' पुष्पामध्ये दाखवल्या गेलेल्या रक्तचंदनाला एवढी मागणी का असते? – InMarathi

पुष्पामध्ये दाखवल्या गेलेल्या रक्तचंदनाला एवढी मागणी का असते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतात एखाद्या गोष्टीवर जर बंदी आणली तर तीच गोष्ट सर्वात जास्त खपते, मग ते प्राण्यांच्या कातडीची तस्करी असो किंवा दारू असो, आज भारतातील काही राज्यांमध्ये दारूबंदी असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर दारू विकली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जंगलतोड हा प्रश्न गंभीर असतानाच जंगलातील प्राण्यांची सर्रास शिकार करून त्यांची कातडी परदेशात पाठवली जाते. एकूणच या तस्करी प्रकरणात अनेक मोठी मंडळी असतात, जी क्वचितच हाती लागतात. मुंबईत ७०, ८० च्या दशकात सोन्या चांदीची तस्करी मोठया प्रमाणावर व्हायची. आज अमली पदार्थंवर बंदी असूनसुद्धा सर्रास गल्ल्लीबोळात हे पदार्थ मिळतात.

 

gold 1 inmarathi

 

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती पुष्पा या साऊथ सिनेमाची अल्लू अर्जुनच्या नेहमीप्रमाणे दमदार अभिनय आणि ऍक्शनमुळे सिनेमा चांगलाच चर्चेत आहे, सिनेमाच कथानक काही वेगळे नाही, एक साधा मजूर ते माफिया डॉन असा त्याचा प्रवास सिनेमात दाखवला आहे. रईस सिनेमात जसा शाहरुख दारूचा व्यापार करत असतो तसंच यात लाल रक्तचंदनाच्या तस्करीचा मुद्दा घेतला आहे, सामान्य लाकूड आणि चंदनाचं लाकूड त्यातही लाल चंदन, नेमकं यात असं काय वैशिष्ट्य आहे चला तर मग जाणून घेऊयात…

 

pushpa scenes IM

 

लाल रक्तचंदनाला मागणी का?

रक्तचंदनाला आज भारताचं नव्हे तर चीन, म्यानमार जपान आणि इस्ट एशिया या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. लाल रक्तचंदनचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. इन्स्टिटयूट ऑफ वुड सायन्स अँड टेकनॉलॉजी यांच्या मते लाल रक्त चंदनाच्या लाकडाचा उपयोग डोके दुखी, पित्त, त्वचा रोग, फोड, ताप, विंचू दंश इत्यादी आजरांवर होतो. 

 

red 1 inmarathi

 

केवळ औषधी गुणधर्म नव्हे तर मानवी आयुष्य सुखी करणाऱ्या संगीतात देखील याचा उपयोग होतो. तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे संगीतामध्ये अनेक प्रकराची वाद्य वाजवली जातात, त्या वाद्यांना याच चंदनाचे लाकूड वापरले जाते.

अनेकांच्या घरात देखील फर्निचरमध्ये याच लाकडाचा वापर केला जातो. खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा लाल रंग सुद्धा याच लाकडातून वापरला जातो. एका टनामागे ५० ते ६० लाख रुपये आंतराष्ट्रीय बाजरात मिळतात.

झाडाचा उगम :

भारतात प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडू आंध्रप्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये या चंदनाची झाडं आढळून येतात, सह्याद्री पर्वत रांग अगदी दक्षिणेपर्यंत पोहचली असल्याने याच पर्वतरांगेत विस्तीर्ण जंगले देखील आहेत. आज मदुमलाई जंगल हे तीन राज्यात पसरले आहे. त्यामुळे अशा जंगलामध्ये जैवविविधता आढळून येते. आकाराने हे झाड लहान असून त्याची उंची ५ ते ८ मीटर इतकी असते. त्याचे साल राखाडी रंगाचे असते.

 

red 2 inmarathi

तस्करी कुठे होते :

सर्वात जास्त रक्तचंदनाची झाडं ही कर्नाटकमध्ये आढळून येतात, वीरप्पन हा तस्कर याच चंदनाची तस्करी करायचा, असेच आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्याच्या सीमेवर जी जंगलं आहेत त्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. २०१५ साली आंध्र पोलिसांनी २० तस्करांचा एन्काऊंटर केला होता.

 

red 3 inmarathi

 

लाल रक्तचंदनाची निर्यात करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी आंतराष्ट्रीय बाजरात झालेल्या निर्यात बदलांमुळे या व्यवसायातून माघार घेतली आहे, ऑस्ट्रलियामध्ये सध्या चंदन लागवड मोठया प्रमाणावर होत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

वाढती लोकसंख्या, शहरीकरण यामुळे आसपासच्या जंगलांचा मोठ्या प्रमाणावर ह्रास होताना दिसून येत आहे, जंगलातील वन्यजीव आज सहज मानवी वस्तीत येत आहेत, त्यात अशा दुर्मिळ झाडांची कत्तल केल्यास काही वर्षात या झाड्याच्या प्रजाती नष्ट होतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?