' चीनचा अमानुषपणा, कोव्हीड संशयित रुग्णांना डांबतायत ‘मेटल बॉक्स’मध्ये – InMarathi

चीनचा अमानुषपणा, कोव्हीड संशयित रुग्णांना डांबतायत ‘मेटल बॉक्स’मध्ये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकामागोमाग एक खचाखच भरलेल्या बसेसमधून कोविड संशयित रुग्णांना क्वारंटाईन सेंटर्स मध्ये हलवलं गेल्याचे चीनमधले अत्यंत भयानक व्हिडियोज सोशल मीडियावर दिसत आहेत. या रुग्णांना ‘मेटल बॉक्सेस’ मध्ये ठेवलं जात असल्याचं आढळलं आहे.

सोशल मीडियावरच्या बऱ्याच व्हिडियोजमधून असं दिसतंय की ओमिक्रॉनच्या काही केसेसची नोंद झाल्यानंतर ‘क्सियान’, ‘अन्यांग’, ‘युझहोऊ’ इथल्या नागरिकांना क्वारंटाईन केलं गेलंय. ही दृश्यं दिसताना एखाद्या ‘डिस्टोपियन चित्रपटा’तल्या दृश्यासारखी दिसतात. मात्र चीनने कोविडच्या विरोधात लढण्याच्या उद्देश्याने खरोखरच कुणालाही अमानुष वाटतील अशी पावलं उचलली आहेत.

 

 

चीनचं हे अश्या प्रकारचं धोरण जरी चिनी नागरिकांचं हित डोळ्यांसमोर ठेवून उचललं गेलं असलं तरी त्या धोरणाची तीव्रता चिनी नागरिकांपासून इतक्या दूरवर असलेल्या आपल्यालादेखील माणूस म्हणून हादरवून सोडणारी आहे.

‘झिरो कोविड’ या धोरणाअंतर्गत चीनने हे अमानुष निर्बंध तिथल्या नागरिकांवर लादले आहेत. पुढल्या महिन्यात ‘विंटर ऑलिंपिक्स’ चं सूत्रसंचालन करण्याची बीजिंगची तयारी सध्या सुरू आहे. याच धर्तीवर बहुधा आउटब्रेक चा धोका उद्बवायाला नको म्हणून चीनने इतके कडक निर्बंध लादले असण्याची शक्यता आहे.

 

chin 1 inmarathi

 

या ‘मेटल बॉक्सेस’मध्ये ज्याप्रकारे माणसांना डांबलं जातंय ते दृश्यं व्हिडियोमध्ये पाहतानाही अत्यंत विदारक दिसतंय. या ‘मेटल बॉक्सेस’मध्ये लाकडी बिछाना आणि टॉयलेट इतक्याच सुविधा माणसांसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. अगदी गर्भवती महिला, लहान मुलं आणि वयस्कर मंडळीही या जाचातून सुटू शकलेली नाहीत. त्यांनाही या ‘मेटल बॉक्सेस’मध्ये डांबलं गेल्याचं आढळून आलं आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, स्थानिक रहिवाश्यांपैकी अगदी एखादी व्यक्ती जरी कोविड पॉझिटिव्ह आढळली तरीदेखील संपूर्ण दोन आठवडे त्या सगळ्यांना क्वारंटाईन केलं जाण्याच्या घटना घडत आहेत.

हे निर्बंध इतके कडक असल्याचं समजतंय की बऱ्याच ठिकाणच्या रहिवाश्यांना अगदी मध्यरात्री उठवूनही क्वारंटाईन सेंटर्समध्ये जायला सांगितल्याचा अनेक घटना घडत आहेत. ट्रॅक अँड ट्रेस या चीनमध्ये सक्तीच्या असलेल्या ऍप्स द्वारे रुग्णांचा शोध घेण्यात येतो आणि त्यांना त्यानंतर लगेचच क्वारंटाईन केलं जातं.

 

china 3 inmarathi

 

चीनमधल्या जवळपास २० दशलक्ष लोकांना सक्तीने घरात थांबण्याशिवाय पर्याय नाहीये. अगदी पोटासाठी आवश्यक असलेले जिन्नस, अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठीदेखील त्यांना बाहेर पडू न दिल्याच्या घटना पहायला मिळत आहेत.

 

chin 3 inmarathi

या सगळ्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली. चीनमधल्या लॉकडाऊनच्या या बेजार करून सोडतील इतक्या कडक निर्बंधांमुळे एका गर्भवती महिलेला वैद्यकीय उपचार मिळायला उशीर झाला आणि तिचा गर्भपात झाला. सहाजिकच लोकांच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया यावर उमटल्या.

चीनच्या कोविडविरोधातलया धोरणाचे जर इतके भयानक परिणाम समोर येणार असतील तर या धोरणावर, त्याच्या कडक निर्बंधांवर पुनर्विचार व्हायला हवा यासंदर्भात वादाची ठिणगी पडली.

२०१९ साली चीनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोरोना व्हायरस आढळला होता. चीनला तो तेव्हा नियंत्रणात न आणता आल्यामुळे तो अतिशय भयाण रूप घेत जगभर पसरला आणि मानवतेचं सर्वतोपरी नुकसान झालं. मात्र आउटब्रेक नियंत्रणात आणण्यासाठीचं एक सूत्र चीनकडे आहे ज्याला ‘डायनॅमिक झिरो’ असं म्हटलं जातं.

असं लक्षात आलं आहे, की या सूत्राद्वारे अतिशय कडक निर्बंध असलेलं लॉकडाऊन चीनमध्ये सगळीकडे केलं जातं आणि अगदी त्वरेने प्रचंड मोठ्या समूहाच्या कोविड चाचण्या घेतल्या जातात. चिनी नागरिकांसाठी हे सगळं फारच त्रासदायक ठरणारं असू शकतं.

 

chin 2 inmarathi

 

बाकी सगळीकडे चीनच्या मानाने लॉकडाऊनचे निर्बंध तसे शिथिल आहेत. चीनमध्ये मात्र ज्या ज्या नागरिकांपासून कोरोना होण्याचा धोका फार जास्त आहे अश्या चीनमधल्या नागरिकांना ते राहात असलेल्या इमारती सोडून बाहेर पडण्याची किंवा ते ज्या हॉटेल रूम्स मध्ये थांबले आहेत तिथून बाहेर पडण्याची मुळीच परवानगी नसल्याचं समजतंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?