' हिंदुत्व सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या मुलांना, वडिलांनी घडवली अशी अद्दल… – InMarathi

हिंदुत्व सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या मुलांना, वडिलांनी घडवली अशी अद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सूर्यवंशम सिनेमा तुम्हाला माहितीच असेल, कारण तो सिनेमा आपण कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी सेट मॅक्सवाले आपल्याला तो काही विसरून देणार नाहीत. रविवारची दुपार म्हणजे सूर्यवंशी सिनेमा हे समीकरण बनले आहे.

अमिताभ बच्चन यांचा डबल रोल, कर्तबगार वडील आणि त्यांचा अडाणी मुलगा, वडिलांच्या विरोधात जाऊन मुलगा लग्न करतो त्यामुळे साहजिकच संतापून वडील मुलाला आपल्या संपत्तीमधील वाटा देऊन टाकतात.

 

sooryavansham InMarathi

 

आज भारतात संपत्ती वादावरून अनेक कुटुंब दुभंगली आहेत. जमीन, शेती वाडी असली की त्याचे हक्क, भाऊबंदकी, कोणाच्या वाट्याला किती आले, एखाद्या भावाला जर हिस्सा कमी मिळाला तर तो थेट कोर्टाची पायरी चढतो. कधीकाळी एका ताटात जेवलेले भाऊ कोर्टात एकेमकांच्या समोर उभे ठाकतात.

 

property inmarathi

 

कोर्टाच्या आदेशानुसार वडिलांच्या संपत्तीमधील वाटा मुलींना देखील मिळणार असल्याने आता मुलीदेखील आपला हक्क सांगू शकतात, मात्र अशी एक केस आहे ज्यात मुलांनी धर्मांतर केले म्हणून वडिलांनी आपली करोडोंची संपत्ती चक्क देवळासाठी दान करून टाकली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नेमकी काय आहे भानगड?

तामिळनाडूमधील कांचपूरम येथील एका हिंदू माणसाने असे ठरवले आहे की आपले राहते घर दान करून टाकणार आहेत, ज्याची किंमत आहे जवळपास २ कोटी रुपये आहे. मुलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याने कंटाळून वडिलांनी हा निर्णय घेतला आहे. वेलायथाम असं या माणसाचे नाव असून त्यांचे वय ८५ आहे, त्यांना एकूण तीन अपत्य आहेत. दोन मुली आणि एक मुलगा…

आपली अपत्य आपला हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करणार नाहीत या भीतीने शेवटी त्यांनी आपली संपत्ती कुमारकोट्टम मंदिराला अर्पण करायचे ठरवले आहे. 

 

vel inmarathi

 

रिपोर्टनुसार वेलायथाम हे तामिळनाडूमध्ये आरोग्य विभागात कार्यरत होते. त्यांचं घर २६८० स्क्वे फुटाचे असून आज त्यांची किंमत २ करोडच्या आसपास आहे. घर तर बांधलं मात्र ज्यांच्यासाठी हे घर बांधलं त्यांनी मात्र वडिलांच्या विरोधात जाऊन ख्रिश्चन धर्म  स्वीकारल्याने ते नाराज झाले.

वेलायथाम यांनी स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना असं म्हणले की आमच्या घरात आता कोणी हिंदू राहिले नाही त्यामुळे माझे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने झाले पाहिजेत, मी जरी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तरी माझी मुलं माझे अंत्यसंस्कार करणार नाहीत म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.

वेलायथाम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपले सेल डिड मंत्र्यांकडे सोपवले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाद्वारे त्यांची संपत्ती ताब्यात घेतली जाईल.

 

deed inmarathi

संपत्तीवर होणारी भांडण आपल्याकडे नवी नाहीत. आज संपत्तीसाठी मुलं जन्मदात्या आई वडिलांना संपवण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत. तसेच धर्मांतर हा मुद्दा देशात खूपच गाजत आहे. पैशांचे आमिष दाखवून लोकांना धर्मांतर करायला लावणे, लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यांचे धर्मांतर केले जात आहे.

आज भारतासारख्या विविध संस्कृती, धर्म असलेल्या देशात धर्म हा खूप संवेदनशील विषय आहे. लोकांच्या धर्माबाबत भावना खूपच तीव्र होत चालल्या आहेत. केवळ आपला धर्म सर्वश्रेष्ठ असं न मानता केवळ माणुसकी हा धर्म मानून आपण एकत्र आले पाहिजे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?