' बायकोचे 'अश्लील' व्हिडिओ काढणारा, तिला मारहाण करणारा : पुनम पांडेचा मिस्ट्रीमॅन..

बायकोचे ‘अश्लील’ व्हिडिओ काढणारा, तिला मारहाण करणारा : पुनम पांडेचा मिस्ट्रीमॅन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोशल मीडियाने जशा चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्या तशाच काही वाईट गोष्टीसुद्धा खूप बोकाळल्या. खासकरून instagram मुळे सोशल मीडिया स्टार आणि influencer या सगळ्या गोष्टी खूप फोफावल्या. याच प्रसिद्धीच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले ते पुनम पांडे नामक मॉडेलने.

आज इंटरनेटवर पुनम पांडे असं सर्च केलं की तिची ओळख अभिनेत्री म्हणून समोर येते. तसं तिने काही बी किंवा सी ग्रेड सिनेमात कामदेखील केलं आहे पण तरी तिची प्रथम ओळख हे मॉडेल म्हणूनच आहे.

 

poonam pandey IM

 

पुनम पांडे फार कमी काळात लोकप्रिय झाली ती म्हणजे फक्त तिच्या बोल्ड लुक आणि वादग्रस्त कृत्यांमुळे. अमुक अमुक टीम जिंकली तर मी संपूर्ण न्यूड फोटोशूट करेन असं म्हणणाऱ्या पुनम पांडेची ओळख हळूहळू “पोर्नम पांडे” अशी झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तिचे बोल्ड फोटोज आणि एक्का दुक्का सिनेमातले बोल्ड सीन्स यामुळे ती कायम चर्चेत असायची. पण मध्यंतरी instagram मध्ये ज्या प्रकारची क्रांती झाली त्यादरम्यान पुनम पांडे आणखीन मोठी सेलिब्रिटी बनली.

स्वतःचे न्यूड व्हिडिओशूट करून स्वतःच्या अधिकृत साईटवर ते विकणारी ही पाहिली भारतीय अभिनेत्री ठरली. याआधी हा प्रकार पाश्चिमात्य देशातल्या पोर्नस्टार्सपर्यंत मर्यादित होता, पण पुनम पांडेने ते अगदी सर्रास सुरू केलं आणि तिचे ते अश्लील न्यूड व्हिडिओजची छोटी झलक ती तिच्या instagram अकाऊंटवर शेयर करू लागली.

 

poonam pandey 2

 

मध्यंतरी तिचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक व्हिडिओ तिच्याच आकाऊंटवरून लिक करण्यात आला होता ज्यामुळे पुनम पुन्हा चर्चेत आली होती, पण काहीच काळापूर्वी आपल्या प्रायवसी पॉलिसीजमध्ये काही आलेल्या बादलांमुळे पुनम पांडेचं instagram अकाऊंट बंद करण्यात आलं. अर्थात यामागे तिच्या प्रोफाइलवरील नग्नतासुद्धा कारणीभूत होती.

पण पुनमच्या या व्हिडिओमध्ये किंवा तिच्या पोस्टमध्ये सतत दिसणारा तिचा नवरा सॅम बॉम्बे हा माणूस नेमका कोण आहे? बॉलिवूडमध्ये नेमकं त्याचं काय प्रस्थ आहे? याबद्दलच जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात.

पुनमच्या बऱ्याच हॉट आणि बोल्ड व्हीडिओजमध्ये दिसणारा किंवा ते व्हिडिओ स्वतः शूट करणारा सॅम बॉम्बे हा पुनमचा नवरा होता, त्यांनी २०२० मध्ये लग्नदेखील केलं पण मध्यंतरी ते गोव्यात गेले असताना त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

 

sam bombay IM

 

तेव्हा सॅम बॉम्बेने पुनमला जबरदस्त मारहाण केली, आणि पुनमने त्याच्या विरोधात गोवा पोलिसांत तक्रारदेखील नोंदवली आणि सॅम बॉम्बेला अटकदेखील झाली.

या सगळ्या प्रकारानंतर मीडियामध्ये याची बरीच चर्चा झाली, आणि पुनमच्या आयुष्यात आलेला हा मिस्ट्रीमॅन सॅम बॉम्बेवर लोकांनी प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली!

कोण आहे हा सॅम बॉम्बे?

हे नाव कितीही फॅन्सी वाटत असलं तरीही हे त्या माणसाचं खरं नाव नाही. २७ जानेवारी १९८४ साली दुबईमध्ये जन्मलेल्या सॅमचे फिल्मी फॅमिलीजशी चांगले सलोख्याचे संबंध आहेत.

शाळा आणि कॉलेजचं शिक्षण दुबईत पूर्ण करून फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या उद्देशाने सॅमने मुंबईत आपलं बस्तान बसवलं. सर्वप्रथम त्याने क्रिएटिव डायरेक्टर आणि मार्केटिंग क्षेत्रात काम केलं आणि मग हळूहळू जाहिरातक्षेत्रात त्याने स्वतःचं नाव निर्माण करायला सुरुवात केली.

जाहिरात क्षेत्रात त्याने दीपिका पदूकोण, तमन्ना, अल्लू अर्जुन, युवराज सिंग अशा मोठ्या लोकांसोबत काम केलं असून. टायगर श्रोफ उर्वशी रौतेला यांचे म्युझिक व्हिडिओसुद्धा त्यानेच डायरेक्ट केले आहेत.

 

sam bombay 3 IM

 

एकंदर त्याचं काम बघता बॉलिवूडमधलं हे एक मोठं प्रस्थ आहे हे स्पष्ट होतं.

पुनम सॅमची दुसरी पत्नी :

पुनम पांडे ही सॅमची दुसरी पत्नी आहे. मॉडेल एले अहमद हिच्याशी सॅमने प्रथम लग्न केले आणि तिच्यापासून त्याला २ मुलंसुद्धा आहेत. १० जानेवारी २०२० रोजी त्याने पुनमशी खासगी पद्धतीने लग्न केलं आणि सोशल मीडियावर तेव्हा त्यांचा चांगलाच बोलबाला झाला.

पण लग्नानंतरच काही दिवसांत गोव्यात झालेल्या घटनेनंतर हे दोघे पुन्हा वेगळे झाले असून, पुनम पांडे आता सॅम सोबत रहात नसल्याचं तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

या सगळ्या प्रकारामुळे अचानक लाईम लाइटमध्ये आलेला सॅम बॉम्बे हा कुणी भुरटा आहे की यामागेही काहीतरी वेगळं प्रकरण आहे अशी चर्चा मध्ये सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती.

 

sam bombay poonam pandey IM

 

पुनम पांडे आणि तिच्या या बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेच्या अशा वादग्रस्त व्हिडिओपैकी काही व्हिडिओ अजूनही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. इंटरनेटचा वापर कसा करू नये? याचा धडा घेण्यासाठी पुनम पांडे या मॉडेलचं उदाहरण पुरेसं आहे.

अर्थात पुनम पांडेच्या या व्हिडिओजवर सोशल मीडियाने बंधनं आणली असली तरी अधूनमधून ती तिच्या चित्रविचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे कायम चर्चेत असतेच. त्यामुळे पुनम पांडेचं दुकान हे कायमस्वरूपी कधीच बंद होणार नाही, जोवर सोशल मीडिया जोमात आहे तोवर या अशा मॉडेल्ससुद्धा चर्चेत राहणार हे नक्की!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?