' रजनीकांतना भिकारी समजून महिलेने दिली होती १० रुपयांची भीक, आणि मग …. – InMarathi

रजनीकांतना भिकारी समजून महिलेने दिली होती १० रुपयांची भीक, आणि मग ….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘ऑल द रजनी फॅन्स.. डोन्ट मिस द चान्स… ‘ फक्त ‘रजनी’ असं नाव कोणी घेतलं, तरी डोळ्यांसमोर सुपरस्टार रजनीकांत उभा राहतो. रजनीकांत सारखा नायक आपल्या चित्रपटसृष्टीला लाभणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे!

रजनीकांत हे मूळचे मराठी, पण त्यांनी आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली दाक्षिणात्य चित्रपटांमधून आणि त्या जोरावर ते सुपरस्टार झाले..

एक कंडक्टर ते भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता इथवरचा त्यांचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आपण सगळेच आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. रजनीकांत यांचा जीवनप्रवास असाच आहे, त्यांनी घेतलेला ध्यास, चिकाटी याला तोड नाही.

 

rajanikant inmarathi

 

 

स्टाईलच्या बाबतीमध्ये रजनीकांत नेहमीच सर्वापेक्षा अग्रेसर आहेत, कारण त्यांच्या या स्टाईलमुळेच ते लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

रजनीकांत हे ३० वर्षापेक्षा अधिक काळापासून चित्रपट सृष्टीमध्ये काम करत आहेत. ते एक असे अभिनेते आहेत, ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट, रंगीत, 3 D आणि अॅनिमेटेड अशा सर्वच प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फक्त एक अभिनेता म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही त्यांचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे. रजनीकांत यांच्याकडे आज गडगंज संपत्ती आहे, पण कोणेएकेकाळी त्यांना एका महिलेने मंदिरात भीक दिली होती. तुम्हाला विश्वास बसत नाहीये? तर मग हा किस्सा वाचाच.

एकदा रजनीकांत अत्यंत साध्या वेशात एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते, त्यांचा तो वेष बघून कोणीही त्यांना ओळखणे कठीणच होते. मंदिरात जात असताना एका महिलेने त्यांना भिकारी समजून १० रुपयाची नोट दिली.

रजनीकांत यांच्याऐवजी दुसरा कोणताही स्टार असता, तर तो बाईच्या अंगावर ओरडला असता, ही अपमानास्पद वागणूक त्याला सहन झाली नसती, पण रजनीकांत यांचं श्रेष्ठत्व त्यांच्या स्वभावातच दडलं आहे. काहीही न बोलता त्यांनी ती नोट स्वतःजवळ ठेऊन घेतली.

 

rajanikant inmarathi1

 

गाभाऱ्यात जाऊन रजनीकांत यांनी देवाचे दर्शन घेतले. आणि त्या १० रुपयांच्या नोटेसकट स्वतःच्या पाकिटातले सगळे पैसे देवाच्या चरणाशी अर्पण केले. हे सगळं ती बाई लांबून पाहत होती.

रजनीकांत बाहेर आल्यानंतर त्या बाईने त्यांना ओळखले.. आणि जवळ जाऊन तिने रजनीकांत यांची माफी मागितली. त्यावर रजनीकांत नम्रपणे म्हणाले, ‘ यात तुमची काहीही चूक नाही. हे सगळं देव घडवून आणत असतो. मला वेळोवेळी विनयशील राहण्याची बुद्धी देण्यासाठी देवानेच हे घडवून आणले.’ ही विनयशीलता फक्त रजनीकांतच दाखवू शकतात.

मित्रांनो, शाळेत असताना आपण विद्या विनयेन शोभते असं म्हणायचो ते काही उगाच नाही. ही मंडळी त्यांच्या नम्रपणामुळेच मोठी होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?