' लहान मुलांचे प्रौढ बायकांसोबत तसले चाळे : मांजरेकरांचा सिनेमा ‘बोल्ड’ की ‘अश्लील’? – InMarathi

लहान मुलांचे प्रौढ बायकांसोबत तसले चाळे : मांजरेकरांचा सिनेमा ‘बोल्ड’ की ‘अश्लील’?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

येत्या मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच उद्या महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, गेले काही दिवस सोशल मीडियावर या सिनेमाविषयी बऱ्याच उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहेत.

लोकप्रिय लेखक जयंत पवार यांच्या कथेवर बेतलेला हा सिनेमा मांजरेकर यांच्या लालबाग परळ पठडीतलाच आहे. गिरणी कामगारांच्या मुलांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यावरच भाष्य करणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर सध्या चांगलाच गाजतोय.

 

nay varan bhat loncha IM

 

“दम असेल तर थिएटरात येऊन पाहायचं” असं धमकीवजा आव्हान देत महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं प्रमोशन केलं आणि सुरुवातीला त्याला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

नुकताच या सिनेमाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला आहे. सिनेमा हा १८ वर्षांवरील लोकांसाठी म्हणजेच प्रौढ लोकांसाठीच असला तरी या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच बरेच आपत्तिजनक सीन्स आहेत, आणि यामुळेच सध्या सोशल मीडियावर सगळेच याविषयी भाष्य करत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या मुलांच्या व्यथा आणि एकंदर तेव्हाची मुंबई या सगळ्याआड सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अर्वाच्य शिव्या, खून, मारामारी, हिंसा आणि अश्लील सीन्सचा भडिमार आपल्याला पाहायला मिळतो.

विशेष म्हणजे सिनेमाची २ मुख्य पात्रं ही किशोरवयीन मुलं आहेत आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या या आक्षेपहार्य सीन्समुळे सध्या चांगलीच खळबळ माजली आहे, आणि यामुळे समाजात एक चुकीचा संदेश जाऊ शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

 

nay varan bhat loncha scenes IM

सध्या आपण सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्म सर्रास फॉलो करतो त्यामुळे शिव्या, हिंसा आणि काही प्रमाणातल्या बोल्ड सीन्सना आपण सगळेच सरसावलो आहोत, पण एवढ्या लहान मुलांचे प्रौढ बायकांसोबतचे हॉट सीन्स इतक्या उघडपणे दाखवायची काहीच गरज नाही असं लोकांचं म्हणणं आहे.

या लहान मुलांना त्या गोष्टीतलं गांभीर्य कितपत ठाऊक आहे आणि प्रेक्षक त्या गोष्टी कशा स्वीकारतील असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

नुकतंच महिला आयोगाने या संदर्भात केंद्राच्या माहिती प्रसारण कार्यालयात याबद्दल तक्रार दाखल केली आहे, अल्पवयीन मुलाचे एका प्रौढ बाईसोबतचे शारीरिक संबंध उघडपणे आणि खूप बीभत्सपद्धतीने ट्रेलरमध्ये दाखवल्याने महिला आयोगाने यावर आक्षेप घेतल्याचं स्पष्ट होतंय.

 

mahesh manjrekar IM

 

शिवाय हा ट्रेलर सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर शेयर केल्याने तो कित्येक मुलांनी पाहिला असून त्यांच्या मनात या विषयाविषयी वेगळच कुतूहल निर्माण झाल्याने हा सिनेमा आणि त्यात दाखवलेली ही भडक दृश्यं कितपत गांभीर्याने घेतली जातील याबाबत शंका आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे यूट्यूबवर या ट्रेलरच्या खाली तुम्हाला फक्त चांगल्याच कॉमेंट पाहायला वाचायला मिळतील, शिवाय डिसलाईकसुद्धा बंद ठेवल्याने किती लोकांनी या ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे तेसुद्धा कळणं मुश्किल आहे.

सिनेमाविषयी कुणीच काही नकारात्मक बोलू नये किंवा चर्चा करू नये यासाठी सगळेच निर्माते या क्लूप्त्या वापरतच असतात. पण या चित्रपटाच्या ट्रेलरने इतका धुमाकूळ घातला आहे की लोकं त्याविषयी इतर प्लॅटफॉर्मवर चर्चा करू लागले आहेत.

 

सेक्रेड गेम्स, मिर्झापुर आणि तत्सम हिंदी वेबसिरीजमुळे नग्नता, बोल्ड सीन्स, शिवराळ भाषा, रक्तपात यांची लोकांना सवय झाली, पण ओटीटीवर कंट्रोल आपल्या हातात असतो, जेव्हा तुम्ही याच सगळ्या गोष्टी थिएटरमध्ये उघडपणे दाखवणार म्हटल्यावर साहजिक लोकांच्या भुवया उंचवणारच.

सिनेमाची कथा खूप ज्वलंत आहे आणि जयंत पवार यांच्या लेखनाविषयी आपण सगळेच जाणून आहोत, पण एखाद्या बोल्ड कथेचं पटकथेत रूपांतर करणंसुद्धा शिवधनुष्य पेलण्यासारखंच असतं.

हे शिवधनुष्य पेलण्यात मांजरेकर यांना कितपत यश आलंय हे सिनेमा बघितल्यावरच आपल्याला समजून येईल, पण उल्लू आणि इतर डिजिटल प्लेटफॉर्मवर दाखवतात त्याप्रमाणे हा सिनेमा म्हणजे बोल्ड सीन्सच्या नावाखाली गल्लाभरू ठरू नये अशी अपेक्षा करूयात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?