणवतंय. “सगळे घरात नुसते बसून खाताएत. कुणी उठून जरा म्हणून मदतीला येत नाही.” असे संवाद आतापर्यंत घरोघरीच्या बायकांनी एकमेकींना ऐकवलेच असतील.

नवरा बऱ्याचदा ही तक्रार ऐकतो. ‘हो, हो’ म्हणतो आणि सोडून देतो. पण तरीही बहुतेक जोडप्यांचे संसार सुरळीत सुरू राहतात. ज्यांचं अगदीच पटत नाही ती जोडपी घटस्फोट घेतात, पण तुम्ही आजपर्यंत कधी नवऱ्यावर चिडल्यामुळे नवरा विकण्यासाठी जाहिरात देणाऱ्या बाईचं उदाहरण ऐकलं आहे?

मनुष्यप्राणी हा मोठा चमत्कारिक आहे. त्याच्या मनात कधी काय येईल आणि तो काय करेल हे सांगता येणं मुश्किल. न्यूझीलंडमधल्या एका बाईने आपल्या नवऱ्यावर सूड उगवण्यासाठी केलेला असाच एक भलता प्रकार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या महिलेने आपल्या नवऱ्याचाच लिलाव करण्याचं ठरवलं. यामागचं कारण मोठं गमतीशीर आहे.

 

linda inmarathi

 

‘आयरिश मिरर’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार न्यूझीलंडमधल्या लिंडा मॅकॅलिस्टर या महिलेने नवऱ्याच्या एका सवयीला वैतागून त्याला विकायचं ठरवलं. लिंडाचा नवरा जॉन याला फिरण्याची प्रचंड हौस आहे, पण त्याला आपल्या बायकोसोबत आणि मुलाबाळांसोबत फिरायला जायला आवडत नाही तर त्याच्या मित्रांसोबत फिरायला जायला आवडतं.

बायकोची परवानगी न घेता, घरात काहीही न सांगता तो सारखा सारखा मित्रांसोबत फिरायला जातो. वर ‘कामावर चाललोय’ असं घरी खोटंच सांगतो. नवऱ्याच्या अश्या बेजबाबदार वागण्यामुळे मुलांसकट सगळंच सांभाळण्याची जबाबदारी एकट्या लिंडावर पडते.

नवऱ्याला तिला मदत करणं सहज शक्य असतं. पण तो आपल्या जबाबदारीकडे लक्ष न देता सारखा मित्रांसोबत फिरायला जायची संधी शोधतो. लिंडाला एकटीलाच मग तिच्याकडून जितकं शक्य होईल त्या सगळ्या प्रकारे मुलांचं मन रमवावं लागतं, त्यांना गुंतवून ठेवावं लागतं. नवऱ्याच्या याच सवयीमुळे वैतागून, असा नवरा असण्यापेक्षा नसलेलाच बरा असा विचार करून तिने नवऱ्याला विकायचं ठरवलं.

एका ऑनलाईन सेलिंग साईटवर तिने चक्क नवरा विकण्याची जाहिरात टाकली. आपली बायको असं काहीतरी पाऊल उचलेल असा खुद्द तिच्या नवऱ्यानेही कधी स्वप्नातही विचार केला नसेल.

 

online selling inmarathi

 

‘ट्रेड मी’ या साईटवर लिंडाने ‘नवरा विकणे आहे!’ अशी जाहिरात टाकली. नवऱ्याची प्रोफाइल बनवून त्याचा एक देखणा फोटो तिने टाकला. वर नवऱ्याची उंची ६ फूट १ इंच आहे, त्याचं वय ३७ आहे, तो व्यवसायाने शेतकरी असून अतिशय प्रामाणिक माणूस आहे असे तपशीलही तिने दिलेत.

कितीही अविश्वसनीय आणि हास्यास्पद वाटली तरी ही गोष्ट खरीखुरी घडली आहे. गंमतीचा भाग असा की लिंडाने या जाहिरातीच्या शेवटी “माझा नवरा पैशानं विकला जात नसेल तर तो मी ज्याला हवा त्याला फुकट द्यायलाही तयार आहे” असंही लिहिलं आहे. लिंडा आणि जॉन या जोडप्याचं दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्यांना दोन मुलं आहेत.

लिंडाने ज्या विनोदी पद्धतीने ही जाहिरात दिली होती ती पाहून ज्याच्याविषयी ती जाहिरात दिलीये त्या नवऱ्यालाही हसू आवरलं नाही. तो तिच्यावर चिडला तर नाहीच, वर त्याने तिच्या विनोदबुद्धीचं कौतुकच केलं.

ही जाहिरात साईटवर आल्यानंतर अनेकांच्या विनोदी प्रतिक्रिया त्यावर आल्या. आपल्या बायकोने ही अशी जाहिरात दिलीये हे जॉनला त्याच्या मित्रांकडून कळलं.

जॉननेही या सगळ्याकडे अगदी खेळकरपणे पाहत “बघा जरा, काळजी घ्या ‘ म्हणत बायकोच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला मित्रांना दिला. स्वतः ‘ट्रेड मी’ या लिंकच्या मॅनेजरनेही ही बाब गांभीर्याने घेतली नाही.’नवरा विकणे आहे’ अशी जाहिरात आपल्या साईटवर पहिल्यांदाच आली असल्याचं त्याने सांगितलं.

न्यूझीलंडमध्ये सगळ्यांकडेच विनोदबुद्धी आहे, असं सांगत ग्राहकांचं समाधान व्हावं हाच आपल्या साईटचा उद्देश आहे असं तो म्हणाला. त्याने ही जाहिरात दोन तास साईटवर ठेवली आणि नंतर काढून टाकली. आश्चर्याची गोष्ट अशी, की या इतक्या कमी कालावधीतही लिंडाच्या नवऱ्यावर १०० डॉलर्सची बोली लागलेली होती.

सरतेशेवटी इतके सगळे उपद्व्याप केल्यानंतरही हे प्रकरण थोडक्यावरच मिटलं हे नशीब. भावनेच्या भरात माणूस कुठलं टोक गाठेल हे खरंच सांगता येत नाही, पण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या भावना इतक्या टोकाला जाईपर्यंत परिस्थितीही चिघळू न घेण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. जोडप्यांनी स्वतःची पर्सनल स्पेस मिळवण्याच्या नावाखाली जबाबदारीची टाळाटाळ करता कामा नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.    

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?