' आता ATM कार्डची गरज नाही; UPI अ‍ॅपद्वारेच काढा मशीनमधून पैसे!

आता ATM कार्डची गरज नाही; UPI अ‍ॅपद्वारेच काढा मशीनमधून पैसे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं आपण म्हणतो. पैसा हा आपलया आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपल्याकडे बाकी काही असेल किंवा नसेल पण आपलं रोजच जगणंच पैशाशिवाय अशक्य आहे.

इतके दिवस आपल्याला पैसे काढायचे असतील तर ते ‘एटीएम मशीन’मध्ये ‘एटीएम कार्ड’ स्वाईप करून पैसे काढता येत होते.

 

card payments IM

 

अश्याप्रकारे आर्थिक व्यवहार करणं काही कठीण नव्हतं तरीदेखील आपण कुठेही गेलो तरी नेहमीच आपल्याला आपलं ‘एटीएम कार्ड’ आपल्यासोबत बाळगायला लागायचं. पण पुढच्या काळात सगळीकडे ‘कॅशलेस इकॉनॉमी’ होणार आहे.

‘कॅशलेस इंडिया’ करणं हे देशापुढलं धेय्य आहे. पण गोष्टी ‘कॅशलेस’ होण्यापूर्वी त्या आधी ‘कार्डलेस’ होतील. त्याला तशी कारणंदेखील आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रोजगारातून आधीपेक्षा बराच अधिक पैसा मिळू लागला आणि आपल्याला मिळालेल्या पैशाची जरी आपण आपल्यापरीने व्यवस्थित गुंतवणूक करत असलो तरी भलेभले आर्थिक व्यवहारांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांमधून सुटत नाहीत.

दिवसेंदिवस आपल्याला ही उदाहरणं अधिकाधिक ऐकायला मिळत असतात. त्यामुळे हळूहळू छोटे छोटे बदल करत जाऊन पुढल्या काळात सगळं ‘कॅशलेस’ होणं आपल्याकरता सोयीचंच ठरणार आहे. आपल्याला त्या दृष्टीने तयारी करावी लागेलच.

काही नव्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. पण हे करत असताना काही गोष्टी मात्र आपल्यासाठी आधीपेक्षाही सोप्या होणार आहेत.

इतके दिवस ‘एटीएम मशीन’ मधून पैसे काढण्यासाठी आपल्याला आपलं ‘एटीएम कार्ड’ जवळ बाळगायला लागत होतं ते यापुढे जवळ बाळगण्याची आवश्यक्ता उरणार नाही. आता ‘एटीएम कार्ड’शिवायही आपण ‘युपीआय ऍप्स’द्वारे एटीएममधून रोख रक्कम काढू शकतो.

 

atm upi IM

 

‘ऑटोमेटेड टेलर मशीन्स’ अर्थात ‘एटीएम मशीन्स’ बनवणाऱ्या एनसीआर कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी ही नवी सुविधा आणली आहे. ते याबाबतीत असं म्हणाले की, ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’ म्हणजेच ‘युपीआय’ प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल सोल्युशन म्हणजेच ‘आयसीसीडब्ल्यू’ सोल्युशन त्यांनी लाँच केलंय.

या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना आपले मोबाईल्स वापरून ‘बीएचआयएम’, ‘पेटीएम’, ‘जीपे’, ‘फोनपे’, ‘अमेझॉन’ यापैकी कोणत्याही ‘युपीआय’ ऍप द्वारे एटीएम कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

 

phone pe IM

अशाप्रकारे ऍपद्वारे पैसे काढत असताना आपल्याला आपलं एटीएम कार्ड जवळ बाळगायची अथवा स्वाईप करायची आता आवश्यक्ता नाही. असंही सांगण्यात येतंय की ही नवी सुविधा वापरात आणण्यासाठी सिटी युनियन बँकेने एनसीआरशी संगनमत केलं आहे.

