' मनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं!

मनुष्य प्राण्याच्याच कर्माची देण असलेली ही आहेत जगातील सर्वात विषारी ठिकाणं!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आज अख्या पृथ्वीला प्रदूषण नामक महाराक्षसाने घेरले आहेत आणि या प्रदूषणाला दुसरे तिसरे कोणी नाही तर आपण मनुष्यच जबाबदार आहोत. याच प्रदुषणामूळे जगभरात निर्माण झाली आहेत अशी विषारी ठिकाण जी सजीव प्राण्याचा सहज जीव घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात विषारी ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जेथे जाणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण आहे. कधीकाळी ही ठिकाणे स्वर्गाप्रमाणे होती. मात्र अगोदर सांगितल्याप्रमाणे मनुष्य प्राण्यानेच ती विषारी बनवली आहेत.

लिनफेन शहर

toxic-places-marathipizza01
china-mike.com

चीनचे लिनफेन हे जगातील सर्वात विषारी वायूंचे शहर आहे. त्यास नरक म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. तुम्ही पांढरे कपडे परिधान केले असेल तर ते काही क्षणात लिनफेनमध्‍ये काळी होतात, यावरुन तुम्हाला येथील प्रदूषणाची कल्पना येऊ शकते.

 

ग्रेट पॅसिफिक बेट

toxic-places-marathipizza02
puckermob.com

पॅसिफिक महासागरामधील ग्रेट पॅसिफिक बेट जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात विषारी ठिकाण म्हणून ओखळले जाते. या बेटावर भरपूर प्लास्टिक कचरा आहे.  या बेटाचा आकार अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या दुप्पट आहे.

 

अॅमेझॉन नदीच्या आसपास असलेली जमीन

toxic-places-marathipizza03
oddizzi.com

ब्राझीलच्या रोनडोनियातून वाहणाऱ्या अॅमेझॉन नदीच्या आसपास असलेली हजारो एकर जमीन म्हणजे जगातील तिसरे सर्वात प्रदूषित ठिकाण आहे. एके काळी हे ठिकाण हिरवेगार होते.

 

यमुना नदी

toxic-places-marathipizza04
tamilnetonline.com

भारतात आध्‍यामिक दृष्‍ट्या पवित्र समजली जाणारी यमुना नदी आज प्रचंड प्रदूषित झाली आहे. तिचा आज जगातील सर्वात विषारी स्थानात समावेश केला जातो. मात्र सरकार नेहमी यमुनेच्या स्वच्छतेचा दावा आणि आश्‍वासन देत आली आहे. परंतु वास्तव हे आहे, की हजारो मेगा लिटर पर डे प्रमाणावर यमुनेत कचरा टाकला जातो.

 

ओरोया

toxic-places-marathipizza05
पेरुच्या ओरोयामध्‍ये शिसेचे प्रमाण प्रचंड आहे. याचा अंदाज येथील मुलांच्या रक्तात आढळणा-या शिसावरुन येईल. शिसेच्या प्रदूषणाला अमेरिकन कंपनी डू रन जबाबदार आहे.

 

कराचय तलाव

toxic-places-marathipizza06
buzzle.com

आण्विक कच-यामुळे रशियाची कराचय तलावातील किरणोत्सर्ग प्रचंड वाढला आहे. तलावाच्या संपर्कात येणा-या कोणत्याही व्यक्तीला काही क्षणात दवाखान्यात घेऊन जावे लागते. या भागातील कामगार सर्वात जास्त कॅन्सरने त्रस्त आहे. तसेच येथे जन्मास येणारी बहुतेक मुले लेकिमियाने त्रस्त असतात.

माणसाने वसंधूरेबरोबरच अंतराळही प्रदूषित केले आहे. जवळजवळ 4 लाख पौंड वजनाचा अंतरराळ कचरा (उपग्रह आणि सर्व अंतराळ यान) अंतराळाला प्रदूषित करत आहे.

toxic-places-marathipizza07
osnetdaily.com

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?