ISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २० उपग्रह!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

ISRO नेहमीच आपल्याला आणि देशवासियांना गर्व होईल असं काम करत राहिली आहे.

मग ते आर्यभट्ट उपग्रहापासून परवाच्या मंगलयानापर्यंत.

 

header-logo-6

 

इस्रो चं प्रत्येक वेळी कौतुक होत आलंय आणि त्यांच्या कामासाठी ते होत असणारच.

देशासाठी अंतराळात संशोधन करणे ह्यासोबतच बाकीच्या मित्र देशांसाठी मदत म्हणून त्यांचे उपग्रह अंतराळात पोहोचवणे ह्यातही ISRO मागे नाही.

आजपर्यंत ISRO ने ५० मित्र देशांसाठी वेगवेगळे उपग्रह यशस्वीरीत्या launch केले आहेत.

 

mars002

 

मंगलयानाचं यश तर सर्वांना ठाऊकच आहे.

आता त्यात अजून एक यशस्वी पताका मिरवत – तब्बल २० उपग्रह ISRO ने प्रक्षेपित केली आहेत.

ह्या प्रक्षेपण मोहिमेमध्ये २० उपग्रहांचा समावेश होता. २२ जुन रोजी पार पडलेल्या ह्या मोहिमेत भारताचा एक remote sensing satellite, ‘Cartosat 2C’ आहे तर बाकीच्या १९ उपग्रहांना अंतराळ कक्षेत पोहचवण्यात आले आहेत.

ह्या उपग्रहांचे वजनानुसार micro satellite आणि nano-satellites असे दोन प्रकार पडतात.

प्रक्षेपित केलेले micro satellites ज्याचं वजन ८५ ते १३० किलो असुन nano-satellites ज्यांचं वजन ४ ते ३० किलो आहे.

एकूण २० पैकी १७ उपग्रह US(१३), Canada(२), Indonesia(१) and Germany(१) अशा परदेशी संस्थांसाठी प्रक्षेपित केले आहेत.

भारताच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि सत्यभामा विद्यापीठ, चेन्नई येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपग्रहाचा पण ह्या प्रक्षेपण मोहिमेत समावेश होता आणि त्यांचे प्रक्षेपण यशस्वीरीत्या पार पडले आहे.

 

ISRO marathipizza 001

 

Canada साठी समुद्राची देखरेख आणि संपर्कासाठी Maritime Monitoring and Messaging Microsatellite (M3MSAT) हा उपग्रह automatic identification system च्या अभ्यासासाठी साठी मदत करणार आहे.

Indonesia साठी पृथ्वी आणि चुंबकीय क्षेत्र परीक्षण करण्यासाठी LAPAN A3 हा उपग्रह.

जर्मनी साठी उच्च तापमनाच्या घटनांचे remote sensing साठी BIROS उपग्रह आणि –

US ला Satellite imaging साठी SKYSAT Gen2-1 हा उपग्रह आपण प्रक्षेपित केला आहे…!

Source

प्रिय ISRO, तुम्ही भारतासाठी जे केलं आहे त्यासाठी अख्खा देश तुमचा ऋणी राहील !

जय हिंद !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 50 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?