' गेंगाणा आवाज, टोपीवाला म्हणून कितीही हिणवलं तरी हिमेशने एक काळ गाजवलाय! – InMarathi

गेंगाणा आवाज, टोपीवाला म्हणून कितीही हिणवलं तरी हिमेशने एक काळ गाजवलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिमेश रेशमिया, बॉलीवूड संगीत क्षेत्रातील एक अशी व्यक्ती आहे जी एखाद्या वादळाप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये येऊन धडकलं होतं.

छोट्या पडद्यावर अंदाज, अमन, आशिकी, अमर प्रेम सारख्या मालिकांची निर्मिती करणारा, त्या मालिकांसाठी शीर्षकगीत तयार करणारा एक २५ वर्षांचा मुलाचे गाणे सलमान खान ऐकतो, त्याला बॉलीवूड मध्ये संधी देतो आणि तो त्या संधीचं सोनं करतो हे कमाल आहे.

 

himesh reshamiya IM

 

हिमेश यांचा जन्म २३ जुलै १९७३ रोजी मुंबईत जन्म झाला. त्यांचे वडील विपीन रेशमिया हे बॉलीवूड मध्ये संगीतकार म्हणून काम करायचे.

१९९० च्या दशकात विपीनजी हे सलमान खान सोबत काम करणार होते. पण, तो सिनेमा पुढे ढकलला गेला, त्यांनी आपल्या मुलाचे काही गाणी निर्माता सलमान खानला ऐकवली आणि ती त्याला प्रचंड आवडली आणि बॉलीवूडला एक संगीतकार मिळाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज हिमेश रेशमिया हा आपल्याला केवळ इंडियन आयडॉल मध्ये दिसतात. पण, २१ व्या शतकाचं पहिलं दशक हे या संगीतकाराने गाजवलं होतं हे संगीतप्रेमींच्या लक्षात असेल.

२००६ मध्ये रिलीज झालेल्या ‘आप का सुरुर’ या अल्बमने हिमेश रेशमिया यांच्या करिअरला एक वेगळीच दिशा मिळाली. १८ गाणी असलेल्या या अल्बमचे गाणे आज १५ वर्षानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म वरून संगीतप्रेमी ऐकत असतात.

 

aap ka surror IM

 

डोक्यावर टोपी, नाकातून येणारा आवाज, गाण्यांमध्ये वारंवार येणारे सारखे शब्द, फास्ट बीटची गाणी तयार करणारा संगीतकार, गायक अशी हिमेश यांनी आपली ओळख या अल्बम नंतर बॉलीवूड मध्ये निर्माण केली.

आजवर भारतात विकल्या गेलेल्या संगीत अल्बमपेक्षा जास्त म्हणजे ५.५ कोटी अल्बमची विक्री करून एक किर्तीमान ‘आप का सुरुर’ स्थापित केला होता.

मायकल जॅक्सनच्या ‘थ्रिलर’ या गाण्याच्या अल्बमच्या जगभरातील ६.५ कोटी प्रती विक्रीच्या खालोखाल हिमेशच्या ‘सुरुर’ने क्रमांक पटकावला होता हे विशेष आहे.

 

MJ IM

 

हा विक्रम मोडणे हे कोणत्याही संगीतकार, गायकाला कठीण जाणार हे नक्की. कारण, सध्या जगात सर्वात यशस्वी असलेले पॉप गायक हे ३० लाख अल्बमची विक्री हा यशाचा एक मापदंड मानला जातो.

२००६ हे वर्ष हिमेश रेशमीया यांच्या स्टार होण्याचं वर्ष होतं. या एकाच वर्षात बॉलीवूडसाठी ३६ हिट गाणे तयार करण्याचा विक्रम हिमेश रेशमिया यांच्या नावावर आहे.

“हे एकदा होऊ शकतं” अशी खोचक टीका हिमेश यांच्यावर त्यावेळी समीक्षकांनी केली होती. पण, आपलं यश हे नशिबाच्या जोरावर नसून ते संगीत साधनेतून आलं आहे हे हिमेश यांनी २०१२ मध्ये परत दाखवून दिलं. त्यावर्षी हिमेश यांनी २५ हिट गाणी देऊन आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

आज विविध कारणांमुळे ट्रोल होणारे हिमेश रेशमिया हे लंडन मधील प्रतिष्ठित ‘वेम्बले अरेना’ आणि ‘हेंकेन म्युझिक हॉल’ मध्ये गाण्याचा कार्यक्रम सादर करू शकणारे पहिले भारतीय संगीतकार, गायक आहेत ही सुद्धा त्यांच्याबद्दलची भूषणावह गोष्ट म्हणता येईल.

३० ऑक्टोबर २००७ रोजी हिमेश यांनी वेम्बले स्टेडियमवर मोठ्या प्रेक्षक संख्येसमोर आपला कार्यक्रम सादर केला होता. या कार्यक्रमाला भारतीय आणि स्थानिक प्रेक्षकांचा प्रतिसाद बघूनच हिमेश रेशमिया यांना इंग्लंड मधील हेंकेन म्युझिक हॉल मध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रयोजकांनी आमंत्रित केलं होतं.

संगीतकार असतांनाच आपण अभिनय सुद्धा करू शकतो असा साक्षात्कार हिमेश यांना २०१३ मध्ये झाला आणि तिथून त्यांच्या बॉलीवूड करिअरला उतरती कळा आली असं म्हणता येईल.

 

himesh acting IM

 

‘आप का सुरुर’, ‘कर्ज’, ‘रेडिओ’ हे त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर पत्त्याच्या डावासारखे कोसळले. सोशल मीडिया उदयास येण्याचा तो काळ होता. ट्रोलर्सने हिमेश यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

याच वर्षी त्यांनी ‘अ स्टार इज किल्ड’ या फ्रेंच सिनेमात सुद्धा काम केलं. मायकेल जॅकसन यांच्या खुनाचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेला हा सिनेमा ख्रिस्तोफर लेनियर यांनी दिगदर्शीत केला होता.

या सिनेमाची चर्चा तर खूप झाली. पण, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुद्धा काहीच कमाल करू शकला नाही. हिमेश रेशमिया यांची वकिली किंवा जाहिरात करण्याचा या लेखाचा उद्देश नाहीये.

एकेकाळी ‘आशिक बनाया आपने’, ‘तेरे नाम’, ‘अक्सर’ सारख्या म्युझिकल हिट देणारा संगीतकार आज केवळ काही टेलिव्हिजन शोज् मधून ‘स्क्रिप्टेड’ बोलतांना दिसतो हे त्यांच्या चाहत्यांना खटकत असणार, त्यांच्यासाठी केवळ ही एक आठवण आहे.

 

himesh in singing show IM

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?