' अल्लू गेला मित्राच्या लग्नाला, आणि ठरवून आला स्वतःचं लग्न, डिट्टो RHTDM सारखं...

अल्लू गेला मित्राच्या लग्नाला, आणि ठरवून आला स्वतःचं लग्न, डिट्टो RHTDM सारखं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या भारतात केवळ दोनच गोष्टींची चर्चा रंगली आहे. एक म्हणजे सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेला कोरोना आणि दुसरा विषय अर्थातच तेलगु चित्रपट पुष्पा! केवळ दाक्षिणात्य प्रेक्षकच नव्हे तर अनेक इतर भाषिक प्रेक्षकांनीही पुष्पाचं तोंडभरून कौतुक केलं. ‘सामे’ वर मनसोक्त रिल्स बनवणारी नेटकरी हे त्याचंच प्रतिक आहे. अर्थात या चित्रपटाचं कौतुक करताना अभिनेता अल्लु अर्जुन याचा विशेष उल्लेख केला जातोय.

 

 

pushpa 1 im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

उत्कृष्ट डान्स, उत्तम अभिनय आणि भुमिका जीवंत करण्याची कसब यांमुळे अल्लु अर्जुनच्या फॅन्सची यादी यंदा आणखीन वाढलीय. त्यामुळे प्रेक्षक इंटरनेटवर अल्लु अर्जुनबद्दल जास्तीत जास्त माहिती शोधण्याची खटपट करत आहेत.

तेलगू दिग्दर्शक अल्लू अरविंद यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा भाचा असलेल्या अल्लु अर्जुनला ‘ग्लॅमर’ काही नवीन नाही. मात्र त्याची लव्हस्टोरी ही कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही.

अल्लु अर्जुन आणि स्नेहा रेड्डी ही लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती. मुख्य म्हणजे प्रेमात आकंठ बुडालेल्या या दाम्पत्याने लग्नाची ११ वर्ष पुर्ण केली आहेत.

 

allu arjun im

 

तुम्हाला ‘रेहना है तेरे दिल मे’ आठवतोय? एका संपूर्ण पिढीचं तारुण्य या चित्रपटाने झपाटून टाकले होते. या चित्रपटात मॅडीला जशी त्याची ड्रिमगर्ल सापडते, तशीच एखाद्या लग्नात आपलंही सुत जुळावं अशी अनेक तरुणांनी मनोमनी प्रार्थना केली असेल, मात्र अल्लु अर्जुनची हिच प्रार्थना फळाली आली.

मित्राच्या लग्नात ‘ती’ दिसली आणि….

RHTDM मधील मॅडीप्रमाणेच अल्लु अर्जुन एका मित्राच्या लग्नाला गेला. त्याच लग्नात त्याने देखणी स्नेहा आली होती. पहिल्या नजरेतच अल्लु अर्जुन तिच्यावर भाळला, आणि विशेष म्हणजे तिलाही याच भेटीत अल्लु अर्जुन आवडला. दोघांनीही न लाजता एकमेकांचे फोन नंबर्स मिळवले आणि त्यांच्या प्रेमाची गाडी इथून सुसाट धावू लागली.

 

allu arjun love im

 

काही काळाने परदेशात मास्टर्स करणारी स्नेहा पुन्हा मायदेशी परतली. तेंव्हाही त्यांच्यातील प्रेम वाढतच होतं. तेलगु इंडस्ट्रीत अल्लु अर्जुननेही आपलं चांगलंच बस्तान बसवलं होतं. पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक कशालाच कमतरता नव्हती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

कहानी मे ट्विस्ट

सगळं काही ‘सेट’ असल्याचं लक्षात आल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अल्लु अर्जुनच्या पालकांनी या निर्णयाचं आनंदाने स्वागत केलं. मात्र स्नेहाच्या पालकांनी अर्थात ‘रेड्डी’ कुटुंबियांनी मात्र अल्लु अर्जुनला जावई म्हणून स्विकारण्यास नकार दिला.

एरव्ही पडद्यावर अनेक रोमॅन्टिक कथा रंगवणाऱ्या हिरोच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा ट्विस्ट आला होता. अर्थात हार मानेल तो अल्लु अर्जुन कसला…

 

allu im

 

त्याने रेड्डी कुटुंबियांच्या घरी चकरा मारणं सुरूच ठेवलं. स्नेहावर असलेलं प्रेम, तिला आयुष्यभर सांभाळण्याचं वचन, कामावर असलेली निष्ठा यांचे दाखले देत तो स्नेहाच्या वडिलांना लग्नासाठी तयार करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत राहिला. अखेरिस अनेक महिन्यांनी त्याच्या या प्रयत्नांना यश आलं.

अखेरिस गंगेत घोडं न्हालं आणि स्नेहा – अल्लु अर्जुनच्या लग्नाला संमती मिळाली. स्नेहाच्या घरी जोडे झिजवल्यानंतर ६ मार्च २०११ रोजी या दोघांना कुटुंबियांच्या संमतीने थाटामाटात लग्न केलं.

 

allu 1 im

 

त्यानंतरही अल्लु अर्जुनचं करिअर यशाच्या शिखरावर पोहोचलं. अनेक हिरॉइन्ससह त्यानी वेगवेगळे चित्रपट केले. मात्र प्रत्येक चित्रपटाच्या यशाचं श्रेय तो पत्नी स्नेहाला देतो. लग्नाची ११ वर्ष पुर्ण करणारं हे दाम्पत्य अनेक तरुणांसाठी आदर्श आहेत.

त्यांना आर्यन आणि अरहा या मुलांचे पालक असलेली ही जोडी प्रेक्षकांमध्ये कायमच सुपरहिट ठरते.

 

allu arjun family 1 im

 

सेलिब्रिटींची लग्न टिकत नाहीत असा आरोप केला जातो, मात्र अल्लु अर्जुन आणि स्नेहा हे जोडपं वेगळं ठरतं.

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?