' “टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन” मधला फरक समजून घ्या… – InMarathi

“टर्मिनस, सेंट्रल, जंक्शन आणि स्टेशन” मधला फरक समजून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय रेल्वे म्हणजे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क होय. आपल्या भारत सरकारचे रेल्वे मंत्रिमंडळ अतिशय प्रभावीपणे हे अवाढव्य काम सांभाळते असून देशातील रेल्वेच्या वाहतुकीसाठी ते जबाबदार आहे.

भारतीय रेल्वे अंतर्गत ९२०८१ किलोमीटर रेल्वे रूळ असून ते ६६६८७ किलोमीटरचे अंतर व्यापतात. आपल्या भारतीय रेल्वेने जवळपास २२ दक्षलक्ष प्रवासी दरोरोज प्रवास करतात.

तर असा हा प्रवास सुखकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने ७२१६ स्थानके भारताच्या वेगवेगळ्या भागात तयार केली आहेत. त्यांची नावेही वेगवेगळी आहेत.

काहींचे नाव जंक्शन, काहींचे टर्मिनस तर काहींचे सेंट्रल. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल या तिन्ही प्रकारच्या रेल्वे स्थानकांमध्ये तुम्ही कधीही विचार केला नसेल एवढा फरक आहे.

चला जाणून घेऊया हा फरक :

 

टर्मिनस

 

Chatrapati_Shivaji_Terminal-InMarathi

 

ज्या स्थानकाला टर्मिनस/टर्मिनल म्हटले जाते, त्या स्थानकात रेल्वे ज्या बाजूने आत येते त्याच बाजूने बाहेर जाते. कारण ह्या स्थानकातील रूळ एका बाजूला संपतात, म्हणून रेल्वे एकाच बाजूने जाते आणि येते.

उदारणार्थ:

छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST)
लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)

 

सेंट्रल

mumbai-central-marathipiza
सेंट्रल स्थानक हे शहरातील खूप व्यस्त आणि महत्त्वाचे स्थानक असते, या स्थानकावर खूप साऱ्या ट्रेन येत असतात आणि जात असतात. ही स्थानके बहुतांश करून जुनी असतात. भारतात केवळ पाच सेंट्रल स्थानके आहेत.

उदाहरणार्थ :

मुंबई सेंट्रल (BCT)
चेन्नई सेंट्रल (MAS)
त्रिवेंद्रम सेंट्रल (TVC)
मंगलोर सेंट्रल (MQC)
कानपूर सेंट्रल (CNB)

जंक्शन

vijaywada-junction-marathipizza
panoramio.com

ज्या स्थानकात कमीत कमी ३ रेल्वे मार्ग आत येतात आणि बाहेर जातात, अश्या स्थानकाला जंक्शन म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक रेल्वे जाण्यासाठी-येण्यासाठी कमीतकमी २ मार्गांचा वापर करते.

उदाहरणार्थ:

मथुरा जंक्शन (७ मार्ग)
सालेम जंक्शन (६ मार्ग)
विजयवाडा जंक्शन (५ मार्ग)
बरेअली जंक्शन (५ मार्ग)

 

स्थानक

Dombivli station-marathipizza
hauntingindia.blogspot.in

स्थानक म्हणजे एक असे ठिकाण जेथे रेल्वे प्रवाश्यांना आणि वस्तूंना चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी येते, काहीवेळ थांबते आणि निघून जाते.

नोट :

चेन्नई सेंट्रलला ही टर्मिनस म्हटले जाते पण हे ही भारतामधील एक जुने स्थानक आहे, त्यामुळे याला सेंट्रल असे नाव पुढे चालू ठेवण्यात आले.

आहे की नाही रंजक माहिती, अहो मग शेअर करा आणि इतरांनाही कळवा!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?