' नवरा गेल्यानंतर डबघाईतल्या "सीसीडी"ला नव्या मालकिणीने कर्जातून बाहेर काढलं!

नवरा गेल्यानंतर डबघाईतल्या “सीसीडी”ला नव्या मालकिणीने कर्जातून बाहेर काढलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“आपण CCD वर भेटून बोलू” हे वाक्य फोनवर बऱ्याच वेळेस वापरलं जातं. मध्यंतरी कोरोना मुळे हे बंद होतं. पण, आता कॉफीचा सुगंध पुन्हा दरवळण्यास सुरुवात झाली आहे.

CCD म्हणजेच ‘कॅफे कॉफी डे’ हे फक्त एक कॉफीचं हॉटेल नाहीये, तर हे कित्येक लोकांचं एकमेकांना भेटण्याचं आणि व्यक्त होण्याचं ठिकाण आहे.

 

ccd ceo inmarathi

 

कॉलेजच्या दिवसांत तर इथे प्रत्येक जण किती वेळेस आणि किती वेळासाठी गेलेला असेल याची गणतीच नसेल. अमेरिका च्या ‘कोस्टा’ या कॉफी चेनच्या हॉटेल ला भारतात टक्कर देणारं भारतीय ‘कॅफे कॉफी डे’ चे सातत्य आणि व्यावसायिक प्रगती ही खरंच कौतुकास्पद आहे.

आज कॅफे कॉफी डे हे कॉफी एंटरप्राइझेस लिमिटेड (CDEL) या नावाने स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड कंपनी आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये कॅफे कॉफी डे चे मालक श्री. सिद्धार्थ यांनी केलेल्या आत्महत्येनंतर कंपनीचा पुढचा प्रवास कसा असेल? हा प्रश्न लोकांना आणि शेअर होल्डर्सला नक्कीच पडला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्ही.जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या ही आयकर विभागाच्या सततच्या तगाद्यामुळे केली होती असंही दबक्या आवाजात बोललं जात होतं. पण, तपासात तसं काही निष्पन्न झालं नाही.

कठीण परिस्थितीत कंपनी सावरली ती दिवंगत सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी.

बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आधीपासूनच असलेल्या मालविका हेगडे यांना नुकतंच ७ डिसेंबर रोजी ‘कॅफे कॉफी डे’ च्या CEO पदी पुढील पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात आलं आहे.

कंपनीवर असलेला ३ हजार करोड रुपयांचा कर्जाचा डोंगर आणि इतर कोणत्या आव्हानांना मालविका हेगडे यांना सामोरं जावं लागेल याबद्दलचा हा एक सारांश.

 

malavika hegde inmarathi

 

मालविका हेगडे यांचे वडील हे एस एम कृष्णा हे कर्नाटक चे मुख्यमंत्री होते. मालविका यांनी बँगलोर विद्यापीठातून इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे.

३२ वर्षांपूर्वी सिद्धार्थ यांच्या सोबत मालविका यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. ५१ वर्षीय मालविका हेगडे यांनी सिद्धार्थ यांना या पूर्ण प्रवासात मोलाची साथ दिली होती.

पूर्ण परिवार एकत्र आल्यानेच आज कॅफे कॉफी डे इंटरप्राईझेस लिमिटेडचा परिवार हा २५,००० लोकांपर्यंत पोहोचला आहे. भारतात १७०० पेक्षा अधिक आऊटलेट्स असलेल्या कॅफे कॉफी डेची सुरुवात ही बँगलोर पासून झाली होती.

२४ जुलै २०२० रोजी मालविका हेगडे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं होतं की, “कॅफे कॉफी डे एंटरप्राईझेस लिमिटेड (CDEL) वर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन काम करूयात.

कंपनी मध्ये असलेल्या अतिरिक्त गुंतवणूक आम्ही लवकरच विकणार आहोत आणि हे कर्ज कमी करणार आहोत. कंपनीच्या भविष्यासाठी मी स्वतः नेहमीच बांधील आहे.

