' सर्दी-तापामुळे तोंडाची चव गेलीये; घरच्या घरी करून खाण्याचे ६ सोपे प्रकार! – InMarathi

सर्दी-तापामुळे तोंडाची चव गेलीये; घरच्या घरी करून खाण्याचे ६ सोपे प्रकार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”सध्या तुम्हाला ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणं नसतील तर तुम्ही कदाचित एलियन असाल” हा विनोद सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र ही बाब हसण्यावारी नेण्यासारखी नाही, कारण दुर्दैवाने ही परिस्थिती खरी आहे.

देशातील ८० टक्के लोक सध्या सर्दी, खोकला, ताप या विकारांनी आजारी आहेत. अनेकांनी भितीने कोरोनाची चाचणी केली आणि पॉझिटिव्हचा अहवाल हाती आल्यावर सात दिवसांसाठी आपली खोली गाठली. ओमिक्रॉन, कोरोना डेल्टा, फ्लु, व्हायरल इन्फेक्शन या सगळ्या विकारांसाठी ही सारखीच लक्षणं असल्याने आपल्याला नेमका कोणता आजार झालाय? याबाबतही संभ्रम आहे.

 

cold inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अर्थात आजार कोणताही असो या सगळ्या लक्षणांवर असलेली ठराविक औषध, गरम पाणी, आराम या उपायांना पर्याय नाही. औषधं घ्यायची म्हणजे सकस आहार गरजेचा आहे, मात्र अंगात असलेला ताप, खवखवणारा घसा, खोकला, वाहतं नाक, कुडकुडणारी थंडी आणि मुख्य म्हणजे जीभेची हरवलेली चव यांमुळे जेवण नकोसं वाटणं स्वाभाविक आहे.

मात्र अशा कोणत्याही लक्षणांमध्ये उपयुक्त ठरतील असे काही सोपे पदार्थ तुम्हाला ठाऊक आहेत का? चविष्ट, पौष्टिक आणि ते ही घरातल्या घरात तयार होणारे…

१. गरमागरम खिचडी

तब्बेत बरी नसताना डॉक्टर हलका आहार घेण्यास सांगतात, मात्र अनेकांना सतत वरणभात खाण्याचा कंटाळा येतो. शिवाय तोंडाला चवही नसते. अशावेळी गरमागरम खिचडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

मुगडाळ, तुरडाळ आणि तांदुळ एकत्र करून तयार केलेली खिचडी, त्यावर अपेक्षेनुसार तडका आणि तूप हे कॉम्बिनेशन खाल्ल्यानंतर घशाला आराम मिळतोच, हलका आहार असला तरी पोट भरतं शिवाय शांत झोपही लागते.

 

khichdi inmarathi
vegrecipesofindia.com

 

मुख्यतः तिन्ही डाळींमध्ये असलेले प्रोटीनचे प्रमाण हे आजारपणात सर्वोत्तम औषध म्हणून काम करते. शरिराला आलेला थकवा दूर करत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजारपणात डाळींचा समावेश हवाच.

२. उकडलेली अंडी

सर्दी, किंवा ताप असताना उकडलेली अंडी हा देखली चांगला पर्याय आहे. मांसाहारी लोकांसाठीच नव्हे तर अंड आवडणाऱ्या सर्वांनाच आजारपणात अंड्यांचं सेवन उपयोगी ठरतं.

सर्दी, ताप, किंवा कोरोनाच्या कोणत्याही लक्षणात व्हिटॅमिनची कमतरता भासू नये असा सल्ला दिला जातो. त्यासाठी औषधांचा भडीमार करण्यापेक्षा आहारात अंड्यांचा समावेश करा. दिवसातून किमान एका अंड्याचं सेवन केलं तरी व्हिटॅमिन डी, B12 यांसारखे आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात मिळतात.

 

eggs inmarathi

 

सध्या वाढती थंडी आणि शरिराच्या तापमानाच होणारा बदल लक्षात घेता सर्दीच्या विकारांत अंड्यामुळे उर्जा निर्माण होते.

आजारपणात ऑम्लेट, भुर्जी यांपेक्षा उकडलेले अंड मीठ आणि मीरपुड घालून खाणे अधिक चांगले!

३. रव्याचा उपमा

चविष्ट तरिही पौष्टिक आणि पचायला हलका या सगळ्याच कसोट्यांवर सिद्ध होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा उपमा. हा पचायला हलका असतोच मात्र यात अपेक्षेनुसार तिखट, मीठ असे पदार्थ घालता येत असल्याने रुग्णाच्या तोंडाला चवही येते.

 

upma im

 

रुग्णाला हा उपमा देताना पाण्याचे प्रमाण वाढवावे जेमेकरून थोडा पातळ स्वरुपााचा गरम उपमा खाण्यास मजा येईल, अतिरिक्त तिखट न घालता गरजेनुसार हिरव्या मिरचीचा वापर करावा तसेच उपमा खाताना तो वाफाळता असेल याकडे लक्ष द्या.

मुख्यतः उपमा तयार करताना त्यात गाजर, मटार, कोबी अशा भाज्यांचा वापर करणे गरजेचे आहे.

४. चविष्ठ सूप्स

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे सुप. घरच्या घरीही वेगवेगळी सुप्स तयार करता येतात.

आजारपणात दिवसातून किमान एक वेळा एखादं सुप घ्यायलाच हवं. यामध्ये कॉर्न, भाज्यांचं सुप, डाळींचं सुप, क्लिअर सूप, टोमॅटो, पालक असे वेगवेगळे पर्याय झटपट करता येतात. सुप करताना त्यात शरिरात थंडी घालवून उर्जा निर्माण करणाऱ्या काळ्यामीरीचा वापर होईल याकडे लक्ष द्या.

 

palak soup inmarathi

 

मांसाहारी लोकांना चिकन सुप, मटण सुप असेही पर्याय निवडता येतील. सुप गरम असतानाच पिणे गरजेचे आहे.

५. ओट्स, टोफू निवडा 

आपण रोजच्या जीवनात ओट्स, टोफू यांचा फारसा वापर करत नाही मात्र सर्दी, ताप असताना ओट्सचा वापर करायला हवा.

 

oats chilla inmarathi
youtube.com

 

प्रथिने मिळवण्याचा हा आणखी एक चांगला मार्ग आहे. ओट्सचा उपमा, किंवा दूध आणि ओट्स असेही कॉम्बिनेशन नाश्ता म्हणून निवडता येतील.

६. हळद दुध

आजारपणात मर्यादित आहार घेत असाल तरी रात्री झोपताना गरम हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे.

कडू औषध घेण्यापेक्षा हा चांगला उपाय आहे. सर्दी, खोकला, घसादुखी या सगळ्या विकारांवर हळद घातलेले दुख पिणे हा गुणकारी उपाय आहे.

 

haldi dudh inmarathi
pakwangali.com

 

सध्या नेमक्या कोणत्या विषाणुच्या तावडीत आपण सापडतोय हे सांगणं कठीण आहे. अर्थात यावर डोकफोड करण्यापेक्षा आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. विषाणु कोणताही असला तरी लक्षणं सारखीच आहेत.

घरातल्या घरात केले जाणारे गरम आणि चविष्ट पर्यायांचा आहारात समावेश करा आणि झटपट बरे व्हा…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?