' सुपरहिरोची कार शोभावी असं नासाचं मार्स रोव्हर, सज्ज आहे एलीयन्सच्या शोधासाठी!

सुपरहिरोची कार शोभावी असं नासाचं मार्स रोव्हर, सज्ज आहे एलीयन्सच्या शोधासाठी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

नासा नेहमीच काहीना काही तरी भन्नाट करत असते. आता तर त्यांनी एलीयन्सच्या शोधासाठी तयार केलं आहे अत्याधुनिक वाहन, जे पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोट घातली आहेत. हे वाहन म्हणजे मार्स रोवर होय. मंगळ ग्रहावर एलीयन्सचा शोध घेण्यासाठी या वाहनाची खास निर्मिती करण्यात आली आहे. हे मार्स रोवर आज संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरलंय त्याच्या वैशिष्ट्यांमुळे, चला तर आपणही ओळख करून घेऊया या आगळ्या वेगळ्या वाहनाबद्दल!

nasa-mars-rover-marathipizza01
independent.co.uk

नासाच्या मार्स रोवर मध्ये चार अंतराळ यात्रींची जागा आहे. नासाचे हे इलेक्ट्रिक वाहन बॅटमोबाईल (बॅटमॅन चित्रपटामध्ये दाखवली गेलेली बॅटमॅनची गाडी) सारखे दिसते. याला मंगळावरील दुर्गम भागात चालवण्यासाठी आणि एलियन्सची शिकार करण्यासाठी खास तयार केले गेले आहे.

nasa-mars-rover-marathipizza02
indianexpress.com

मार्स रोवर मध्ये ६ मोठे टायर लावलेले आहेत. याची पूर्ण बॉडी कार्बन फाइबर आणि अॅल्युमिनिअम पासून बनवली गेली आहे. धुळीने भरलेल्या मंगळ ग्रहावर हे वाहन पेट्रोलवर नाही तर सौर ऊर्जेवर चालणार आहे. यामध्ये अंतराळ यात्रींसाठी एक लॅबही तयार करण्यात आली आहे.जिथे ते मंगळ ग्रहावरील जीवन रहस्यांचा शोध घेऊ शकतात.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, मार्स रोवर मंगळावर चक्कर मारू शकत नाही. भविष्यात अंतराळात जाणारे स्पेस वाहनांचे डिझाइन यावरून प्रेरित असतील हे नक्की!

nasa-mars-rover-marathipizza03
thesun.co.uk

नासाचे पुढचे मार्स मिशन २०३३ सालामध्ये होणार आहे हे. त्यांचे हे मिशन यशस्वी होण्यासाठी Space Boffs ने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर परीक्षण केलेले आहे, सोबतच ते  SpaceX या खाजगी कंपनी  बरोबर मिळून काम करत आहेत.

SpaceX च्या मालकाने सांगितले की,

मंगळ ग्रहावर जीवन असण्याची दाट शक्यता आहे. मंगळ ग्रहावर परमाणु बॉम्ब टाकले पाहिजेत, म्हणजे त्याचे तापमान मनुष्याच्या लायक होईल.

ह्या आधी नासाने मंगळ ग्रहावर एक रहस्यमई १६ मजली उंच विशाल संरचना पहिली होती. असे वाटते की, ह्या मागील पुरावे लवकरच मिळतील आणि हे सिद्ध होईल की मंगळ ग्रहावर जीवन होते, जे खूप आधीच संपलेले आहे.

nasa-mars-rover-marathipizza04
tagesspiegel.de

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?