सिद्धार्थ यांनी मला एक जबाबदारीचं काम दिलं आहे. शेवटच्या कर्जदाराचं कर्जाची परतफेड करेपर्यंत माझ्यासाठी हे पहिलं प्राधान्य असणार आहे. कंपनीची आणि कर्मचाऱ्यांची भरभराट होणे याकडे माझं इथून पुढे नेहमीच लक्ष असेल.”

मालविका हेगडे यांनी हे शब्द खरे सुद्धा करून दाखवले.

 

malavika hegde 2 inmarathi

 

लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी कित्येक आवश्यक आर्थिक निर्णय कमी वेळात घेऊन कंपनीचा ‘कॅश फ्लो’ सुरू ठेवला आणि कंपनीवरील आर्थिक भार कमी केला.

हे मिशन साध्य करण्यासाठी कंपनी ने वसुधरा देवी आणि गिरी देवानुर आणि मोहन कोंडी यांना डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये सिद्धार्थ यांचा मृतदेह मँगलोर येथे सापडल्या पासून कॅफे कॉफी डे ग्रुप वर कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदार आणि भारतीय आयकर खात्याकडून सुद्धा खूप दबाव आणला जात होता.

एका पाहणीत हे उघड झालं होतं की सिद्धार्थ यांच्या दुसऱ्या फर्म म्हैसूर अमालगमेटेड कॉफी इस्टेट्स लिमिटेड (MACEL) ला ३५३५ करोड इतकी रक्कम देण्यात आली होती.

जी की वसूल करण्यासाठी कंपनी सध्या प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच ग्लोबल व्हिलेज टेक पार्कची विक्री काही महिन्यांपूर्वी २७०० करोड मध्ये करण्यात आली.

त्यासोबतच, कॅफे कॉफी डे ग्रुपने मध्यंतरी माईंड ट्री या कंपनीचे विकत घेतलेले शेअर्स हे L&T इन्फोटेकला विकले आहेत. शिवाय तब्बल ७००० करोड इतकं मोठं कर्ज हे ११७९ करोडपर्यंत कमी करण्यात मालविका यांना यश मिळालं आहे.

“अ लॉट कॅन हॅपन ओवर अ कॉफी” म्हणजेच एका कॉफी टेबलवर खुप काही घडू शकतं हे जगाला सुचवणाऱ्या व्ही जी सिद्धार्थ यांनी वयाच्या ६० व्या वर्षी जगाचा निरोप घेणं ही खरंच मान्य होत नाही.

 

CCD inmarathi

 

नेहमीच कॅमेरा पासून दूर रहाणं आवडणाऱ्या व्ही जी सिद्धार्थ यांनी त्यांचे निदान त्यांच्या समोर असलेल्या आर्थिक अडचणींच्या वेळी काही लोकांना सामावून घेतलं असतं तर कदाचित ते आपल्यात आज हयात असते.

भारता व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, नेपाळ, इजिप्त, मलेशिया आणि झेक रिपब्लिक या देशात शाखा असलेल्या कॅफे कॉफी डेचा पुढचा प्रवास सुखाचा जावो अशी आशा आपण व्यक्त करूया.

२०,००० एकर्सच्या शेतात कॉफी चं उत्पादन घेणाऱ्या आणि अरेबियन कॉफीचे आशियातील सर्वात मोठे उत्पादक असलेला हा ग्रुप परत एकदा नफ्यात असावा ही इच्छा व्यक्त करूयात.

कॉफी सोबतच सँडविच, बर्गर सारखे पदार्थ सुरू करून नफा वाढवण्यासाठी मालविका हेगडे यांच्या नेतृत्वात कंपनी कार्य करत आहे. त्यामुळे हळूहळू कंपनीची आर्थिक परिस्थिति सुधारत जाऊन, CCD पुन्हा बाजारात त्याच दिमाखात उभी राहील अशी आशा करुयात!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?