' ‘अर्ध्या रात्री उठून तो आजही…’ लारा दत्ताने केला सलमानच्या एका सवयीचा खुलासा – InMarathi

‘अर्ध्या रात्री उठून तो आजही…’ लारा दत्ताने केला सलमानच्या एका सवयीचा खुलासा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

माणूस सवयीचा गुलाम असतो असं म्हणतात. कुठलीही गोष्ट आपण नेहमी कश्याप्रकारे करतो त्यावरून आपली ती सवय कशी आहे हे ठरत असतं.

एकदा लागलेली सवय बदलता येणं फार कठीण असतं त्यामुळे बऱ्याचदा असं दिसतं, की आपल्या सवयी आपल्यासोबत कायम राहतात. सामान्य माणसांच्या बाबतीत हे जितकं खरं आहे तितकंच बॉलिवूडच्या सिनेतारकांच्या बाबतीतही खरं आहे. नुकत्याच झालेल्या एका प्रमोशनल इंटरव्यूमध्ये अभिनेत्री लारा दत्ताने तिच्या काही सहकालाकारांच्या आजवर न बदललेल्या सवयी सगळ्यांसमोर उघड केल्या.

‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कौन बनेगी शिखरवती’ या वेब शो च्या प्रमोशनल इंटरव्यूदरम्यान अभिनेत्री लारा दत्ताने तिच्या आजवर न बदललेल्या सवयींविषयी खुलासा केला. तिच्या सहकलाकारांच्या आजवर न बदललेल्या अश्या कुठल्या सवयी आहेत असंही तिला मुलाखतीदरम्यान विचारलं गेलं.

लाराने आजवर अनेक दिग्गज कलाकारांसोबत कामं केलेली आहेत. लाराने या मुलाखतीत सलमान खान, अक्षय कुमार आणि संजय दत्त च्या अश्या काही सवयी उघड केल्या आहेत ज्या गेल्या कित्येक वर्षांपासून तश्याच आहेत. आजही या कलाकारांच्या त्या सवयी बदललेल्या नाहीत.

आपल्या भाईजानचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चित्रपटांमधून तो आजवर लोकांचं जे मनोरंजन करत आलाय त्यामुळे त्याचा हा मोठा चाहतावर्ग आहेच, पण सलमान त्याच्या दिलदार स्वभावासाठी, त्याच्या चिडक्या स्वभावासाठी आणि त्याच्यावर झालेल्या खटल्यांसाठीही चर्चेत राहिलेला आहे.

 

Wanted Salman IM

 

लारा दत्ताने २००५ साली सलमान खानसोबत ‘नो एंट्री’ या चित्रपटात काम केलं होतं. याखेरीज, ‘पार्टनर’ या चित्रपटातूनही ती सलमानसोबत मोठ्या पडद्यावर झळकली होती. सलमान खानची एक विचित्र सवय लारा दत्ताने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितली.

“आजही सलमान खान अर्ध्या रात्री उठतो. त्याचे फोनकॉल्सही अर्ध्या रात्रीतच येतात.”, असं लारा म्हणाली. अशी सवय कुणाला का असेल असा जरी प्रश्न आपल्याला पडला आणि तो कितीही तार्किक असला तरी सलमानला मात्र ही सवय आजही आहे.

अक्षय कुमारची एक उत्तम सवय या मुलाखतीदरम्यान लारा दत्ताने सांगितली. लाराने २००३ साली ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, ज्यात तिच्यासोबत नायकाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसला होता.

आपल्या लाडक्या अभिनेत्यांपैकी अक्षय कुमार हे एक नाव. त्याने एकापेक्षा एक गाजलेले चित्रपट दिले. हलक्याफुकल्या सिनेमांमधून त्याने रसिकांचं मन जितकं रिझवलं तितकीच ‘पॅडमॅन’ सारख्या गंभीर सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांमधूनही कामं केली.

 

padman inmarathi

 

इंडस्ट्रीचं आर्थिक गणित चोख कळलेला अभिनेता म्हणून अक्षय कुमारकडे कौतुकाने पाहिलं जातं. शिवाय तो एक अतिशय तंदुरुस्त अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या या फिटनेसचं श्रेय त्याच्या चांगल्या सवयींनाच जातं.

लारा दत्ताने या मुलाखतीदरम्यान सांगितलं, “आजही अक्षय कुमार त्याच्या आयुष्यात जी जी माणसं आहेत, त्या सगळ्यांच्या आधी सकाळी लवकर उठतो.” लारा दत्ता मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होती ती २०२१ साली आलेल्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबतच  काम केलं होतं.

आपल्याला सहजासहजी विश्वास बसणार नाही अश्या अभिनेता संजय दत्त याच्या एका सवयीचाही लारा दत्ताने खुलासा केला. “संजय दत्त प्रत्यक्ष आयुष्यात फार बुजरा आहे. जेव्हा जेव्हा तो कुणालाही भेटतो तेव्हा आजही तो पटकन लाजतो.”, लारा म्हणाली.

 

sanjay datta inmarathi

 

संजय दत्त हा त्या जमान्यातला एक लोकप्रिय नट होता. तो त्याच्या अफेअर्ससाठी, दारूच्या व्यसनासाठी आणि त्याच्यावर झालेल्या खटल्यांसाठीही चर्चेत राहिलेला आहे. त्यामुळे ही व्यक्ती बुजरी असेल हे पचायला थोडं कठीणच जातं. संजय दत्त आणि लारा दत्ता यांनी २००६ साली आलेल्या ‘झिंदा’ या चित्रपटातून एकत्र काम केलं होतं.

‘कौन बनेगी शिखरवती’ हा वेब शो Zee5 वर इतक्यातच प्रदर्शित झाला. लारा दत्ताने यात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या वेब शो मध्ये विक्षिप्त राजा आणि चार मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेते नासिरुद्दीन शाह दिसले आहेत.

सोहा अली खान, कृतिका कामरा आणि अन्या सिंग या अभिनेत्रींनींही या वेब शो मध्ये भूमिका साकारल्या आहेत. या चार मुलींपैकी एकीची भूमिका लाराने साकारली आहे. ‘हंड्रेड’ या सिरीज मधून लारा दत्ताने ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हिकप्स आणि हुकप्स’ मधून ती ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर दिसली.

‘कौन बनेगी शिखरवती’ हा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला तिचा तिसरा वेब शो आहे. पीटीआयशी झालेल्या संभाषणादरम्यान भूमिकेची निवड करताना आपण कथानकाला महत्त्व देतो असं लारा म्हणाली.

 

lara datta inmarathi

 

कायम मुख्य भूमिकेतच दिसलं पाहिजे असा काही आपला अट्टाहास नाही. बऱ्याचदा बाकी भूमिकाही ताकदीच्या आणि दीर्घकाळ मनात घर करणाऱ्या असतात. केवळ मुख्य भूमिकांमधूनच दिसायचंय असा जर आपण दृष्टिकोन ठेवला तर आपण स्वतःच्याच प्रगतीवर मर्यादा आणतो असं तिचं प्रांजळ मत असल्याचं तिने सांगितलं.

आपल्या लाडक्या कलाकारांविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे असा आपला समज असतो. पण बऱ्याचदा कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सगळ्याच बाजू, त्यांच्या अश्या काही सवयी आपल्यासारख्या प्रेक्षकांना माहीत नसतात. त्यांच्या ज्या सहकलाकारांचा त्यांच्याशी जवळून परिचय आलेला असतो त्यांच्याकरवी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, अश्या मुलाखतींमधून त्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?