' पेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच 'उद्योगांमुळे' गेला रसातळाला ...

पेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच ‘उद्योगांमुळे’ गेला रसातळाला …

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नव्वदच्या दशकात एक पेन कंपनी अचानक प्रकाशझोतात आली. सलमान खान, अमिताभ बच्चन, रविना टंडन अशा त्या काळातल्या टॉपच्या कलाकारांनी या पेनची जाहिरात केली. आजही यांची स्लोगन, लिखते लिखते लव हो जाए लोकांच्या लक्षात आहे.

एका सामान्य पेननं इतकी धमाकेदार जाहिरात करणं हे त्याकाळात नवीन होतं. या पेनच्या कंपनीचं नाव होतं, रोटोमॅक आणि याचे मालक होते विक्रम कोठारी. याच कोठारीनं थोडा थोडका नव्हे तर तब्बाल पाच हजार कोटींचा घोटाळा करून पोबारा केला. देशातील जी मोठी आर्थिक कांड झाली त्यापैकी हे एक समजलं जातं.

 

roto 1 inmarathi

 

इंडियाज मोस्ट वॉण्टेड यादीत अतिरेकी, गुन्हेगार यांच्यासोबतच प्रचंड मोठ्या रकमांचे आर्थिक घोटाळे करून पोबारा केलेली मंडळीही आहेत. यात अग्रस्थानावर किंगफिशरच विजयल मल्ल्या, हिरे व्यापारी निरव मोदी यांची नावं आहेत तर त्यांच्या खालोखाल ज्याचं नाव घेतलं जातं तो विक्रम कोठारी, यानं एका पेनच्या जिवावर तब्बल पाच हजार कोटींचा घोटाळा करून देशातील बॅन्काचा कारभार चव्हाट्यावर आणून ठेवला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हर्षद मेहता पासून कोठारीपर्यंत सर्व मोठ्या घोटाळ्यात बँकांचा मोठा हात आहे. घोटाळे करणारे बँकातून कोटीच्या कोटी कर्जं सहजपणे घेऊ शकतात याला कुठेतरी या बॅन्कांचं या घोटाळेबाजांवर असणारं आंधळं प्रेम आणि हावरटपणाही कारणीभूत आहे. सामान्य माणसाला एक वडापावचा गाडा घालायचा असूदे की साधी बाईक घ्यायची असूदे या बँका सतराशे साठ कागदपत्रं मागतात आणि नंतरही भीक दिल्यासारखं कर्ज देतात शिवाय ते परतफ़ेडीसाठी तगादाही लावतात.

मल्ल्या, कोठारी, मोदी सारखी माणसं मात्र तोंडापेक्षा मोठा आ करतात आणि या बँका अगदी सहजपणानं हौसेनं कोट्यावधींच्या रकमा या आर्थिक घोटाळेबाजांच्या तोंडात घालतात. कमवा आणि कमवू द्या या परस्पर सहकार्य कार्यक्रमांतर्गत या घोटाळ्यांची रचना होते.

 

fraud idiots inmarathi

 

कोण होता विक्रम कोठारी?

मनसुखभाई कोठारी हे कानपूरमधील एक प्रतिथयश व्यापारी होते. १९७३ साली त्यांनी एका गुटख्याची पान मसाला या नावानं निर्मिती केली. पान पराग पान मसाला या गुटख्याची त्यांनी निर्मिती केली आणि प्रतिथयश कलाकार घेऊन त्याची जाहिरात करत विकला तेच हे मनसुखभाई. मनसुखभाई कोठारीला दोन मुलं, विक्रम आणि दीपक.

या दोन्ही मुलांनी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरवात केली. मुलांच्या मदतीनं मनसुखभाई पान मसाला व्यवसायात जबरदस्त नफ़ा कमवायला आणि हात पाय पसरायला सुरवात केली. १९८० साली पान मसाल्या व्यतिरिक्त कोठारी कुटुंबानं रोटोमॅक नावानं स्टेशनरी व्यवसायात उडी घेतली. कुटुंब कलहाचा शाप लागला आणि १९९९ हा कौटुंबिक व्यवसाय विभागला गेला.

 

roto inmarathi

 

दीपककडे पान मसाला आणि विक्रमकडे रोटोमॅक हा स्टेशनरी बिझनेस आला. विक्रमनं केवळ स्टेशनरी व्यवसायावर न थांबता रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड, कोठारी फ़ूडस ॲण्ड फ़्रेगरन्सेस, क्राऊन अल्बा रायटिंग इन्स्ट्रुमेंटस, मोहन स्टील्स लिमिटेड, आरएफ़एल इन्फ़्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि., रेव्ह एण्टरटेन्मेंट प्रा.लि. या कंपन्यांची निर्मिती तसेच रिअल इस्टेट व्यवसायातही गुंतवणूक केली.

