' बूस्टरचा फायदा होण्याची WHOलाच खात्री नसेल तर…?!!! – InMarathi

बूस्टरचा फायदा होण्याची WHOलाच खात्री नसेल तर…?!!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आपले आक्राळविक्राळ रुप दाखवणाऱ्या ओमायक्रॉनने चांगलाच तडाखा दिला आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा तक्रारी सध्या घराघरातून ऐकू येत असून नक्की आपल्याला कोरोना झालाय की ओमायक्रॉन, की केवळ फ्लु? यावर बऱ्याच चर्चाही रंगताना दिसतात.

अर्थात कारण काहीही असो ७ दिवस खोलीत रवानगी होणाऱ्यांची संख्या सध्या बरीच वाढली आहे. एकंदरितच टेल्टा, ओमायक्रॉन, त्यापाठोपाठ आता डेल्टाक्रॉन यासारखी कोरोनाची आणकी किती रुप भोगावी लागणार? हा प्रश्न आहेच.

 

cold inmarathi

 

पुढील काही काळ मास्कमुळे गुदमरणारा जीव, वाढणारी धास्ती कायम असली तरी गेल्या वर्षापासून मोठ्या संख्येने झालेल्या लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा धोका पुष्कळअंशी कमी झाला हे तज्ञांचे निरिक्षण आहे.

याच आधारावर आता ‘बुस्टर डोस’ देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. फ्रन्टलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांपुढील सहव्याधी नागरिकांना ‘बुस्टर’चा पर्याय शासनाने खुला केला आहे. दोन दिवसांपासून सर्वांच्याच मोबाईलवर खणखणणाऱ्या मेसेजेसवरून आता कुटुंबातील ज्येष्ठांकरिता बुस्टरची नोंदणी करण्यापुर्वी आधी हे वाचा.

बुस्टरची लगबग सुरु झाली असली तरी WHO ने मात्र याबाबत वेगळाच तर्क लढवला आहे.

 

WHO IM

 

WHO च्या निरिक्षणात असे सिद्ध झाले आहे की बुस्टर डोस हा ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी सध्याच्या कोणत्याही बुस्टर लसी हा पुर्णतः सुरक्षित नाहीत. याचाच अर्थ सध्या दिल्या जाणाऱ्या कोव्हॅक्सिन, कॉव्हिशिल्ड यापैकी कोणतीही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टस पुर्ण प्रभावी ठरत नसल्याची धक्कादायक बाब WHO ने उघड केली आहे.

 

 

covid vaccine inmarathi

 

WHO च्या मते आधीच्या व्हॅक्सिनचे डोस लागू पडले असले तरी हाच फॉर्म्युला पुढेही उपयोगी ठरेल ही शक्यता कमी आहे,

एवढंच नव्हे तर नव्या व्हेरियन्टचा अभ्यास करून अधिक प्रभावी लस विकसित करावी असा सल्लाही WHO तर्फे देण्यात आला आहे.

त्यामुळे एकीकडे बुस्टर डोस उपलब्ध झाले असले तरी WHO च्या म्हणण्यानुसार ते कमी प्रभावी असतील तर हा डोस घ्यावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता नव्या व्हेरियन्टसवर पुर्ण प्रभावी ठरणारी लस नेमकी कधी शोधली जाणार? ती सामान्यांपर्यंत कशी, कधी मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

त्यामुळे एकंदरित हा सगळा गोंधळ लक्षात घेता तुम्ही बुस्टर डोस घेणार की नाही? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?