' ४० वर्षांपासून धगधगणारा ‘नरकाचा दरवाजा’ बंद होणार… वाचा, अद्भुत रहस्याबद्दल! – InMarathi

४० वर्षांपासून धगधगणारा ‘नरकाचा दरवाजा’ बंद होणार… वाचा, अद्भुत रहस्याबद्दल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वर्ग आणि नरक या दोन जागेतील फरक आपण लहानपणीपासूनच ऐकत आलो आहोत. स्वर्ग म्हणजे जिथे मेनका, रंभा, उर्वशी सारख्या सुंदरी नृत्य करत असतात. नरक म्हणजे जिथे तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकलं जातं, तिथे आगीचे डोंब सतत धगधगत असतात वगैरे आख्यायिका आपण ऐकत आलो आहोत, पण हे प्रत्यक्ष पाहिल्याची कोणीच कबुली देऊ शकत नाही हे सर्वांनाच माहीत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

स्वर्ग आणि नरक वगैरे या संकल्पना या विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत, पण या पृथ्वीतलावर तुर्कमिनिस्तान देशात एक अशी जागा आहे ज्याला ‘गेट्स टू हेल’ म्हणजेच नरकाचे दरवाजे आहेत. हे नाव आजच्या आधुनिक जगाने सुद्धा मान्य केलं आहे हे वाचून सर्वांना नक्कीच आश्चर्य वाटेल.

३० मीटर्स खोल आणि ६९ मीटर्स लांब असा एक खड्डा आहे, जिथे १९८० पासून आग लागलेली आहे. २०१३ मध्ये ‘नॅशनल जिओग्राफिक’ चॅनलने या जागेची माहिती सर्वप्रथम जगासमोर आणली होती.

 

gates to hell inmarathi

 

तुर्कमिनिस्तान देश हे नरकाचे दरवाजे लवकरच बंद करणार आहे अशी बातमी आल्याने ही जागा आता परत चर्चेत आली आहे. काय गूढ आहे या जागेचं? हे वैज्ञानिक दृष्टीने जाणून घेऊयात.

तुर्कमिनिस्तान हा देश कित्येक वर्षांपर्यंत ‘सोव्हिएत युनियन’चा भाग होता. तुर्कमिनिस्तानचा ७० टक्के भाग हा ‘काराकुम’ नावाच्या वाळवंटी प्रदेशाने व्यापलेला आहे. साडे तीन लाख चौरस किलोमीटर इतकी विस्तीर्ण ही जागा आहे. या वाळवंटाच्या उत्तरेला ही बहुचर्चित जागा आहे.

‘काराकुम’ वाळवंटामध्ये चालत असतांना पर्यटकांना मऊ वाळूपेक्षा पायापासून चेहऱ्यापर्यंत जाईल इतकी उष्णता अनुभवायला मिळते. वाळवंटाच्या एका भागात सतत धगधगणारी आग ही नरकात असणाऱ्या एखाद्या राक्षसाचा प्रताप नसून हा ‘मिथेन गॅस’चा परिणाम आहे. भूगर्भातून इथे सतत मिथेन गॅस बाहेर पडत असतो आणि त्यामुळे या जागेत मागच्या ४२ वर्षांपासून आग लागलेली आहे.

नॅशनल जियोग्राफिक चॅनलच्या प्रतिनिधींनी जेव्हा या जागेचा सखोल अभ्यास करायचं ठरवलं तेव्हा त्यांना प्रश्नांच्या उत्तरांपेक्षा अधिक प्रश्नांनाच सामोरं जावं लागलं. ते प्रश्न असे होते:

१. काराकुम वाळवंटातील ही आग सर्वप्रथम कधी लागली?

 

gates to hell inmarathi1

 

तुर्कमिनिस्तानच्या स्थानिक नागरिकांच्या मते, १९७१ मध्ये सोव्हिएत युनियन मधील काही भूगर्भशास्त्रज्ञांची टीम ही कारकूम वाळवंटात आखाती देशांप्रमाणे तेलाचे साठे आहेत का? हे तपासात होते. भूगर्भात त्यांना काही ठिकाणी नैसर्गिक वायूचे साठे मिळाले होते.

