' महेश मांजरेकर यांच्यावर स्त्रीशक्तीने केलेले ९ आरोप

महेश मांजरेकर यांच्यावर स्त्रीशक्तीने केलेले ९ आरोप

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबईतील गिरणीकामगारांचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांनी ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या नव्या चित्रपटाचा घाट घातलाय खरा, मात्र चित्कपटाच्या केवळ ट्रेलरवरूनच खडाजंगी रंगली. अतिभडक दृश्य, अंगावर काटा आणणारे संवाद, लहान मुलांच्या तोंडी दिल्या गेलेल्या शिव्या आणि मुख्यतः अल्पवयीन मुलांचे प्रौढ स्त्रियांशी चाललेले अश्लिल चाळे ही मांजरेकरांची कल्पकता सुसंस्कृत प्रेक्षकांना पटणे शक्यच नाही.

 

nay varan bhat loncha scenes IM

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चित्रपटाचा ट्रेलर पाहताच राज्याच्या बालहक्क आणि महिला आयोगाने मांजरेकरांची तक्रार नोंदवली. आता भारतीय स्त्री शक्ती मंचानेही महेश मांजरेकरांविरोधात आगपाखड केली आहे. याबाबतचे एक खरमरीत पत्रच प्रसिद्ध करण्यात आले असून त्याव्दारे महिलावर्गाला या कलाकृतीबद्दल नेमके काय वाटते? हे उघड झाले आहे.

,प्रति, दिनांक : १२/०१/२०२२
मा. पोलिस निरीक्षक
___पोलिस स्टेशन,
_____ , मुंबई.

.
विषय : दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नरेंद्र हिरावत व श्रेयस हिरावत, सह निर्माता विजय शिंदे, एन. एच . स्टुडिओ, नाईनटी नाईन प्रोडक्शन , व नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा च्या अन्य संबंधित व्यक्ती यांच्यावर पॉक्सो कलम 13, भारतीय दंड संहिता कलम 292 व महिलांचे विभत्स प्रदर्शन कायदा कलम 2 (c) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत,

महोदय,

मी सौ सीमा देशपांडे रा. प्रभादेवी मुंबई, भारतीय स्त्री शक्ती ची मुंबई अध्यक्ष व महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष आपणास खालीलप्रमाणे तक्रार देत आहे की,
भारतीय स्त्री शक्ति महिला सक्षमीकरणाचे काम गत ३३ वर्षांपासून करत आहे. लिंगभेदामुळे महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भारतीय स्त्री शक्ति काम करते.तसेच समाजात घडणाऱ्या चुकीच्या व अन्यायकारक घटनांच्या विरोधात भारतीय स्त्री शक्ति त्वरित आवाज उठवते.

युट्युब वर एन एच मराठी या यूट्यूब चैनल वर तीन दिवसांपूर्वी अपलोड केलेला “नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा” या चित्रपटाचा ट्रेलर दिसला. सदर ट्रेलर चे पोस्टर पाहिल्यावर काही कलाकार त्यामध्ये दिसत आहेत तसेच सर्वात पुढे दोन बाल कलाकार हे असून त्यांच्या कपड्यांना रक्त लागलेले आहे. त्यामुळे मी सदर व्हिडिओ पाहिला असता सदर व्हिडिओ बघून मला जोरदार धक्का बसला.

सदर विडिओ हा १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर असल्याचे म्हटले आहे. सदर चित्रपट हा पैसे कमविण्याच्या उद्देशाने बनविलेला असून २ मिनिटे व २४ सेकंदच्या या व्हिडिओ मध्ये दोन अल्पवयीन बालकांना लैंगिक कृतीमध्ये, बिभत्स पणे दाखवले आहे तसेच यातील आक्षेपार्ह गोष्टी खालील प्रमाणे आहेत.

 

 

trailer im

 

१) या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच दोन लहान मुले ज्यांचे वय अंदाजे १३ ते १५ असेल ते अगदी शांतपणे रक्ताचे हात धुताना दिसत आहेत व त्याठिकाणी तीन जणांचे मृतदेह पडलेले आहेत. तेच दोन मुले दुसऱ्या दृश्यात दिसत असून त्यामधील एक कुणी मारले असे विचारताना दिसत आहे. या वरून लहान मुलांना खुनी असल्याचे सदर विडिओ मध्ये दाखविले आहे व खून करून सुद्धा कोणताही पश्चातप त्यांना झालेला दिसत नाही.

२) या व्हिडिओ मध्ये, लहान मुलांच्या तोंडी ‘आयीझव,’ ‘लवडे लागलेत मुंबईचे,’ ‘आयीघाल्या,’ ‘च्युत्या,’ ‘भेंचोद,’ ‘गांडू’, ‘मादरचोद’ अशा अर्वाच्य शिव्या अल्पवयीन मुलांच्या तोंडी दाखविल्या आहेत.

