' वाहिनीवरील राजकीय दबाव की मानेंचा उद्दामपणा? : तुम्ही कोणाच्या बाजूने? – InMarathi

वाहिनीवरील राजकीय दबाव की मानेंचा उद्दामपणा? : तुम्ही कोणाच्या बाजूने?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील दोन दिवस सोशल मिडीयावर अभिनेता किरण माने नावाचं वादळ घोंगावतंय. स्टार प्रवाह वाहिनी आणि किरण माने यांच्यातील युद्ध काही दिवसांपुर्वीपर्यंत फक्त सोशल मिडीयावर रंगलं होतं. मात्र शुक्रावारी माने यांना वाहिनीने थेट घरचा आहेर दिल्याने या वादाला नव्याने तोंड फुटलं.

वाहिनीने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांची हकालपट्टी केल्यानंतर आपल्या राजकीय लिखाणामुळे आपल्याला मालिकेबाहेर काढल्याची भुमिका किरण माने यांनी घेतली. ऐवढंच नव्हे तर त्यानंतरही बचेंग तो औऱ भी लढेंगे असा पवित्रा घेत त्यांनी आपले लिखाण सुरू ठेवत राजकीय दबावाला बळी पडलेल्या मालिका निर्माते तसेच वाहिनी यांच्यावरही आरोप सुरु ठेवले.

 

kiran mane featured IM

 

आपली बाजु सावरणाऱ्या मानेंच्या समर्थनार्थ मोठा वर्ग निर्माण झाला. अखेरिस वाहिनीने मौन सोडले आणि याप्रकरणी नवा खुलासा केला.

किरण माने यांना कोणत्याही राजकीय जबावामुळे नाही तर त्यांच्या गैरवर्तवणुकीमुळे मालिकेतून काढले असल्याची बाब वाहिनीने प्रकाशित केली. मालिकेच्या समर्थनार्थ काही कलाकार पुढे आले आणि किरण माने यांच्या वागणुकीचा त्रास होत असल्याचा खुलासा त्यांनी मिडीयापुढे केला.

मालिकेच्या हरॉईनला तिच्या वाढत्या वजनावरून बोलणे, सहकलाकारांना कायम हीन दर्जाची वागणुक देणे, सेटवर शिवीगाळ करणे अशा अनेक तक्रारींचा पाढा अभिनेत्री दिव्या पुगावकर, शर्वाणी पिल्ले, सविता मालपेकर यांनी मिडीयासमोर वाचला.

मात्र त्याचवेळी त्या सेटवर उपस्थित असलेल्या काही कलाकारांनी सहकलाकारांची बाजु नाकारत किरण माने यांच्याकडून कोणेतेही गैरवर्तन न झाल्याची बाब उघड केली.

आता एकाच सेटवर किरण माने यांच्याबाबत असलेली मतमतांतरे यामध्ये नक्की कुणाची बाजु खरी? हा प्रश्न आहेच.

 

kiran m im

 

किरण माने यांची वागणुक गैर असल्यामुळे त्यांना मालिकेतून काढले की आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी राजकीय दबावामुळे अभिनेत्याची हकालपट्टी झाली? तुम्हाला काय वाटतं? तुमचा पाठिंबा नक्की कुणाला? किरण माने यांना की स्टार प्रवाह वाहिनीला?

तुमचं मन नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?