भूगर्भात त्यामुळे ज्वलनाला पूरक असं आवरण तयार झालं होतं. क्रूड ऑईलचा शोध सुरू असलेल्या ठिकाणी ३ खड्डे तयार झाले होते. या तिन्ही खड्ड्यांमध्ये ‘मिथेन गॅस’ हे मोठ्या प्रमाणात आहे या शास्त्रज्ञांच्या लगेच लक्षात आलं.

मिथेन गॅस हा भूगर्भातून निघून वातावरणात पसरू शकतो असा संभाव्य धोका या शास्त्रज्ञांना जाणवला. तो धोका टाळण्यासाठी त्यांच्यातील एका शास्त्रज्ञाने जमिनीमध्ये आग लावली होती असं सांगितलं जातं.

कारकूम वाळवंटात झालेल्या या घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार किंवा लिखित पुरावा किंवा सीसीटीव्ही कव्हरेज उपलब्ध नाहीये.

तुर्कमिनिस्तानच्या स्थानिक नागरिकांना याबद्दल विचारल्यावर कोणाला याबद्दल काहीच माहिती नाहीये. १९७१ मधील तुर्कमिनिस्तानचे वर्तमानपत्र जरी बघितले, तरी कोणत्याही वर्तमानपत्राने किंवा वृत्तवाहिनीने या घटनेची माहिती प्रकाशित किंवा प्रदर्शित केली नव्हती.

तुर्कमिनिस्तान मधील एका भूगर्भशास्त्रज्ञाने कारकूम वाळवंटातील हे खड्डे १९६० मध्ये निर्माण झाल्याची नोंद केली आहे. त्यांचा शोध लागेपर्यंत १९८० चं वर्ष उजाडावं लागलं असं त्याने आपल्या भूगर्भ अभ्यास नोंदीत म्हंटलं आहे.

तुर्कमिनिस्तानमध्ये कारकूम वाळवंटातील या जागेबद्दल इतरही बरेच समज आहेत. ‘फ्लेअरिंग टेक्नॉलॉजी’चा या ठिकाणी वापर करून भूगर्भातील नैसर्गिक वायू काढले गेले असावेत असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतो.

 

gates to hell inmarathi2

 

सोविएत युनियनसाठी हा ‘नरकाचा दरवाजा’ प्रतिष्ठेचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण करत असल्याने त्याबद्दल कुठेच माहिती प्रकाशित केली गेली नाही असं राजकीय विश्लेषक सांगत असतात.

२. आग थांबवता कशी आली असती?
सोव्हित युनियनने जर १९८० च्या दशकात या जागेच्या आसपास काही बांधकाम केलं असतं तर या खड्ड्यातून निघणारा नैसर्गिक वायू हा त्यांच्या वापरात आला असता, पण त्यासाठी सरकारला खूप जास्त खर्च करावा लागला असता म्हणून सोव्हित युनियनने ही आग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असावा.

मिथेन गॅस हा प्रमाणापेक्षा अधिक जर वातावरणात पसरला तर आरोग्यास हानिकारक ठरू शकतो म्हणून सुद्धा त्याला जाळण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.

३. पर्यटकांना इथे काय आकर्षण वाटतं?

तुर्कमिनिस्तान देशाने कारकूम वाळवंटातील ही जागा पर्यटकांना खुली करण्याचं कारण हे आहे, की इथे आल्यावर लोकांना अंतराळात असल्याची भावना निर्माण होते. आता ही जागा दिवस आणि रात्र या दोन्ही वेळेस इथे लोकांची त्यामुळेच गर्दी होत असते.

४. ‘नरकाचा दरवाजा’ कधी व का बंद होणार?

 

gates to hell inmarathi3

 

७ जानेवारी २०२२ रोजी तुर्कमिनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गुरूबांगुली यांनी टीव्हीवर दिलेल्या संदेशात लोकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून ‘गेट्स ऑफ हेल’ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. २०१० मध्ये सुद्धा तुर्कमिनिस्तानच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेतला होता, पण सामग्री अभावी हे शक्य झालं नव्हतं.

तुर्कमिनिस्तानच्या पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार दरवर्षी या जागेला ६००० पेक्षा अधिक पर्यटक भेट देत असतात. राष्ट्राध्यक्ष गुरुबांगुली हे पर्यटनातून येणारं उत्पन्न दुर्लक्षित करून लोकांच्या आरोग्यास हितकारक हा निर्णय आमलात आणतील का? या प्रश्नाकडे सध्या जगाचं लक्ष लागलं आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?