' 'Amazfit GTR 3 Pro' हे घड्याळ तुमच्यासाठी योग्य आहे का?

‘Amazfit GTR 3 Pro’ हे घड्याळ तुमच्यासाठी योग्य आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘Amazfit GTR 3 Pro’ या स्मार्टवॉचची सगळ्यात मोठी खासियत ही आहे की एकदा या घड्याळाची बॅटरी चार्ज केली की कमीत कमी आठवडाभर तरी पुन्हा या घड्याळाची बॅटरी चार्ज करावी लागत नाही. अगदी ‘Samsung’ आणि ‘Fossil’ या कंपन्यांचे स्मार्टवॉचेससुद्धा आपल्याला रोजच्या रोज किंवा एक दिवसाआड तरी चार्ज करावेच लागतात. पण तासन् तास आणि सारखी सारखी बॅटरी चार्ज करण्याच्या कटकटीपासून ‘Amazfit GTR 3 Pro’ हे स्मार्टवॉच आपली सुटका करतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा : 

अगदी स्मार्टवॉचचा डिस्प्ले चालू असताना, स्मार्टवॉच आपल्या झोपेचं tracking करत असताना, ‘SpO2’च्या किमान ३-४ तपासण्या चालू असताना आणि Heart rate चेक होत असून सुद्धा या घड्याळाची बॅटरी कमीत कमी आठवडाभर चालते.

 

GTR inmarathi

 

‘Amazfit’ हे स्मार्टवॉच बाकी स्मार्टवॉचेस पेक्षा वेगळं आहे. ते मुख्यत्वे ‘हेल्थ ट्रॅकर’ आहे. या स्मार्टवॉचच्या बाबतीतली एक चांगली गोष्ट अशी की त्यात ‘Android Wear’ किंवा ‘Apple ecosystem’ नाही आणि हे स्मार्टवॉच ‘Wear OS’ या प्रणालीवर न चालता ‘Zepp OS’ या प्रणालीवर चालतं. या स्मार्टवॉचचा ‘AMOLED HD’ हा डिस्प्ले एक उत्तम डिस्प्ले आहे आणि अगदी सूर्यप्रकाशातही तो व्यवस्थित दिसतो.

‘Zepp OS’ ही प्रणाली फार सहजतेने काम करते आणि ‘Lag free performance’ देते. या घड्याळात ‘Alexa’देखील आहे जे आपल्याला तर्हेतर्हेच्या प्रश्नांची उत्तरं देतं पण ते इतर डिव्हाईसेसकडे ब्रॉडकास्टिंग करू शकत नाही. या स्मार्टवॉचचं ‘metallic bezel’ आणि त्याचा तपकिरी रंगाचा लेदरचा पट्टा या घड्याळाला ‘premium look’ देतो. लांबून दिसताना ते एखाद्या कुठल्याही सामान्य घड्याळासारखं दिसतं.

या घड्याळाला २ बटणं आहेत. वरचं बटण आपल्याला ‘menu’ दाखवतं तर खालचं बटण दाबल्यावर वेगवेगळ्या ‘Workouts’ची एक भलीमोठी यादी आपल्यासमोर येते. ही यादी संपली आहे असं आपल्याला वाटतं न् वाटतं तोच ‘आणखी workouts आहेत’ असं हे घड्याळ आपल्याला दाखवतं. याचाच अर्थ असा की या घड्याळात ‘Workout tracker’ आहे.

 

gtr inmarathi 1

 

आपण जेवढ्या म्हणून workouts विचार करू ते ते सगळे workouts या यादीत आहेत. यातल्या बऱ्याचश्या workouts कडे ‘automatic detection capacity’ आहे. याचाच अर्थ, तुम्हाला जे workout हवंय ते या घड्याळातून चालू करायला तुम्ही विसरलात तरी काळजीचं काही कारण नाही.

उत्तमरीत्या डिझाईन केलेल्या ‘Zepp app’द्वारे तुम्ही या दोन्ही बटणांनी हव्या त्या ऍडजस्टमेंट्स करू शकता. पण ‘Android Wear’ आणि ‘Apple watch’च्या तुलनेत या घड्याळातले apps फार मर्यादित आहेत आणि यात फारसे watch faces देखील नाहीयेत. ‘Samsung Galaxy series’च्या स्मार्टवॉचसारखं किंवा ‘Apple’ स्मार्टवॉचसारखं हे स्मार्टवॉच नसलं तरी या बाबतीत ‘Amazfit’ला सुधारणेसाठी बराच वाव आहे.

 

smartwatch inmarathi

 

या घड्याळात खाली असलेले सेन्सर्स आपला Heart rate, तणाव, SpO2 च्या पातळ्या या आणि अश्यासारख्या अन्य गोष्टीही track करायला आपल्याला मदत करतात. सातत्याने parameters नजर ठेवण्याचा पर्याय या घड्याळात आहे पण असं केल्याने घड्याळाची बॅटरी भराभर उतरते.

दिसताना जरी थोडं कमकुवत असल्यासारखं दिसत असलं तरी या घड्याळाच्या मागचे Charging sensors आणि magnetic charger एकमेकांसाठी उत्तम आहेत. फक्त स्मार्टवॉच चार्जिंगला लावताना ते लॉक केलेले आहेत की नाही याची एकदा तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल नाहीतर घड्याळापासून चार्जर सारखा डिस्कनेक्ट होत राहील. यात जमेची बाजू ही आहेच की या घड्याळाची बॅटरी उत्तम असल्यामुळे तुम्हाला ते सारखं सारखं चार्ज करावं लागणार नाही.

 

gtr 1 inmarathi

जुन्या मॉडेल्समध्ये जो ‘Personal Activity Intelligence’ अर्थात ‘PAI’ असतो तो या स्मार्टवॉचमध्येदेखील आहे ज्याद्वारे तुम्ही करत असलेल्या ऍक्टिव्हिटीजसाठी गुण मिळवून तुम्ही स्वतःला अधिकाधिक प्रोत्साहन देऊ शकता.

जर तुम्ही ‘Workout’ किंवा ‘Health freak’ असाल तर ‘Amazfit GTR 3 Pro’ तुमच्यासाठी नक्कीच उत्तम पर्याय आहे. याच्या उत्तम बॅटरीमुळे, चांगल्या appमुळे आणि workouts भलीमोठी यादी तुमच्या पुढ्यात येत असल्यामुळे हे घड्याळ खरेदी केलंत तर तुमचे पैसे नक्कीच वाया जाणार नाहीत. पण या स्मार्टवॉचची किंमत १८,९९९ आहे. त्यामुळे स्मार्टवॉचेसच्या किंमतीच्या मानाने ही किंमत बरीच जास्त आहे हेही खरं.

 

indian girl workout inmarathi

 

 

आजच जग हे दिवसेंदिवस आणखीनच स्मार्ट होत चालले आहे त्यामुळे अशा या स्मार्ट जगात राहण्यासाठी आपल्यालादेखील स्टेट अपडेट आणि स्मार्ट राहावे लागणार, पूर्वी घडयाळ फक्त वेळ दाखवण्यासाठी असायच मात्र यापुढे वेळेच्या बरोबरीने इतर माहिती देखील घड्याळ देऊ शकेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?