' तुम्हाला समोरच्याबद्दल वाटणारी भावना प्रेम आहे, की फक्त आकर्षण? ‘असं’ तपासून घ्या – InMarathi

तुम्हाला समोरच्याबद्दल वाटणारी भावना प्रेम आहे, की फक्त आकर्षण? ‘असं’ तपासून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आयुष्यात असे कधीतरी घडते, की एखादी व्यक्ती अगदी पहिल्या भेटीतच आवडून जाते. कधी कधी अनेकांना लव्ह ऍट फर्स्ट साईटचा अनुभव येतो. एखादी व्यक्ती थोड्याच वेळात मन घर करून जाते. तिचं दिसणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव, तिच्या विशिष्ट लकबी ह्या गोष्टींचा आपण सतत विचार करू लागतो. त्या व्यक्तीचा आवाज सतत मनात घुमतो.

आपण रात्रंदिवस त्याच व्यक्तीचा विचार करू लागतो. त्या व्यक्तीबरोबर भविष्याची स्वप्न रंगवू लागतो. अगदी स्वप्नात सुद्धा तीच व्यक्ती दिसू लागते. अशावेळेला आपण आपल्या मनातल्या भावना जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगितल्या, तर ते आपल्याला गदागदा हलवून सांगतात, की ‘दोस्ता हे प्रेम नव्हे तर तात्पुरते आकर्षण आहे! इट्स नॉट लव्ह, इट्स जस्ट अ टेम्पररी क्रश!’ आणि आपण मात्र तावातावाने हे खरं प्रेमच आहे हे त्यांना पटवून देऊ लागतो. पण मनातल्या मनात मात्र नक्कीच विचार करू लागतो की हे आपल्याला वाटतेय ते खरंच प्रेम आहे की निव्वळ आकर्षण?

 

couple inmarathi 1

 

प्रेम व आकर्षण ह्या दोघांमधील फरक ओळखणे खूप गोंधळात टाकणारे असू शकते. अनेकदा आकर्षणाला प्रेम समजून गैरसमज होऊ शकतो.

आपण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यावर प्रेम करतो. ह्या गैरसमजामुळे मोठा गोंधळ होऊ शकतो आणि नुकसान देखील होऊ शकते. आकर्षण किंवा मोह अल्पजीवी असते, परंतु मात्र प्रेम दीर्घकाळ टिकते.

जर तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करणे थांबवू शकणार नाही. या आकर्षणाचे रूपांतर नंतर ऑब्सेशनमध्ये होऊ शकते. आणि त्यामुळे तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही अविवेकी वागू शकता.

पण जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा अशा गोष्टी घडत नाहीत. प्रेम ही एक निःस्वार्थ भावना आहे जी तुम्हाला अविवेकी वागण्यास प्रवृत्त करत नाही.

आकर्षणाचे रूपांतर कधी कधी ध्यासात होऊ शकते. हे असे आहे, की आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करणे, बोलणे किंवा कल्पना करणे थांबवू शकत नाही. आणि त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवण्याची इच्छा इतकी प्रबळ असते की त्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी तुम्ही काहीही करण्यास तयार असता.

प्रेमाच्या बाबतीत, आकर्षण हा एक भाग असू शकतो, परंतु त्यासाठी माणूस वाट्टेल ते चांगले वाईट पाऊल उचलत नाही. संयम व विवेक हा प्रेमाचा अविभाज्य भाग आहे.

 

couple inmarathi 2

 

आकर्षणामागे एखादा छुपा हेतू असू शकतो. आणि एकदा तो हेतू किंवा इच्छा पूर्ण झाली की, तुमचा त्या व्यक्तीमधील रस कमी होतो. आकर्षणामध्ये शारीरिक जवळीक असणे आवश्यक वाटते. अर्थात तुम्ही एखाद्याच्या बुद्धीकडेही आकर्षित होऊ शकता पण असे फार कमी वेळेला घडते.

