' भारत- पाक फाळणीत दोन भाऊ झाले वेगळे, ७४ वर्षांनी झाली गळाभेट – InMarathi

भारत- पाक फाळणीत दोन भाऊ झाले वेगळे, ७४ वर्षांनी झाली गळाभेट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही कारणाने लहानपणी वेगळे झालेले दोन भाऊ खूप वर्षांनी अचानक एक दिवस एकमेकांना भेटतात ही स्टोरी कितीही फिल्मी वाटत असली तरी प्रत्यक्षात उतरली आहे.

हबीब आणि सिद्दीक या दोन भावांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सद्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.

भारत आणि पाकिस्तान फाळणी दरम्यान आपल्या जिवलगांपासून दुरावलेल्या अनेक लोकांच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. फाळणी दरम्यान काही परिवार सीमेच्या आलिकडे राहिले, तर काही लोकांनी सीमेच्या पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जवळच्या नात्यातील अनेक लोकं दुरावली.

 

partition inmarathi

 

याच फाळणीत दुरावलेल्या दोन भावांची तब्बल ७४ वर्षांनी भेट झाली आहे. ७४ वर्षांनंतर हे दोघे भाऊ ज्यावेळी भेटले त्यावेळी दोघे एकमेकांना बिलगून रडू लागले. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेचा एक व्हिडीओ आणि फोटोज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

१९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मोहम्मद सिद्दिक आणि त्याचा भाऊ हबीब उर्फ शेला हे दोघे खूपच लहान होते. भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळी सिद्दीक आपल्या परिवारासह भारतातून पाकिस्तानात गेले तर त्यांचे मोठे बंधू हबीब हे भारतात राहिले. आता तब्बल ७४ वर्षांनी हे दोन भाऊ पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताशी जोडणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोरमध्ये पुन्हा भेटले.

 

brothers inmarathi

 

हबीब हे सिद्दीक यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे आहेत. फाळणीच्या वेळी सिद्दीक हे आपल्या आईसह पंजाब येथील फुलेवाला इथे गेले होते. तर बठिंडामध्ये झालेल्या एका दंगलीनंतर सिद्दीक आणि त्यांच्या परिवाराला पाकिस्तानमध्ये जावं लागलं.

भावंडांच्या पुनर्मिलनाचा भावनिक क्षण कैद करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांची मनं जिंकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्दीक सध्यापाकिस्तानातील फैसलाबाद येथे स्थित असून शेला त्यांचा मोठा भाऊ हा भारतात पंजाबमध्ये राहतो.

काही दिवसांपूर्वी सिद्दिकने एका यूट्यूब चॅनेल वरून आपल्या भावाला भेटण्याची याचना केली होती. त्या नंतर दोघांच्या मित्रपरिवाराने एकमेकांबद्दल माहिती मिळवून संपर्क साधला. यामुळे तब्बल ७४ वर्षांनी दोघां भावांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या परिवार बद्दलची माहिती एकमेकांना सांगितली.

८० वर्षीय भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून रडताना पाहून फाळणीच्या कटू आठवणी उफाळून आल्या आहेत. कर्तारपूर कॉरिडोर हे पाकिस्तान मध्ये असून नोहेंबर २०१९ मध्ये ते भारतीयांसाठी चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे तब्बल ७ दशकांनंतर दोन भावांची भेट जुळून आली.

भारतातर्फे हबीब यांना भारतापासून पाकिस्तानात पाच किलोमीटर दूर अशा कर्तारपूर गुरुद्वारापर्यंत मोफत व्हिसा मुक्त सुविधा देण्यात आली. या सुविधेसाठी आणि भेटीसाठी कर्तारपूर कॉरिडोर उपलब्ध करून दिल्याबद्दल दोघांनी दोन्ही देशांच्या सरकारांचे आभार मानले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?