तुम्ही आजवर कधीही न ऐकलेले Bollywood facts!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

तुम्ही नेहमीच बॉलीवुड विषयी काही न काही वाचतच असाल. तरी देखील अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही तुमच्या कानी पडल्या नसतील. याचं रंजक गोष्टी आज आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.

१. वहीदा रहमानने अमिताभ बच्चनची प्रेमिका आणि आई या दोन्हीचा अभिनय केला आहे. १९७६ मध्ये आलेल्या ‘अदालत’ चित्रपटामध्ये ती अमिताभची प्रेमिका होती आणि १९७८ मध्ये आलेल्या ‘त्रिशूल’ मध्ये आई बनली होती.

bolywood-facts-marathipizza01
pinterest.com

२. अमीर खानचा चित्रपट लगान सर्वात जास्त ब्रिटीश कलाकारांना cast करणारा चित्रपट आहे.

bolywood-facts-marathipizza02
dvdbeaver.com

३. बॉलीवुड मध्ये येण्याच्या आधी सुनील दत्त एक RJ होते. ते रेडीओ Ceylon मध्ये काम करत होते आणि आपली आवडती अभिनेत्री नर्गिसची मुलाखत घेण्याची त्यांची इच्छा होती. जेव्हा नर्गिस त्यांच्या समोर आली तेव्हा ते काही बोलूच शकले नाहीत आणि मुलाखत रद्द करावी लागली. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी नर्गिस बरोबर ‘मदर इंडिया’या चित्रपटात काम केले, तेव्हा त्या दोघांमध्ये प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले.

bolywood-facts-marathipizza03
thebridalbox.com

४. चित्रपट ‘हिरोइन’ मध्ये करीना कपूरने जगातील वेगवेगळ्या डिझाइनर्स ने डिझाइन केलेले १३० ड्रेस घातले होते. याला बॉलीवुडचा सर्वात महाग Wordrobe पैकी एक मानले जाते.

bolywood-facts-marathipizza04
indiatimes.com

५.’दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ च्या लोकप्रिय पात्र राज मल्होत्रासाठी पहिली पसंती सैफ अली खानला दिली गेली होती.

bolywood-facts-marathipizza05
indiglamour.com

६. ‘रॉकस्टार’चे चित्रीकरण उलटया क्रमाने झाले होते. याचा शेवटचा भाग पहिला चित्रीत करण्यात आला आहे, कारण चित्रपट बनवणाऱ्यांना रणबीर कपूरचे केस खराब करायचे नव्हते.

bolywood-facts-marathipizza06
collegers.net

७. अनिल कपूर आपल्या कुटुंबाला घेऊन जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आले. तेव्हा ते राज कपूरच्या गॅरेज मध्ये राहत होते.

bolywood-facts-marathipizza07
s1.zetaboards.com

८. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’बॉलीवुडचा पहिला असा चित्रपट होता ज्या मध्ये दोन मध्यांतर होते.

bolywood-facts-marathipizza08
hindifilmstyle.wordpress.com

९. चित्रपट शोलेचे स्क्रिप्ट लिहिणाऱ्या जावेद अख्तरला वाटत होते की गब्बर सिंहच्या पात्रासाठी अमजद खानचा आवाज कमी आहे, म्हणून त्यांना या रोल मधून जवळपास काढून टाकण्यात आले होते.

bolywood-facts-marathipizza09
movies.ndtv.com

१०. एक तमिळ चित्रपट ‘मून्द्रू मुदिचू’ मध्ये श्रीदेवीने रजनीकांतच्या आईचा रोल केला होता. तेव्हा श्रीदेवी केवळ १३ वर्षांची होती.

bolywood-facts-marathipizza10
asridevi.blogspot.in

११. शेखर कपूरचे पहिल्यांदा शबाना आझमी बरोबर लग्न ठरले होते, परंतु नंतर हे लग्न मोडले होते.

bolywood-facts-marathipizza11
thebridalbox.com

१२. ‘मुगल-ए-आझम’ पहिला Trilingual चित्रपट होता. ह्याच्या प्रत्येक सीनचे चित्रीकरण तीनवेळा करण्यात आले होते. हिंदी,इंग्रजी आणि तमिळ मध्ये. तमिळमध्ये हा चित्रपट न चालल्याने इंग्रजी चित्रपटाचे चित्रीकरण लगेच थांबवण्यात आले.

bolywood-facts-marathipizza12
theunrealtimes.com

१३. इला अरुण आणि अलका याग्निक यांनी ’चोली के पीछे’ गाण्यासाठी सर्वोत्तम महिला प्लेबॅक गायक साठी अवॉर्ड शेयर केले होते. या व्यतिरिक्त बॉलीवुड मध्ये कोणत्याही गायकाने प्लेबॅकसाठी अवॉर्ड शेयर केलेले नाही.

bolywood-facts-marathipizza13
pikspost.com

१४. देविका राणी बॉलीवुड मधील पहिली अशी अभिनेत्री होती जिच्याकडे फिल्म मेकिंगची पदवी होती.

bolywood-facts-marathipizza14
alchetron.com

१५. ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाने २००२ मध्ये सर्वात जास्त अवॉर्ड जिंकले, म्हणून त्या चित्रपटाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव लिहिले होते. ह्या चित्रपटाने ९२ अवॉर्डस जिंकले होते.

bolywood-facts-marathipizza15
sonyliv

१६. ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ बॉलीवुडचे सर्वात मोठे गाणे आहे. हे गाणे २० मिनिटांचे आहे.

bolywood-facts-marathipizza16
youtube.com

१७. अमीर खान मौलाना अबुल कलाम आझाद यांचा वंशज आहे.

bolywood-facts-marathipizza17
indiatoday.intoday.in

१८. अभिनेत्री कल्कीचे आजोबा Eiffel Tower आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी निर्माण करताना चीफ इंजिनिअर होते.

bolywood-facts-marathipizza18
rapidleaks.com

१९. ऋतिकचे खरे आडनाव रोशन नाही, नागरथ आहे.

bolywood-facts-marathipizza19
namastenp.com

२०. अशोक कुमार अभिनेता बनण्याआधी बॉम्बे टॉकीज मध्ये लॅब असिस्टंट होते.

bolywood-facts-marathipizza20
thequint.com

२१. मेरा नाम जोकर आणि LOC कारगील दोन्ही बॉलीवुडचे सर्वात सर्वात मोठे चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांचा रन टाइम २५५ मिनिट आहे.

bolywood-facts-marathipizza21
dekhnews.com

२२. भारतातील लोक प्रत्येक वर्षी जवळपास २.७ बिलियन रुपयांची चित्रपटांची तिकिटे खरेदी करतात,परंतु इथे तिकिटांची सरासरी किंमत जगात सर्वात कमी आहे. त्यामुळे बॉलीवुडची कमाई हॉलीवुडपेक्षा खूप कमी आहे.

bolywood-facts-marathipizza22
indiatoday.intoday.in

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?