' बुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो!

बुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“कोरोनाची तिसरी लाट येणार का?” हा प्रश्न विचारण्यात २०२१ हे वर्ष संपलं. पण, जाता जाता हे वर्ष सगळ्यांना ओमायक्रॉनची भीती देऊन गेलं. कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या बातम्यांनीच २०२२ ची सुरुवात झाली.

‘मास्क’, सॅनिटायझरपासून आपल्याला यावर्षी सुद्धा सुटका मिळणार नाहीये हे एव्हाना आपल्या सर्वांनाच कळलं आहे. एक डोस झालेला असो वा दोन डोस असो, कोरोना तुम्हाला कधीही खिंडीत गाठू शकतो हे नवीन सत्य समोर आलं आहे.

 

corona vaccine inmarathi 1

 

कोरोना झाला नाही तरी सर्दी,खोकला, घसा खवखवणे असे त्रास कमी अधिक प्रमाणात प्रत्येकालाच सध्या होत आहे असं चित्र सध्या दिसतंय. अनिश्चितता असलेल्या या वातावरणाचा समाजकंटक नेहमीच फायदा घ्यायचा प्रयत्न करत असतात.

“बूस्टर घ्या आणि सुरक्षित रहा” असे फोन काही लोकांना सध्या येत आहेत. गोपनीय माहिती विचारून हे लोक पैसे लुबाडत आहेत. या भूलथापांना बळी न पडण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? ते जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण देशभरात सध्या झपाट्याने वाढत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी “लोकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच तिसरा डोस येईल” असं देखील त्यांनी देशाला केलेल्या संबोधनात म्हंटलं आहे.

 

vaccine IM

 

लोकांमध्ये कोरोनाची वाढती भीती बघून वैद्यकीय क्षेत्रातील लोक तर सक्रिय झाले आहेतच. पण, त्यासोबतच लोकांची फसवणूक करणारी एक टोळीनेसुद्धा आपलं काम सुरू केलं आहे. “लिंक वर क्लिक करा आणि ‘बूस्टर’ साठी नोंदणी करा” असे संदेश कित्येक लोकांना पाठवण्यात येत आहेत.

सायबर क्राईम विभागाला याबद्दल तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. सर्व स्थानिक पोलीसांना याबद्दल सतर्क राहण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. फसवणूक करणारी ही टोळी ज्येष्ठ नागरिकांना फोन करत आहेत, त्यांच्या कडून आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती घेतली जाते.

काही क्षणात एक ओटीपी फोनवर येतो, तो ओटीपी विचारला जातो. ओटीपी सांगितला की बँक अकाउंट मधली रक्कम निघून जाते. असं मधल्या काळात काही लोकांसोबत घडल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

‘बूस्टर डोस’ सुद्धा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती केंद्र सरकारने आधीच दिली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी अशा जाळ्यात अडकणं ही आश्चर्याची बाब आहे.

 

mobile IM

केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या कोविन किंवा आरोग्यसेतू या ऍप्लिकेशन शिवाय कुठेही कोरोनाच्या बूस्टरची नोंदणी सुरू नाहीये हे केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.

नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तींना आपली गोपनीय माहिती देऊ नये हे या निमित्ताने परत एकदा सांगण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना हे विशेष सांगणं आहे की, स्वतःला सरकारी अधिकारी म्हणवणाऱ्या या लोकांपासून आपला बचाव करा.

बूस्टरबद्दल सर्व माहिती ही टीव्ही वरून किंवा स्थानिक वर्तमानपत्रातून सांगण्यात येईल. बूस्टरसाठी वैयक्तीक फोन करण्याचं काम कोणत्याही संस्थेला देण्यात आलेलं नाहीये हे वारंवार सांगण्यात येत आहे.

 

scam alert IM

 

“इतर कोणतीही माहिती सांगितली तरी एक वेळ चालेल. पण, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी हा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नका” हे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना सांगणं आता अत्यंत आवश्यक झालं आहे.

“तुम्हाला कोरोनाचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का?” असा फोन आल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे हेच आपल्या आरोग्यासाठी हितकारक असेल हे सर्वांनी लक्षात ठेवावं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?