' विकृत बॉलिवूडचे आणखी एक उदाहरण: मृणाल ठाकूरने सांगितली विचित्र आठवण – InMarathi

विकृत बॉलिवूडचे आणखी एक उदाहरण: मृणाल ठाकूरने सांगितली विचित्र आठवण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड किंवा सितार्‍यांची झगमगती दुनिया या नावाने जनमानसात प्रसिद्ध असलेल्या हिन्दी सिंनेसृष्टीभोवती जसे झगमगते वलय आहे तसेच तिच्या रहस्यमयी काळ्या बाजूचे दाट धुके देखील आहे.

 


अनेक नवे चेहरे आपले नशीब आजमावण्यासाठी या चंदेरी दुनियेत येतात, काहींना यश मिळते तर काहींना अपयश मिळते. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की या बॉलीवूडची काळी बाजू या नवीन लोकांना सर्वात जास्त अनुभवावी लागते. त्यातून जे तरुण जातात, तग धरतात त्यांनाच हे बॉलीवूड प्रसन्न होते. असा अनुभव आलेल्यामध्ये आपल्या नागपूरची एक मराठी मुलगी पण आहे, जिने मराठी चित्रपटातून सुरवात करत हिन्दी सिनेमाला गवसणी घातली आहे.

आज ती हिन्दी चित्रपटातील आघाडीची नायिका बनली आहे. कोण आहे ही अभिनेत्री? काय आहेत तिचे अनुभव? चला जाणून घेऊ.

१ ऑगस्ट १९९२ रोजी नागपुर मध्ये जन्मलेली मृणाल प्रामुख्याने मराठी, हिंदी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. तिने स्टारप्लस वरील ‘खामोशियां ‘ मालिकेमध्ये भूमिका करून अभिनयाची सुरूवात केली. त्यानंतर ‘ हर युग मे आयेगा एक- अर्जुन’, ‘कुमकुम भाग्य’ आदि हिन्दी मालिकांमध्ये अभिनय केला. त्याच बरोबर ‘रंगकर्मी, हॅलो नंदन, सुराज्य, विटी-दांडू’ या मराठी चित्रपटात देखील अभिनय केला. ‘लव सोनिया’ या मानवी तस्करीवर आधारित चित्रपटातील अभिनयसाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले. सुपर ३०, बाटला हाऊस, तूफान या चित्रपटठी ती झळकली. हा तिचा प्रगतीचा आलेख स्वप्नवत आहे.

 

mrunal im

 

एखाद्याला तिचे हे यश पाहून हेवा ही वाटेल पण याच्या पायाशी असलेले काले सत्य आणि आजकाल प्रसारमाध्यमातून समोर येणारी बॉलीवूडची काळी बाजू देखील आहे.

मृणाल सांगते, बॉलीवूडमध्ये नवीन असताना तिला सेटवर अतिशय निकृष्ट दर्जाची आणि हीन वागणूक दिली जात असे. जर तुमचा कोणी गॉडफादर नसेल तर तुम्हाला कस्पटासमान वागवले जाते. तुमचा आत्मसन्मान वगैरे गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतात किंवा विसराव्या लागतात.आपल्या सुरवातीच्या काळात अनेक दिग्दर्शक, सहकलाकार, कास्टिंग काऊच यांच्याकडून देण्यात आलेली हीन दर्जाची वागणूक यांबाबतही तिने धक्कादायक खुलासा केला.

यामध्ये अनेकदा दिलेल्या वेळेत न भेटणे, सेटवर वावरताना सतत टोमणे मारणे, नवख्या कलाकारांना तासनतास ताटकळत उभे ठेवणे या आणि यापेक्षाही अनेक भयावह प्रसंगांचा सामना केल्याचे ती सांगते.

 

mrunal thakur im

मृणाल तिला मिळणार्‍या तेव्हाच्या वागणुकीमुळे इतकी अस्वस्थ होत असे की घरी आल्यानंतर ती रोज रडत असे. बरेचदा चित्रपटसृष्टीतील काम थांबवण्याबद्दल तिने आपल्या आईवडिलांकडे हट्ट देखील केला होता,पण त्यांनी ठाम रहात तिला समजावले आणि तिला आधार दिला, प्रोत्साहन दिले.

गॉडफादर नसलेल्या कलाकाराला या क्षेत्रात मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीचा अनुभव मृणालसह इतरही अनेक कलाकारांना आला. काहींनी तो मनमोकळेपणाने व्यक्त केला तर काहींनी बॉलिवूड बुलीजना घाबरून मौन बाळगले.

त्याचीच परिणीती मृणाल ने दिलेल्या यशस्वी चित्रपटांमध्ये झाली. आता देखील ही गुणी अभिनेत्री शहीद कपूर सोबत ‘जर्सी’ या क्रीडापटात आणि आंखमिचौली, पिप्पा, थडम च हिन्दी रिमेक अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकेल.

 

mrunal shahid inmarathi

 

कास्टिंग काऊच, पर्सेंटेज, बॉलिवूडचा लहरी अनिश्चितपणा या सार्‍याशी यशस्वी दोन हात करत ही ‘जर्सी गर्ल’ दमदार वाटचाल करत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?