३) सदर व्हिडिओ मध्ये लहान मुलांनी अनेकांना मारहाण केल्याचे तसेच अमानुषपणे चाकू भोसकल्याचे दाखवलेले आहे जे भयंकर आहे.

४) या व्हिडिओ मध्ये लहान मुलांसोबत अश्लील चित्रण केलेले असून अर्धनग्न स्त्रियांना त्यांच्यासोबत दाखवलेले आहेत. तसेच स्वतःच्या काकीबद्दल चुकीचे विचार करण्या बद्दलचे संवाद या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत.

५) दोन निरागस मुलांच्या तोंडी नको नको ते संवाद दिलेले आहेत. जसे एक मुलगा दुसऱ्याला म्हणतो की, ‘बी पी (अश्लील सिनेमा) आणताहेत पप्पीच्या घरी’. त्यावेळी दिघ्या नावाचा मुलगा त्यास म्हणतो की, ‘टीव्हीवर कशाला बघायचं लाईव्ह तुला दाखवतो’ व तो त्याला एका जोडप्याचे सुरू असलेले संभोग चोरून दाखवण्यास घेऊन जातो.

६) एका ठिकाणी असा संवाद दोन्ही अल्पवयीन मुलांमध्ये दाखवला आहे की एका मुलाचे वडील हे ‘भाई’ म्हणजे गुंड प्रवृत्तीचे असतात व मोठा झाल्यावर तो सुद्धा गुंड बनणार असे म्हणतो. त्यावेळी दुसरा लहान मुलगा त्याला म्हणतो की मी सुद्धा तुझा उजवा हात म्हणून तुझ्यासोबत काम करेल.

 

mahesh manjrekar im

 

७) या ट्रेलर मधील काकी ही स्वतःच्या पुतण्यास नको त्या गोष्टीस उत्तेजित करीत असल्याचे दाखवले आहे. एका दृश्यामध्ये अल्पवयीन मुलास एका अर्धनग्न महिलेसोबत अंघोळ करतानाचे बाथरूम मधील दृष्य दाखवले आहे.

८) एक महिला तिच्या बाळास दूध पाजत असताना तिच्याकडे तो अल्पवयीन मुलगा वासनांध नजरेने बघत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवले आहे.

९) या व्हिडिओच्या शेवटच्या दृश्यांमध्ये या दोन अल्पवयीन मुलांनी एका जोडप्यास बंदिस्त करून ठेवलेले आहे व ते नग्नावस्थेत दाखवले असून पतंगाच्या मांजाने त्या जोडप्यातील पुरुषाच्या शरीराचा भाग ते कापणार असे दाखवले आहे.

 

scene im

 

सध्या लॉकडाऊन मुळे ऑनलाइन शाळा होत असल्यामुळे जवळपास सगळ्याच लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन आलेले असून ऑनलाईन शाळेसाठी इंटरनेट गरजेचे असल्यामुळे प्रत्येकाकडे इंटरनेट सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांचा सहभाग असलेला या प्रकारचा अश्लील ट्रेलर युट्युब या माध्यमावर टाकलेला असून हा व्हिडीओ पाहून अनेक लहान मुलांच्या बाल मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असून या दृश्यामुळे लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास मदत होईल.

जरी हा चित्रपट अठरा वर्षाच्या पुढील लोकांसाठी असला तरी यामध्ये ज्या प्रकारे बालकांचा वापर केलेला आहे तो लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण २०१२ (POCSO) या कायद्याअंतर्गत गुन्हा असून अशाप्रकारे ट्रेलर व चित्रपट बनवून बालकांचा चुकीचा वापर करून आरोपी त्याद्वारे अर्थार्जन करीत आहेत. तरी एन. एच . स्टुडिओ, नाईनटी नाईन प्रोडक्शन , दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नरेंद्र हिरावत व श्रेयस हिरावत, सह निर्माता विजय शिंदे व नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा च्या अन्य संबंधित व्यक्ती वर लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण २०१२ (POCSO) कलम 13,14,15 r/w 8, 12 भारतीय दंड संहिता कलम 292 r/w 34 व महिलांचे बिभत्स प्रदर्शन कायदा कलम 2 (c)या कायद्याअंतर्गत व अन्य संबंधित कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा हि विनंती.

आपली विश्वासू
सीमा देशपांडे
भारतीय स्त्री शक्ती मुंबई अध्यक्ष

तुम्हालाही हे आरोप पटतात का? तुम्हीही या मुद्द्यांशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?