विक्रम कोठारीला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्य हस्ते भारत सरकारच्या मिनिस्टरी ऑफ़ कॉमर्सचा सर्वोत्तम एक्सपोर्टरचा पुरस्कारही मिळाला होता. सगळं सुरळीत चाललेलं असतानाच याच विक्रम कोठारीच्या आर्थिक घोटाळ्याची कुणकुण लागली आणि एकामागे एक थक्क करणारी प्रकरणं बाहेर पडू लागली.

roto 2 inmarathi

 

कोणत्या बँकेचे किती कर्ज?

काही रिपोर्टसनुसार विक्रम यांनी २०१० मधे बँकांकडून  कर्ज घ्यायला सुरवात केली. हे कर्ज साधारण ३ हजार कोटिंचं कर्ज घेतलं जे व्याज लागून चार हजार कोटिंचं झालं. तर काही वृत्तानुसार, विक्रम यांनी २०१२ साली अलहाबाद बँकेकडून कर्ज घेतलं आणि त्यानंतर पाच सरकारी बँकांकडून त्यानं कर्ज घेतलं आणि व्याजासहित त्याची रक्कम पाच हजार कोटी झाली.

इंडियन ओव्हरसीज बँक – १४०० कोटी, बँक ऑफ़ इंडिया- १३९५ कोटी, बँक ऑफ़ बडोदा- ६०० कोटी, युनियन बँक- ४८५ कोटी, अलाहाबाद बँक- ३५२ कोटी अशा या रकामा आहेत. याशिवाय विक्रम कोठारीवर ६०० कोटींच्या चेक बाऊन्सचाही गुन्हा आहे. याच प्रकरणात पोलिस तपास चालू होता.

 

bank of baroda inmarathi
livemint

इतक्या मोठ्या रकमा बँकांनी दिल्याच कशा?

जितका मोठा व्यापारी तितकं बँकांची वर्तवणूक सौहार्दाची असते. कोठारीला इतकी मोठी कर्ज मिळण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे मनसुखभाई यांच्या नावाचा दबदबा. तसेच विक्रम कोठारीच्या संपत्तीचं ओव्हर व्हॅल्युएशन केलं गेलं. अर्थात जितक्या रकमेची संपत्ती होती ती रक्कम फुगवून दाखविण्यात आली आणि यावर कर्ज मंजूर करण्यात आलं. कोट्यावधींच कर्ज घेऊन विक्रम कर्जबारी झाले.

बँकांचे पैसे थकले आणि बॅन्का (नेहमीप्रमाणे) जाग्या झाल्या. असं सांगितलं जातं की ज्या ज्या बँकांकडे कोठारीची थकबाकी होती त्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीत कोठारी त्यांचा मुलगा राहूलसोबत उपस्थित होते. त्यांनी आश्वसनदिलं की बँकांचे सर्व कर्ज फेडलं जाईल.

 

personal-loan-featured-inmarathi

 

यानंतर मात्र विक्रम कोठारींबाबत कसली ही बातमी बाहेर आली नाही की त्यांच्याशी कोणाचा संपर्क झाला नाही. त्यांच्या मुलाशी संपर्क होत होता मात्र विक्रम जसे काही हवेत गायब झाले आणि अनेक चर्चांना तोंड फ़ुटलं. निरव मोदीप्रमाणेच विक्रम कोठारी ही देशाबाहेर पळून गेल्याच्या बातम्या आल्या.

अखेर विक्रमनी जाहिर केलं की ते कानपूरमधेच आहेत, भारत सोडून कुठेही गेलेले नाहीत. ही वसूली करण्यासाठी बँका कर्जदाराची संपत्ती लिलाव करतात. त्यानुसार अलाहाबाद बँकेने विक्रम कोठारीच्या स्थावर संपत्तीचा लिलाव जाहिर केला मात्र विक्रम कोठारी याचा दबदबा इतका होता की या लिलावात मोठी बोली कोणी लावलीच नाही आणि लिलाव रतबादल झाला.

गंमत अशी आहे की ओव्हरसीज बँके कोठारीनं जितकी रक्कम सिक्युरिटी म्हणून एफडी केली त्याच्या सहापट रकमेचं कर्ज घेतलं. त्यामुळे कोठारीची सगळी संपत्ती जप्त केली तरिही एकट्या ओव्हरसीज बॅन्केचं कर्जही फिटू शकणार नाही.

 

overseas bank inmarathi

 

दरम्यान बँकांनी हे कर्ज एनपीए (नॉन परफ़ॉर्मिंग असेटस) मधे जमा केलं. एनपीए म्हणजेच बँकेने ज्या वसूलीची आशा सोडली आहे अशी रक्कम. या प्रकरणात साधारणपणे सरकारवर ताशेरे ओढले जातात मात्र बँका यातून अलगद सुटून बाजूला होतात.

सीबीआय नं २३ फ़ेब्रुवारी २०१८ ला त्याला अटक केली. साधारण दोन वर्षं जेलमधे काढल्यानंतर तब्येतीच्या कारणावरून त्याला जामिन मिळून तो सुटला. वयाच्या ७३ व्या वर्षी उत्तरप्रदेशातील त्यांच्या रहात्या घरात छोट्याशा अपघाताचं निमित्त होऊन ४ जानेवारी २०२२ या दिवशी इहलोक सोडून गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?