' कोरोना- ओमिक्रोनवर औषध म्हणून मोलानुपिराविर गोळी, हे नक्की आहे तरी काय?

कोरोना- ओमिक्रोनवर औषध म्हणून मोलानुपिराविर गोळी, हे नक्की आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२० पासून कोरोनाने जगभरात सगळीकडे हाहाकार माजवला आहे. एकापाठोपाठ येणाऱ्या नवीन व्हेरियंट्समुळे सर्वांनाच हतबल झाल्यासारखे वाटते आहे. तरीही शास्त्रज्ञ, डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत रुग्णांचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोरोनावर नेमके कुठले औषध प्रभावशाली आहे ह्याचा जगभरात सगळीकडेच अभ्यास सुरु आहे. आता नव्याने येऊन धडकल्या ओमिक्रोनवर नेमका उपाय करायचा ह्यावर देखील संशोधन सुरु आहेच.

कोरोना अगदी झपाट्याने पसरतोय म्हणूनच कुटुंबातील एका सदस्याला दिलेली प्रिस्क्रिप्शन संपूर्ण कुटुंबासाठी आणि अगदी शेजाऱ्यापाजाऱ्यांना देखील कशी उपयोगी पडतेय हे आपण पाहिले आहे.

आपण असेही बघितले की लोक औषधांचा साठा करून ठेवतात जी कोविड उपचारात मदत करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सिद्धही झाली नाहीत. अनेक प्रायोगिक औषधे ‘COVID antidote’ म्हणून घेतली गेली.

बर्‍याच डॉक्टरांनी कोविड उपचार प्रोटोकॉलचे उल्लंघन केले कारण उपचाराचा विहित मार्ग त्यांच्या रूग्णांसाठी उपयोगी ठरत नव्हता आणि त्यांनी त्यांच्या रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्यांना जे योग्य वाटले ते केले.

 

covid-immunity IM

 

 

या सर्व गोष्टींमुळे स्टिरॉइड्सचा ओव्हरडोज, काही औषधांचा अनावश्यक वापर आणि ह्या प्रक्रियेत लोकांना आरोग्याच्या अनेक धोक्यांचा सामना करावा लागला हे ही आपण अगदी जवळून अनुभवले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये Ivermectin हे सर्वात जास्त ऐकले गेलेले (आणि वापरलेले) औषध होते, परंतु दुसऱ्या लाटेत त्याची जागा Remdesivir, Fabiflu, Azithromycin आणि प्लाझ्मा थेरपीने घेतली. आणि आता तिसरी लाट आलीये तर त्यावर उपाय म्हणून Molnupiravir आणि Monoclonal ह्या अँटीबॉडी कॉकटेल ह्या औषधांचा उपयोग केला जात आहे.

भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने मंगळवारी कोरोनाव्हायरस विरूद्ध प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरासाठी अँटी-व्हायरल औषध म्हणून मोलनुपिरावीरला मान्यता दिली आहे.

प्रसिद्ध सन फार्मा कंपनी ही मर्क शार्प डोहमे (MSD) आणि रिजबॅक कंपनीचे मोलनुपिरावीर औषध भारतात मोल्क्सवीर ह्या नावाने उपलब्ध करून देणार आहे. ह्या गोळ्या ओमिक्रॉनच्या विरूद्ध प्रभावी ठरतील अशी अपेक्षा आहे कारण त्या स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करत नाहीत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर अशी माहिती जाहीर केली की, “मोलनुपिरावीर हे अँटीव्हायरल औषध आता १३ कंपन्यांद्वारे देशात कोविड-१९ ग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी आणि ज्यांना रोग वाढण्याचा धोका जास्त आहे त्यांच्या उपचारांसाठी आणीबाणीच्या अंतर्गत प्रतिबंधित वापरासाठी तयार केले जाईल.”

 

tablet inmarathi

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवर नवीन अँटी-कोविड औषधांना आपत्कालीन मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, भारताने दोन नवीन कोविड-१९ लसींनाही मान्यता दिली आहे.

मोलनुपिरावीर म्हणजे काय आणि ते कसे वापरावे?

कोव्हीड-१९ची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी यूएस आणि यूके सारख्या अनेक देशांमध्ये मोलनुपिरावीर ह्या अँटीव्हायरल औषधाला मान्यता मिळाली आहे.

हे अँटीव्हायरल औषध १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या रूग्णांसाठी वापरण्याची आणि तत्काळ हॉस्पिटलायझेशन आवश्यक असलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी वापरण्याची परवानगी नाही. तसेच हे औषध सलग पाच दिवसांपेक्षा जास्त काळ वापरणे योग्य नाही किंबहुना तशी परवानगी नाही.

कोविड-१९ ची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेले रुग्ण घरातच राहून उपचार घेत असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाच दिवसांसाठी दिवसातून दोनदा मोलनुपिरावीर घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मोलनुपिरावीर हे औषध लहान मुलांना देण्यात येऊ नये कारण त्यामुळे हाडांच्या वाढीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तसेच गर्भामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने गर्भवती महिलांसाठी देखील ह्या औषधाची शिफारस केली जात नाही.

काही प्रसिद्ध डॉक्टरांनी असेही सांगितले आहे की ,”पॅरासिटामॉल, ऍन्टी ऍलर्जिक औषधे, स्टीम आणि गार्गल्स अशा लोकांसाठी उपचार सुरू करण्यासाठी पुरेसे आहेत ज्यांना धोका नाही.

 

tablets medicine inmarathi

 

मोलनुपिरावीर आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल औषधे ही केवळ वय, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड किंवा यकृत रोग यासारख्या जोखीम घटक असलेल्या रुग्णांसाठी आहेत. शिवाय, सध्या भारतात उपलब्ध असलेली अँटीबॉडी कॉकटेल औषधे ओमिक्रॉनवर काम करत नाहीत. त्यामुळेच ओमिक्रॉनचा सामना करणाऱ्या अनेक देशांमध्ये ती बंद करण्यात आली आहेत.

मोलनुपिरावीर वर सध्या संशोधन सुरु आहे. लसी न घेतलेल्या उच्च जोखमीच्या व्यक्तींमध्ये, रोगाच्या सुरुवातीच्या काळात वापरल्यास त्याची मर्यादित परिणामकारकता असते.

आतापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या चाचणीमध्ये, कोविड-१९ चे पूर्वीचे इन्फेक्शन झालेल्या असलेल्या रुग्णांवर, विषाणूचा भार कमी असलेल्या आणि मधुमेह असलेल्या रुग्णांवर औषधाचा कोणताही विशेष परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे. “

म्हणूनच तुमच्यापैकी कुणाला किंवा कुटुंबातील कुणाला जर ओमिक्रोनचे इन्फेक्शन झाले असल्याचा संशय असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

doctor prescription inmarathi

 

या  गोळीबद्दल आपण माहिती घेतलीच मात्र कालच १२ जानेवारी रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR यांनी घेतलेल्या बैठकीत असा निर्णय घेतला की मोलानुपिरवीर या गोळीचा सुरक्षतेच्या कारणास्तव कोव्हीड प्रोटोकॉलमधून या गोळीवर बंदी घालण्यात आली आहे.

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?