'ह्या क्रिकेटरने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे? तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही...!

ह्या क्रिकेटरने अभिनयात देखील मैदान गाजवले आहे? तुम्ही त्याला ह्या रुपात ओळखूच शकत नाही…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

कॅन्सर वर मात करून आजही आपल्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या युवराज सिंहबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची अजिबात गरज नाही. आजही बिनधास्त खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये युवराजचे नाव हमखास असते. इतक्या वर्षानंतर भारताला  वर्ल्डकप जिंकून  देण्यामध्ये तर युवराजचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण होते.

yuvaraj-singh-marathipizza01
indianexpress.com

अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या युवराजबद्दल सांगता येतील आणि त्या गोष्टींची यादी कधीही संपणार नाही, पण आज आम्ही तुम्हाला युवराज सिंहबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी कोणालाच माहित नाही.  क्रिकेटमध्ये कित्येक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या या धडकेबाज फलंदाजाने अभिनयाच्या क्षेत्रात देखील आपली अदाकारी दाखवली आहे.

काय म्हणता? युवराजने अॅक्टर म्हणून काम केले यावर तुमचा विश्वास नाही? चला तर मग आज आम्ही तुम्हाला दाखवतो युवराजचे अभिनयी रूप!

yuvraj-singh-marathipizza02
youtube.com

आपला युवराज सिंह हा रियल लाईफ नाही तर रील लाईफ हिरो देखील आहे. युवराजने बाल कलाकार म्हणून दोन पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्या चित्रपटांची नवे आहेत- ‘मेंहदी सजना दी’ आणि ‘पुत सरदारा’ ! या दोन्ही चित्रपटामध्ये त्याने मोठ्या भूमिका वठवलेल्या नाहीत, परंतु जे काही छोटे काम त्याच्या वाट्याला आले होते ते मात्र त्याने अतिशय सुरेखपणे साकारले आहे. या खालील व्हिडियोमध्ये ८-९ वर्षच्या गोंडस लहानग्या युवराजला पाहून तुम्ही देखील म्हणालं की, ‘या पोराने बॅट हातात घेतली नसती तर हमखास बॉलीवूड मध्ये नाव कमावलं असतं.’

लहानग्या युवराजचा अभिनय येथे पहा.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?