आकर्षण हे बऱ्याचदा शारीरिकच असते. पण खऱ्या प्रेमात कुठल्याही अटी शर्ती नसतात आणि कोणत्याही वैयक्तिक गरजांचे पालन करण्याचा अट्टाहास केला जात नाही.

जोवर तुम्हाला त्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटते तोवरच तुम्ही त्या व्यक्तीसाठी वेडे असता. एकदा ते आकर्षण संपले किंवा कमी झाले की तुमचा त्या व्यक्तीतील रस संपतो. तुम्हाला त्या व्यक्तीची कमतरता देखील जाणवत नाही, परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा ब्रेकअप किंवा विभक्त झाल्यानंतरही तुम्हाला त्याची/तिची तीव्र आठवण येते.

 

plantonic love article

 

लव्ह ऍट फर्स्ट साईट हे एक मिथक आहे. अर्थात तुमच्यापैकी काहीजण ह्याच्याशी असहमत असले तरी, वास्तविकता अशी आहे की प्रथमदर्शनी प्रेम असे काहीही नाही कारण बहुतेक वेळा ते फक्त आकर्षण असते.

एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय दिसते? तर त्या व्यक्तीचे बाह्यरूप होय, पण दिसणे हा प्रेमात पडण्याचा निकष असू शकत नाही. म्हणून, बहुतेक वेळा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहता आणि तुमचे हृदय धडधडायला लागते तेव्हा ते आकर्षण असते.

एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण होण्यास वेळ लागतो. त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे-बोलणे, आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टींमधून हळूहळू प्रेम फुलते. ही स्टेप बाय स्टेप होणारी गोष्ट आहे. त्यामुळे चित्रपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे पहिलीच झलक बघून कुणी कुणाच्या प्रेमात पडत नाही. ते केवळ आकर्षण असते.

खरं तर प्रेम व काळजी हे दोन समानार्थी शब्द आहेत. जर दुसर्‍या व्यक्तीला दुःखात बघून तुम्हाला त्रास होत नसेल, परंतु तुम्हाला त्यांच्या सभोवताली राहायला आवडत असेल, तर ते आकर्षणाशिवाय दुसरे काहीही नाही.

प्रेमात आपण आपल्या आवडत्या व्यक्तीची काळजी आपसूकच करतो. पण जर तुम्हाला त्या व्यक्तीची काळजी नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात असण्याची शक्यता नाही. कधीकधी बरेच लोक केवळ स्वत: ला प्रेमात असल्याचे सिद्ध करण्यासाठी बनावट काळजी दाखवतात, हा एक धोक्याचा इशारा आहे. जर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीची मनापासून काळजी वाटत नसेल तर माफ करा मित्रांनो, बट धिस टाइम इट्स नॉट लव्ह!

प्रेम व आकर्षण ह्यांच्यातील आणखी एक फरक म्हणजे केवळ एकटे असतानाच त्या व्यक्तीची आठवण येणे. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर असाल आणि तुमच्या खास व्यक्तीची आठवण एकदाही तुमच्या मनात येत नसेल आणि दिवसभरानंतर जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हाच तुम्हाला जर त्या खास व्यक्तीची आठवण येत असेल तर हे प्रेम नव्हे. हे आकर्षणाचे स्पष्ट लक्षण आहे.

प्रेम वेळ किंवा ठिकाण पाहत नाही. तुम्‍ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असल्‍यास, ती तुमच्या मनात सतत असते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त एकटे असताना किंवा कंटाळा आल्यावर विचार करत असाल तर त्याला प्रेम म्हणण्यापूर्वी तुम्ही परत एकदा विचार करा.

 

First meet couple IM

 

पुढच्या वेळेला तुम्हाला एखादी व्यक्ती प्रचंड आवडली तर ते प्रेम आहे की आकर्षण हे वरील गोष्टींवरून पडताळून बघा आणि मगच पुढचा विचार करा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?