' महागड्या क्रिम्सपेक्षा स्वयंपाकघरातील हे गुणकारी औषध एकदा ट्राय कराच

महागड्या क्रिम्सपेक्षा स्वयंपाकघरातील हे गुणकारी औषध एकदा ट्राय कराच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – डॉ. प्राजक्ता जोशी 

===

सुकांतीनी हळद

“पी हळद हो गोरी” हा नेहमीचा ऊपहासात्मक वाक्प्रचार आहे. पण त्याशिवाय भारतातील रीतीभातीपासुन ते खाद्य संस्कृतीपर्यंत हळदीला महत्व आहे. पाश्चिमात्य देशातही “Turmeric Latte” प्रसिद्ध पेय झाले आहे.

 

turmeric health benefits-inmarathi04
stepin2mygreenworld.com

 

आज आपण “हळद” या विषयावर थोडी माहीती घेऊया.

प्रथम आधुनिक शास्त्रानुसार अभ्यास करूया.

१) हळदीमध्ये curcumin-(3%) हा घटक असतो. जे अत्यंत प्रभावी antioxident आहे. शरीरास 1gm/day एवढी requirementअसते. याचे रक्तातील शोषणाचे (absorbtion) प्रमाण कमी असते. मात्र काळी मिरी सोबत सेवन केल्यास मदत होते.

 

turmeric health benefits-inmarathi
youtube.com

 

२) हळद ही नैसर्गिक anti inflamatory असते. त्यामुळे अनेक व्याधींमध्ये ऊपयुक्त ठरते.

३) हळदीच्या नियमीत सेवनाने antioxidant निर्माण करण्याची शरीराची क्षमता वाढते.

४) मेंदुची कार्यक्षमता वाढवते व मेंदुचे विकार होण्याची शक्यता कमी करते.

 

turmeric health benefits-inmarathi03
healthline.com

 

५) रक्तवाहिन्यांच्या पेशींना (endothelium) बळकटी देण्याचे कार्य हळद करते. त्यामुळे बरेच हृद्रोग टाळले जातात.

६) curcumin हे molecular level वर बदल घडवुन आणून पेशींची अतिरीक्त वाढ कमी करण्यास मदत करते. त्यामुळे cancer मध्ये ऊपयुक्त ठरते.

७) Depressionसारख्या मानस व्याधीत अत्यंत ऊपयुक्त ठरते.

८) भरपुर प्रमाणातantioxidants असल्याने

हळदीमध्ये anti aging हा गुणधर्म आढळतो.

 

turmeric health benefits-inmarathi02
healthline.com

• आयुर्वेदीक दृष्टीकोन

आयुर्वेदाने हळद अत्यंत औषधी सांगीतली आहे.त्याचे खालील गुणधर्म सांगितले आहेत.

१) लेखनिय—वजन कमी करण्यास ऊपयुक्त

२) कुष्ठघ्न-त्वचारोगात ऊपयुक्त

३) कंडुघ्न—कुठल्याही प्रकारच्या खाजेसाठी ऊपयुक्त(antifungal)

४) कृमिघ्न—Helmenthic infestation(जंत), अंजुत(ringworm) मध्ये ऊपयुक्त.

५) ”शिरोविरेचन’या मानसरोगांवरील आयुर्वेदीक चिकित्सेत ऊपयुक्त.

 

turmeric health benefits-inmarathi05
stylecraze.com

 

हळदीचे प्रकार

१) दारूहळद—ही अत्यंत औषधी असुन नेत्ररोग व कर्णरोग यामध्ये ऊपयुक्त ठरते.अनेक आयुर्वेदीक कल्पांमध्ये हा महत्वाचा घटक आहे.

२) अंबेहळद- ही शीतगुणात्मक असुन वातवर्धक,पित्तनाशक व सर्व प्रकारची सुज(inflamation) व खाज ( itching)
यात ऊपयुक्त

३) हळद—skin infections, woundsयात ऊपयुक्त .

याशिवाय १६ प्रकारचे प्रमेह(diabetes समान व्याधी),रक्ताल्पता(anaemia),विषबाधा यामध्ये हळद ऊपयुक्त ठरते. तसेच नित्यसेवनाने त्वचेचे सौंदर्य अबाधित ठेवते. आयुर्वेदाने रक्तपित्त (bleeding Disorders), अपस्मार (epilepsy) यातही हळद ऊपयोगी सांगितली आहे. साठलेला कफ ऊत्सर्जीत करण्यास हळद मदत करते.

यकृताचे निर्विषीकरण करते. allergy पासुन त्वचेचे रक्षण करते.पचनास मदत करते. रोगप्रतिकारक्षमता वाढवते

पित्ताशयातील खडे (Gallstones), Irritable bowel sundrome, food poisoning यात ऊपयुक्त ठरते. स्त्रियांचे गर्भाशय, स्तन यांचे शुद्धीकरण हळद करते. दमा, burns यातही हळद ऊपयुक्त ठरते. त्यामुळे हळदीचा वापर नित्य आहारात अवश्य करावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?