' शेंगदाणे- काळा मसाला खाऊन काढले ६ दिवस, नागराज मंजुळेंची आठवण – InMarathi

शेंगदाणे- काळा मसाला खाऊन काढले ६ दिवस, नागराज मंजुळेंची आठवण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोणताही कलाकार एका रात्रीत मोठा होत नसतो, त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आणि त्यानंतरच तुम्हाला अपेक्षित यश मिळतं.

२०१६ साली एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम रचला. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात या चित्रपटाची चर्चा रंगली.

 

sairat inmarathi

 

चौकटीबाहेरचे चित्रपट देणारा, एक वेगळा विचार मांडणारा दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांच्याकडे पाहिलं जातं. फॅन्ड्री, सैराट, नाळ अशा चित्रपटांमधून त्यांनी कायम सामाजिक भान जपलं आहे, नव्या विचारांना, विषयांना वाचा फोडली आहे, पण त्यांचा इथवरचा प्रवास काही सोप्पा नव्हता.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात त्यांचा जन्म झाला, घरची परिस्थिती तशी गरिबीची होती. शाळेत त्यांना पुस्तक वाचनाची आवड लागली, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात गेले.

इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तेही एक रुम घेऊन पुण्यात राहत असत. आता एकटं राहायचं म्हटल्यावर खाण्यापिण्याची गैरसोय ही होणारच. जेवण बनवण्याची सवय नसल्याने तब्बल ६ दिवस नागराज यांनी केवळ शेंगदाणे- काळा मसाला आणि वडापाव खाऊन काढले होते.

 

nagraj_manjule_inmarathi

 

 

झी मराठीवरील ‘किचन कललाकार’ या कार्यक्रमात त्यांनी ही आठवण सांगितली. पुणे विद्यापीठात शिकत असताना त्यांच्या घरून डबा यायचा, पण अनेकदा डबा यायचा नाही. हॉटेलमध्ये रोज खाण्याइतके पैसे नसायचे. तेव्हा मग कंटाळून त्यांच्या मित्राने आणि त्यांनी घरीच काहीतरी बनवायला सुरुवात केली.

त्यांचा मित्र हौशी होता, त्याला बऱ्यापैकी पदार्थ बनवता यायचे, स्वयंपाकाची आवड देखील होती, पण एकदा गावावरून तो मित्रही पुण्याला आला नाही. नागराज मंजुळे एकटेच आले होते. त्यांना स्वयंपाकाबद्दल काहीच माहिती नव्हती.

तब्बल ६ दिवस ते फक्त शेंगदाणा – काळा मसाला आणि एक वडापाव खाऊन राहिले, नंतर मात्र त्यांनी घरी आईला कॉल केला आणि भाज्या कशा करायच्या हे विचारून घेतलं. हळूहळू स्वयंपाकाची सवय झाली आणि ते उत्तम स्वयंपाक करू लागले.

याच कार्यक्रमात त्यांनी ‘दगडी मटण’ या आगळ्यावेगळ्या पदार्थाबद्दलची आठवण सांगितली. सैराटच्या सेटवर जेवण बनवताना, तो आचारी मटणात दगड टाकायचा. त्या दगडाची चवही मटणात येते असं यामागचं लॉजिक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?