' ‘मुन्नाभाई MBBS’ साठी लिहीला गेलेला हा खास सीन ‘३ इडिएट्स’ मध्ये आला कसा? – InMarathi

‘मुन्नाभाई MBBS’ साठी लिहीला गेलेला हा खास सीन ‘३ इडिएट्स’ मध्ये आला कसा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चेतन भगतच्या फाईव्ह पॉईंट समवन ह्या कादंबरीवर थोडाबहुत आधारलेला राजकुमार हिराणी ह्यांचा थ्री इडियट्स हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. आमिर खान, माधवन आणि शर्मन जोशी ह्या तिघांच्या मैत्रीला व बोमन इराणी ह्यांच्या व्हायरस ह्या पात्राला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

अजूनही टीव्हीवर लागला की लोक हा चित्रपट आवर्जून बघतात. ह्या चित्रपटातील संवाद, गाणी, अनेक सीन्स लोकांना अगदी तोंडपाठ आहेत.

 

3 iditos

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

फरहान आणि राजू त्यांच्या हरवलेल्या मित्राच्या शोधात असताना त्यांच्या इंजिनिअरिंगच्या दिवसांच्या आठवणींना आणि त्यांच्या मित्राच्या आठवणींना उजाळा देतात.

रँचो हा त्यांचा जीवाला जीव देणारा मित्र कॉलेज संपल्यावर अचानक गायब होतो. अचानक फरहानला रँचोबद्दल काही माहिती कळते आणि तो राजूला बरोबर घेऊन रँचोच्या शोधात निघतो. त्या प्रवासात ते दोघेही रँचोच्या आठवणींना उजाळा देतात. जरी बाकीचे जग त्यांना “मूर्ख” म्हणत होते तरी रँचोने कसे त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास प्रेरित केले ह्या त्यांच्या आठवणींच्या प्रवासातून ह्या तीन जिवलग दोस्तांची कथा आपल्यापुढे उलगडते.

एकसे एक सीन्स असलेल्या ह्या चित्रपटातील लक्षात राहावा असा सीन म्हणजे व्हायरसच्या मोठ्या मुलीच्या ‘मोना’ च्या डिलिव्हरीचा प्रसंग होय. सगळीकडे अतिवृष्टीमुळे पूर आलेला असताना आणि वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचू न शकणाऱ्या, बाळंतपणाच्या कळा सुरु असलेल्या मोनाची डिलिव्हरी इंजिनियरिंगचे विद्यार्थी त्यांच्या बॉईज हॉस्टेलमध्ये अनेक जुगाड लावून यशस्वीपणे आणि सुखरूप पार पाडतात असा तो सीन होता.

 

delivery im

 

पण गंमत म्हणजे हा सीन थ्री इडियट्ससाठी लिहिलाच गेला नव्हता. काय? बसला ना धक्का! आता तुम्ही म्हणाल या चित्रपटाच्या सर्वात महत्वाच्या प्रसंगापैकी एक असलेला हा सीन त्या चित्रपटासाठी लिहीला गेलाच नव्हता हे कसं शक्य आहे. पण हे खरं आहे.

हा सीन त्या आधी आलेल्या एका चित्रपटासाठी लिहिला गेला होता पण काही कारणाने तो त्या चित्रपटात घेण्याचा निर्णय बदलला आणि हा आगळावेगळा सीन थ्री इडियट्समध्ये घेतला गेला.

थ्री इडियट्सच्या सर्व चाहत्यांनो, तुम्हाला माहित आहे का की चित्रपटाचा हा डिलिव्हरीचा सीन सीन मूळतः मुन्ना भाई एमबीबीएस ह्या चित्रपटासाठी विचारात घेतला गेला होता.

‘मुन्नाभाई M.B.B.S’ लिहिण्यापूर्वीही दिग्दर्शक राजकुमार हिराणी तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांची एक कथा लिहीत होते. एका रात्री, मद्यधुंद अवस्थेत असताना ह्या तीन मित्रांना एक तरुण स्त्री वेदनेने ग्रासलेली दिसते आणि ते तिची प्रसूती करतात असे काहीसे त्या कथेत लिहिले होते. पण मुन्नाभाईच्या नंतरच्या मसुद्यांमध्ये चित्रपटाचा नायक हा वैद्यकीय विद्यार्थी नसून मुन्नाभाई असेल असे ठरले आणि तो सीन चित्रपटासाठी वापरला गेला नाही.

 

munnabhai im

 

तुम्हाला काय वाटतं, जर हा सीन मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये ठेवला असता तर काय झाले असते? मुन्नाभाई व सर्किट एका स्त्रीची डिलिव्हरी करताना कसे डोके लढवतात हे कदाचित आपल्याला बघायला मिळाले असते.

राजकुमार हिराणींना ‘मुन्ना भाई M.B.B.S.’ मध्ये हा सीन अनावश्यक वाटला. पण नंतर, ‘थ्री इडियट्स’ दिग्दर्शित करताना त्यांना ह्या चित्रपटात हा सीन टाकणे अधिक अर्थपूर्ण वाटले, म्हणून त्यांनी हा सीन ह्या चित्रपटात वापरला आणि लोकांना तर हा सीन फारच आवडला.

केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून लोकांचे जीव वाचत नाहीत तर एका इंजिनिअरला जर मशिन्सचे , टेक्नॉलॉजीचे सखोल ज्ञान असेल तर तो तशीच वेळ आली तर एखाद्या स्त्रीचे बाळंतपणही कुठल्याही वैद्यकीय उपकरणांशिवाय देखील पार पाडू शकतो असे ह्या सीनमधून दाखवले गेले.

 

delivery 1 im

 

मुन्नाभाई एमबीबीएस आणि थ्री इडियट्स हे दोन्ही चित्रपट हिराणी ह्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील उत्कृष्ट कलाकृती म्हणून गणले जातात. २००९ साली थ्री इडियट्स प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदीतील सर्वार्थाने उत्कृष्ट असलेल्या कलाकृतींपैकी एक मानला जातो. ह्या चित्रपटाने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.

आजही लोक हा चित्रपट आवडीने बघतात. ह्या चित्रपटाचे टेम्प्लेट्स घेऊन आजही मीम्स बनतात इतकी ह्या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?