' मुस्लिम महिलांचा लिलाव करणाऱ्या Bulli bai अॅपचा पर्दाफाश कसा झाला? – InMarathi

मुस्लिम महिलांचा लिलाव करणाऱ्या Bulli bai अॅपचा पर्दाफाश कसा झाला?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज जितकं तंत्रज्ञान प्रगत होत आहे तितकंच ते आपल्यासाठी घातक देखील आहेत. वाढत्या तंत्रज्ञानामुळे सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड सारखे प्रकार सर्रास वाढत चालले आहेत. पोलिस कायमच नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहयला सांगतात तरीदेखील नागरिकांची फसवणूक होतच असते.

 

cyber-crime-inmarathi

 

आज सायबर क्राईम हल्ले वाढत आहेत त्यामुळे महिलांनी याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी, आज आपण अनेकजण सोशल मीडियावर स्टेट सक्रिय असतो त्यामुळे आपली माहिती, महिलांचे फोटोस याचा गैर वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आपण देखील कायम सतर्क राहायला हवे. सध्या एक प्रकरण गाजतंय ते म्हणजे बुली ऍप, नेमकं काय प्रकरण आहे चला तर मग जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काय आहे बुल्ली ऍप ?

मुस्लिम महिलांचे सौदेबाजी करणारे हे ऍप सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बुल्ली बाई ऍपमध्ये कथितरित्या मुस्लिम महिलांना टार्गेट करून त्यांना अपमानित केले जात आहे. वादाचा मुद्दा असा आहे की या ऍपवर मुस्लिम महिलांचे सोशल मीडियावरील फोटो डाउनलोड करून या ऍपवर पोस्ट केले जातात आणि त्यानंतर लोकांना मुस्लिम महिलांचा लिलाव करण्यासाठी प्रोत्सहीत केले जाते.

bulli inmarathi

 

याआधी सुद्धा असे ऍप अस्तित्वात होते?

२०२२ मध्ये आपण पदार्णपण केले आहे आणि वर्षाच्या सुरवातीलाच अशा प्रकरणाने गालबोट लागले आहे, मात्र याआधी दोन वर्षांपूर्वी अशाच एका प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी सुली ऍप डील नावाचे ऍप चर्चेत आले होते. या ऍप द्वारे मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता.

 

suli inmarathi

ऍपवर बंदी :

आज दिवसांगणिक हजारो ऍप्स तयार होत असतात. आजच्या स्मार्ट जमान्यात राहायचे असेल तर ऍप्स सोबत जगता आले पाहिजे. मात्र अशा ऍप्स हे हानिकारक आहेत. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असे सांगितले की, या ऍपच होस्टिंग केलेल्या गीटहब या वापरकर्त्यावर तातडीने बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

 

banned inmarathi

 

सायबर सेलची कारवाई :

मुंबई पोलिसांच्या सायबर सेल टीमने बुली बाय प्रकरणी बेंगळूर येथून २१ वर्षाच्या मुलाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार आल्यापासून मुंबई पोलीस याचा तपास करत होते. अटक केलेल्या व्यक्तीची आता कसून चौकशी केली जाईलच, यातून आता काही नवी माहिती मिळते का? हे काही दिवसात कळेलच.

 

Under Arrest Inmarathi

 

मध्यंतरी सलमान खान याची खिल्लीउडवणारा सेलोमोन भाई नावाचा एक गेम पुण्यातील एका कंपनीनें तयार केला होता. सलमानच्या आयुष्यातील वादग्रस्त घटनांवर तो आधारित होता, सलमानने तातडीने कोर्टात धाव घेतली आणि आपला अपमान करणाऱ्या या खेळावर बंदी आणली.

आज देशातील धार्मिक वातावरण चांगलेच तापले आहे, हिंदू मुस्लिम वाद अनेक वर्षांपासून चालू असलेला वाद संपायचे नाव घेत नाही, त्यातच मुस्लिम महिलांचा सौदा करणारे हे ऍप्स तयार होत असल्याने समाजात पुन्हा एकदा वादंग निर्माण होत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?