' हॉस्पिटलला न जाता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढायचंय? मग घरात या ५ वस्तु हव्याच – InMarathi

हॉस्पिटलला न जाता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढायचंय? मग घरात या ५ वस्तु हव्याच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुरुवातीला ‘कोरोना’ जेव्हा आला तेव्हा हा आजार किती भयकारी रूप घेईल याची आपल्या कुणालाही कल्पनासुद्धा नव्हती. अगदी मास्क लावून आपल्याला रोजच जगावं लागेल हेही अगदी सुरुवाती सुरुवातीला आपल्याला वाटलं नव्हतं. पण केसेस जश्याजश्या वाढत गेल्या तसंतसं या आजाराचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं.

 

corona inmarathi

 

पहिली लाट आली, दुसरी लाट आली. यात कोरोनाबरोबर जगण्याखेरीज आपल्याला गत्यंतरच उरलं नाही. लोकांचं यात अपिरिमित नुकसान झालं. आर्थिक, मानसिक नुकसानाबरोबरीनेच अनेकांना अगदी सगळ्याच वयोगटातली आपली जवळची माणसं गमवावी लागली.

कुठलंच नुकसान काही पटकन भरून निघत नाही. मानसिक नुकसान भरून यायला वेळ लागतो, आर्थिक नुकसानभरपाई व्हायला तर चिक्कार अवधी जावा लागतो. पण जवळचं माणूस गेल्याचं नुकसान काही भरून येत नाही. हे सगळं कितीही कठोर असलं तरी कोरोनाने या सगळ्यासोबत आपल्याला जगायला लावलं आणि आता आपण तसे जगतो आहोत.

 

corona habits inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आता पुन्हा कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, ओमिक्रॉनचा धोका वाढतोय त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची फार चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. इतके दिवस आपण मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, शक्य असेल तितकं घराबाहेर न पडणे या गोष्टी करतोच आहोत. आपल्यातले बरेच जण आता घरून काम करत आहेत.

 

omicrone virus inmarathi

 

कोरोनाच्या या भीषण लाटेपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून आपल्याला करता येतील तेवढे घरगुती उपायही आपण करतो आहोत. पण आताच्या घडीला केवळ त्या घरगुती उपायांवरच आपण अवलंबून राहणं पुरेसं नाहीये.

आपल्याकडे आता अशी काही साधनं घरात असायलाच हवीत जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ आपल्यावर न आणता घरातल्या घरातच आपल्याला कोरोनावर मात करायला मदत करतील. बाहेर परिस्थिती इतकी बिकट आहे की या ५ वस्तू आता घरात असायलाच हव्यात :

१. ऑक्सिमीटर

हे साधन आता तुमच्या घरात असायलाच हवं. तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे लक्षात घ्यायची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे या साधनाद्वारे तुमच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळी तपासणे.

 

oximeter in marathi

 

कोरोना केवळ आपल्या फुफ्फुसांवरच वाईट परिणाम करत नाही तर आपल्या श्वसनाशी निगडीत शरीराचे जे जे अवयव आहेत त्यांच्यावरही कोरोनाचा वाईट परिणाम होतो. कोरोनाचा संसर्ग झाला की रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी भराभर खाली येते. त्यामुळे जर तुमच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी ९५% पेक्षाही खाली गेली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्याच.

२. डिजीटल थर्मामीटर

ताप येणे हे कोरोना व्हायरसचे एक लक्षण आहे. बऱ्याच लोकांना शरीराचं तापमान बघून आपल्याला ताप आलाय की नाही हे तपासायची सवय नसते.

 

fever check inmarathi

 

Digital Thermometer वापरायला अतिशय सोपा असतो. तुम्हाला फक्त तो चालू करायचा असतो. योग्य प्रकारे जीभेखाली ठेवायचा असतो आणि अगदी काही सेकंदातच आपल्याला ताप आहे की नाही आणि किती आहे हे आपल्या लक्षात येतं.

३. स्मार्ट वॉच 

२०२० मध्ये कोरोनाने सगळीकडे जे थैमान घातलं त्यानंतर SpO2 sensors असलेले स्मार्टवॉचेस विक्री होण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरले. येता जाता आपली तब्येत कशी आहे हे आपल्याला कळत राहावं याची निकड लोकांना भासू लागली.

 

smartwatch im

 

घरच्या घरी काम करत असताना, ऑफिसचे कॉल्स घेत असताना आपली ऑक्सिजनची पातळी कशी आहे हे या स्मार्टवॉचमुळे तपासणं अगदी सोपं झालंय. हे स्मार्टवॉच जवळ असेल तर Oximeter ही जवळ बाळगायची आवश्यक्ता उरत नाही.

४. वाफ घेण्याचे मशिन

हे जरी तसं जुनं साधन असलं तरी कोरोनाच्या या काळात उपयुक्त ठरणारं आहे. बाहेरून घरी आल्यानंतर गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. गॅसवर पाणी उकळवूनही वाफ घेता येते मात्र यामध्ये अनेकदा गॅस अतिरिक्त वाया जातो. त्यामुळे वाफ घेण्याचे मशिन हा चांगला, सुरक्षित पर्याय ठरतो.

 

 

taking steam inmarathi
verywellhealth.com

 

सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी या सगळ्या लक्षणांसाठी गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त ठरते. पण आवश्यक साधन असलं तरी हा अगदी प्राथमिक पातळीवरचा उपाय आहे. अंतिम उपाय नाही. त्यामुळे जर तुमची तब्येत खालावत असेल तर त्रास उगीच अंगावर न काढता तुम्ही डॉक्टरांकडे गेलंच पाहीजे.

५. फेक अॅपपासून पासून सावध रहा

हा पाचवा मुद्दा म्हणजे खरंतर कुठली वस्तू नाही पण आपण प्रत्येकानेच लक्षात ठेवला पाहिजे असा एक महत्त्वाचा सल्ला आहे.

Play store आणि Apple store वरच्या वेगवेगळ्या Fake apps वरून कृपा करून कसली माहिती मिळवायला जाऊ नका आणि त्यांनी दिलेल्या माहितीवर डोळे झाकून भरवसा तर अजिबातच  ठेवू नका. ही apps योग्य माहिती पुरवत नाहीत. ती तुमची दिशाभूल करून अत्यंत चुकीच्या निष्कर्षांपर्यंत तुम्हाला नेऊ शकतात.

 

fake app im

कोरोनाचा रुग्ण जर बऱ्या स्थितीत नसेल तर त्याला हॉस्पिटलमध्येही दाखल करावं लागेलच. आपला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचा जीव या कोरोनाच्या आजारातून वाचवण्यासाठी आपल्याकडून शक्य होतील ते ते सगळे प्रयत्न आपण करतोच आहोत.

इथे रोजचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न अनेकांसाठी कळीचा मुद्दा झालेला असताना त्यात हॉस्पिटलच्या खर्चासाठी कुठून पैसे आणायचे हे लोकांना कळेनासं झालंय.

आपण जर या वरच्या गोष्टी आपल्यापाशी बाळगल्या तर हॉस्पिटलला जाणं, त्यासाठी करावा लागणारा प्रचंड खर्च या गोष्टी आपल्याला टाळणं शक्य होईल. निदान, आपण आपल्या बाजूने तरी पुरेशी काळजी घेतली आहे, घेत आहोत याचं समाधान आपल्याला असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल:

https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?