' जिवंतपणी मरणयातना, आयुष्यभर जमिनीखाली काचेच्या तुरुंगात डांबून ठेवलेला कैदी! – InMarathi

जिवंतपणी मरणयातना, आयुष्यभर जमिनीखाली काचेच्या तुरुंगात डांबून ठेवलेला कैदी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यानं एका महिलेचा खून केला आणि त्यानंतर एकामागेएक असे ४९ खून केले. या सर्व महिला होत्या आणि व्यवसायानं वेश्या होत्या. त्याच्या या क्रौर्यकर्माबद्दल त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठविण्यात आली आणि इतकं नाही तर खास त्याच्यासाठी एका वैशिष्ट्यपूर्ण जेलची बांधणी केली गेली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जमिनीखाली काचेच्या तुरूंगात त्यानं थोडीथोडकी नाही तर तब्बल चाळीस वर्षं काढलेली आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याला या काचेच्या शवपेटीतच रहायचं आहे. त्याच्या गुन्ह्याची हीच शिक्षा त्याला कायद्यानं दिलेली आहे. कोण आहे हा विकृत कैदी?

रॉबर्ट पिकाटोन, हे नाव तुम्ही फ़ारसं ऐकलेलं नसेल याचं कारण हे नाव आज जमिनीखालच्या काचेच्या तुरूंगात त्याचं आयुष्य (?) व्यतीत करत आहे. ही व्यक्ती एक विकृत सिरीयल किलर होती.

कॅनडा येथील जेलमधे बंद होण्यापूर्वी त्यानं थोडेथोडके नाही तर, तब्बल ४९ खून केले होते. या सर्व महिला होत्या आणि व्यवसायानं वेश्या होत्या. त्याच्या कृत्याचा त्याला तसूभरही खेद नव्हता उलट पन्नासचा आकडा गाठला नाही, केवळ एका अंकानं हा आकडा हुकला याचं त्याला वैशम्य वाटत होतं. आज वयाची सत्तरी पार केलेल्या रॉबर्टनं त्याच्या आयुष्यातला पहिला खून वयाच्या एकविसाव्या वर्षी केला होता.

 

murder inmarathi

 

२६ ऑक्टोबर १९४९ ला रॉबर्टचा जन्म कॅनडात झाला. व्यवसायानं तो खाटिक होता आणि त्याचं पिग फ़ार्म होतं. रॉबर्ट वेश्यावस्तीत जात असे आणि शरीरसंबंध झाल्यानंतर तो त्या वेश्येचा खून करत असे. यासाठी तो चाकूचा वापर करत असे. त्यानंतर तो मृतदेह आपल्या पिगफ़ार्ममधे आणून पुरत असे.

डेली मेलच्या वृत्तानुसार रॉबर्टनं १९७४ ते १९७८ या दरम्यान त्यानं चार खून केले होते. या चार मृतात त्याच्या पत्नीचाही समावेश होता. १९८३ साली अटक होईपर्यंत त्यानं तब्बल ४९ वेश्यांचा खून करून आपल्या पिग फ़ार्ममधे त्यांना पुरलं होतं.

२००१ मधे पोलिसांना तपासकार्यात यश आलं आणि त्यांनी रॉबर्टला पकडलं. रॉबर्टवर केवळ खुनाचाच आरोप नव्हता तर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचाही गुन्हा सिध्द झाला.

रॉबर्टवरचे गुन्हे सिध्द झाल्यानंतर त्याला शिक्षाही तशीच देण्यात आली. कादंबरीत शोभावी अशी शिक्षा भोगणं रॉबर्टच्या नशिबात आलं. इतर गुन्हेगारांप्रमाणे त्याला कारागृहात बंद न करता, त्याच्यासाठी खास तुरूंग बनविण्यात आला.

 

robert pitkon inmarathi

 

या तुरूंगाचं वैशिष्ट्य म्हणजे तो जमिनीखाली आणि काचेचा खोक्याच्या आकाराचा आहे. याचा आकार अगदी चिंचोळा म्हणजे, साडेचार फ़ुट ते पाच फ़ूट लांबी रुंदीचा आहे. यात तो जेमतेम हलू शकतो. दिवसरात्र या चिंचोळ्या पेटीत त्याला काढावे लागतात.

यासाठी बुलेटप्रुफ़ काचेचा वापर करण्यात आला आहे. ४९ व्यक्ती जमिनीखाली पुरलेल्या क्रूर रॉबर्टला त्याचं संपूर्ण आयुष्य जमिनीखाली खाचेच्या चिंचोळ्या खोलीत घालवायला लावणं हा खरा न्याय होता.

त्याला जिवंत व्यक्तिंचं दर्शनही होऊ न देणं, माणसांचे आवाजा कानावर पडू न देणं, थोडक्यात जगाशी संबंध तोडून केवळ शरीरानं जिवंत ठेवत जमिनीखाली आयुष्य काढायला लावणं हा ४९ मृतात्म्यांना कायद्यानं दिलेला अंशत: न्याय होता.

 

robert pitkon inmarathi1

 

अगदी ख्रिसमससारख्या सणानिमित्तही त्याला या काचेच्या खोलीतून बाहेर काढण्यात आलेलं नाही. त्यानं किमान यंदा तरी ख्रिसमसला बाहेरच्या कैद्यांसोबत काही वेळ घालविण्याची इच्छा जेल प्रशासनाकडे व्यक्त केली होती मात्र त्याची ही याचिका फेटाळून लावण्यात आली आणि आता त्या काचेच्या खोक्यातून रॉबर्टचं शवच बाहेर येईल असा आदेश देण्यात आला. चोवीस तासांत केवळ एक तासभर त्याला या काचेच्या बॉक्समधून बाहेर काढण्यात येतं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?