' Trump असो वा biden, कोव्हीडने घेतले लाखो अमेरिकन नागरिकांचे प्राण… – InMarathi

Trump असो वा biden, कोव्हीडने घेतले लाखो अमेरिकन नागरिकांचे प्राण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोव्हीड-१९ ने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. एकामागून एक येणारी पहिली लाट, दुसरी लाट आणि आता तिसऱ्या लाटेने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. जगभरातील लाखो लोकांनी या महामारीत आपल्या जवळच्यांना गमावले.

या कोरोनाने अनेकांचे अकाली प्राण हिरावून घेतले. एकट्या अमेरिकेत आजवर कोरोनामुळे आठ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आणि यात हे सरकार चांगले, ते सरकार वाईट असाही प्रकार नाही. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या काळात कोरोनामुळे जितके मृत्यू झाले तितकेच मृत्यू अध्यक्ष जो बिडेन ह्यांच्या शासनात सुद्धा झाल्याचे एका विश्लेषण अहवालातून समोर आले आहे.

 

trump and corona inmarathi
amarujala.com

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या मते, जगातील सर्वाधिक कोव्हीड केसेस आणि मृत्यूच्या बाबतीत अमेरिका अजूनही आघाडीवर आहे. आतापर्यंत अमेरिकेत ५०,३७४,०९९ कोव्हीड केसेसची नोंद झाली आहे, तर ८,०२,५०२ लोकांना कोरोनाच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४,००,००० लोकांचा कोव्हीडमुळे जीव गेल्याची नोंद झाली होती आणि आता हा आकडा दुप्पट झाला आहे.म्हणजेच सरकार कोणाचेही असो, कोरोना लोकांचा जीव घेतोच आहे.

 

 

या अहवालात म्हटले आहे की ट्रम्प प्रशासनाने COVID-19 महामारी अत्यंत विस्कळीतपणे व अव्यवस्थितपणे हाताळली. आणि बिडेन निवडून येऊन शपथ ग्रहण करेस्तोवर ही जागतिक महामारी खूप मोठ्या प्रमाणात पसरली होती. परंतु बायडेन यांनीही जनतेला आश्वासन दिल्याप्रमाणे काम केले नाही.

 

corona inmarathi
aljazeera.com

 

अमेरिकेत कोव्हीडची लस प्रथम डिसेम्बर २०२० मध्ये उपलब्ध झाली होती. आणि त्यांनी ४ जुलै २०२१ पर्यंत व्हायरसपासून मुक्ती मिळवण्याची प्रतिज्ञा केली असली तरी अजूनही अनेक अमेरिकन लोक या व्हॅक्सिनबाबत साशंक आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटच्या केसेसमध्ये अमेरिकन आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे असेच चित्र दिसून येत आहे आणि संसर्ग रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे स्पष्ट दिसतेय.

अमेरिकेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने सर्वात वाईट होते. या दोन महिन्यांत एकूण ९२,८०० लोकांचे कोव्हीडमुळे मृत्यू झाले. हे अपमृत्यू टाळता आले असते. वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांच्या ताज्या संपादकीयात असे लिहिले आहे की कोव्हीडला पराभूत करण्यासाठी लसींचे फायदे, चांगले उपचार आणि अधिक अनुभव असूनही बिडेन सरकारने डोनाल्ड ट्रम्प सरकारपेक्षा फार चांगले काम केले नाही असेच चित्र दिसतेय.

 

corona doctors inmarathi
CNBC.com

 

संपूर्ण २०२० पेक्षा २०२१ साली कोव्हीडमुळे अधिक मृत्यू झाले असे या संपादकीयात म्हटले आहे. वॉशिंग्टन पोस्टने एका अहवालात म्हटले आहे की, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या डेटावरून असे दिसून आले आहे की बिडेन यांच्या १० महिन्यांच्या कार्यकाळात सुमारे ३५३,००० लोक मरण पावले. तर ट्रम्प प्रशासनाच्या शेवटच्या १० महिन्यांत ४२५,००० लोक कोव्हीडमुळे मरण पावले. या अहवालात असे म्हटले आहे की ट्रम्प राजवटीच्या तुलनेत बिडेन राजवटीत अजूनही कोव्हीडमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डेटावरून असे दिसून आले आहे की ट्रम्प यांच्या कार्यकाळातील शेवटच्या १० महिन्यांत कोव्हीडमुळे झालेले ४२५००० लोकांचे मृत्यू हे जगभरातील कोव्हीडमुळे झालेल्या मृत्यूंच्या २० टक्के होते. तर बायडेन यांनी पदभार स्वीकारल्याच्या १० महिन्यांनंतर जगभरात ३ दशलक्षाहून अधिक लोकांनी कोव्हीड महामारीत आपला जीव गमावला आहे व अमेरिकेत जगभरातील मृत्यूंपैकी १२ टक्क्यांहून कमी मृत्यूची नोंद झाली आहे. हा आकडा तुलनेने ट्रम्प सरकारपेक्षा १९.९ टक्क्यांनी कमी आहे.

अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की अमेरिकेत ज्या आठ लाख लोकांनी कोव्हीडमुळे आपले प्राण गमावले, त्यापैकी हजारो मृत्यू थांबवता आले असते. जर ह्या लोकांपर्यंत कोव्हीडची लस वेळेत पोचली असती तर हजारो लोकांचे प्राण नक्कीच वाचू शकले असते.

 

moderna vaccine mihir metkar inmarathi2

आता नव्याने पसरलेल्या ओमीक्रॉन व्हेरिएंटकडे बघून असेच म्हणावे लागेल की ही जागतिक महामारी अजूनही आटोक्यात आलेली नाही आणि कोव्हीडमुळे अजूनही जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवाला धोका आहे.

त्यामुळे प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून काळजी घेतलीच पाहिजे. ही महामारी किती घातक आहे याचा वारंवार अनुभव येऊन देखील आपल्या डोक्यात प्रकाश पडत नसेल आणि आपण योग्य ती काळजी घेण्यात, नियम पाळण्यात टाळाटाळ करत असू तर मग खरंच येणारी परिस्थिती आणखी अवघड होणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: ht

tps://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?