बँकेने क्यूआर कोड आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेला परवानगी देण्यासाठी एव्हाना आपले १,५०० एटीएम्स अपग्रेड सुद्धा केले आहेत. आणखी एटीएम्स अपग्रेड होण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही एटीएम मोबाईल फोनवर ‘युपीआय ऍप’ वापरण्यासाठीचं हे पुढचं पाऊल आहे.

एटीएम कार्ड न वापरता याचा वापर होऊ शकतो अशी माहिती एनसीआर कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे. एटीएमकार्ड जवळ न बाळगता आणि स्वाईप न करता जेव्हा आपण आपले मोबाईल वापरून ‘बीएचआयएम’, ‘पेटीएम’, ‘जीपे’, ‘फोनपे’, ‘अमेझॉन ‘ यांपैकी कोणत्याही ‘युपीआय’ ऍपद्वारे आपले पैसे काढू तेव्हा आपण स्क्रीनवरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करणे आवश्यक आहे.

एकदा स्कॅनिंग झालं की आपल्याला किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम टाकायची आणि ‘प्रोसिड’ बटणावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला ४ ते ६ आकडी ‘युपीआय’ पिन नंबर विचारला जाईल. आपल्याला आपल्या फोनद्वारे रोख पैसे काढण्याची परवानगी मिळाली की आपण पैसे काढू शकतो.

 

upi IM 2

 

या ‘क्यूआर’ कोडला ‘डायनॅमिक क्यूआर कोड’ असे म्हणण्यात आले आहे. कारण, आर्थिक व्यवहार आधीपेक्षाही अधिक सुरक्षित व्हावे या दृष्टीने हा ‘क्यूआर कोड’ सतत बदलला जाईल. प्रत्येक व्यवहाराच्या वेळेस हा ‘क्यूआर कोड’ बदलेल. युपीआय ऍपशिवाय हा ‘क्यूआर कोड’ कॉपी करण्याचा कुठलाही मार्ग नाही.

ही ‘डायनॅमिक क्यूआर कोड’ आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा अपग्रेड केली असेल तर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने ही सध्याची सगळ्यात सुरक्षित सुविधा आहे.

या प्रक्रियेद्वारे सद्ध्या आपण एका वेळी जास्तीत जास्त ५,००० रुपये रोख रक्कम काढू शकतो. ही सुविधा युपीआय आधारित असल्यामुळे त्याला कोणत्याही अतिरिक्त नियामक परवानगीची गरज नाहीये. कारण, ही नवी सुविधा केवळ ‘युपीआय’ ऍपचा विस्तार आहे असंही सांगण्यात आलं आहे.

ही नवी सुविधा देशातल्या सगळ्याच एटीएम्समध्ये कशी वापरता येईल यावर सध्या दोन्ही कंपन्यांची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात सरकारी आणि खाजगी बँकांशी त्यांची सतत बोलणी सुरू आहेत.

 

ATM centres IM

 

समोर आलेल्या बातमीनुसार, एनसीआर कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्याने असं सांगितलं आहे की सिटी युनियनच्या एटीएम्समध्ये ही सुविधा उपलब्द्ध करून देण्यासाठी आम्ही आहे ते सॉफ्टवेअर अपग्रेड केलं आहे. हार्डवेअर अपग्रेड करण्याची आवश्यक्ता नाहीये त्यामुळे ही सुविधा देशभरातल्या सगळ्याच एटीएम्समध्ये उपलब्द्ध होऊ शकते.

केवळ मोबाईलच्या सहाय्याने कुठल्याही ‘युपीआय’ ऍपद्वारे आता आपल्याला एटीएम कार्ड शिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

हे आपल्या फायद्याचं निश्चितच ठरेल शिवाय ‘क्यूआर कोड’ दर व्यवहाराच्या वेळी सतत बदलत राहणार असल्यामुळे आणि तो कोड कॉपी होण्याचा कुठलाही धोका नसल्यामुळे आपण निश्चिंत राहू शकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?