' ‘बूस्टर डोस’ डोस घ्यावा का? नोंदणी कशी करावी? वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं – InMarathi

‘बूस्टर डोस’ डोस घ्यावा का? नोंदणी कशी करावी? वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली दोन वर्ष सगळं जग कोविड नावाच्या शत्रूशी मुकाबला करत आहे. सरत्या वर्षानं प्रतिबंधक लसीच्या रुपानं या शत्रूशी मुकाबला करायला एक अस्त्र दिलं आणि संकटात सापडलेल्या जगानं थोडा मोकळा श्वास घेतला. मात्र आता ओमायक्रॉनच्या नव्या अवताराने भिती वाढवलीय.

 

omicrone virus inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

एव्हाना अनेकांचे पहिले डोस घेऊन झालेले आहेत आणि आता बुस्टर डोसचे वेध लागलेले आहेत. वॅक्सिन हे प्रभावी शत्र असतानाही अजूनही अनेकांच्या मनात वॅक्सिनबाबत गैरसमज, प्रश्नचिन्हं असलेली दिसतात.

२०२० च्या अखेरीस कोविडसमोर ढाल बनून उभी रहाणारी लस शोधली गेली आणि मास्क, सॅनिटायझरसोबत लस ही तिसरी अत्यावश्यक गोष्ट सामिल झाली. या वर्षभरात भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलं गेलं.

आता बुस्टर डोस आणि १२ वर्षावरील मुलांच्या लसीकरणाची वेळ आलेली आहे. भारतात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना प्राधान्य दिलं गेलं आणि याचे दोन डोस निर्धारीत केले गेले.

 

covid vaccine inmarathi

 

रोगाशी मुकाबला करण्यासाठी अधिक कुमक शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेला पुरविणं हे मुख्य डोसनंतर बुस्टर डोस घेण्याचं कारण हे असतं. त्यामुळे बुस्टर घ्यावा की नाही हा प्रश्नच उरत नाही. बुस्टर घ्यायलाच हवा कारण त्याचा फायदा होणार आहे.

बुस्टर का घ्यावा? वाचा, तज्ञ काय म्हणतात?

लस घेतल्यानंतर काही काळाने लसीचा प्रभाव कमी होत जातो आणि म्हणूनच बुस्टर डोसचं महत्व जास्त आहे. दोन्ही डोस घेतले असतील तर दुसऱ्या डोसनंतर सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतर लसीचा प्रभाव कमी होतो. शरीरातील अन्टिबॉडीज कमी होण्यास सुरुवात होते. अशावेळी पुन्हा नव्याने प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी बुस्टरला पर्याय नाही.

ही लस बंधनकारक नसली तरी प्रत्येकाने स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी बुस्टर डोस घ्यावा अशी विनंती तज्ञ, डॉक्टर्स करत आहेत.

 

booster im

 

अठरा वर्षावरील सर्वांनी बुस्टर डोस घेणं जरूरी आहे. भारतात पुढच्या डोसची तयारी सुरू झालेली असली तरिही सध्या हा बुस्टर डोस ६० वर्षावरील व्यक्ती, फन्टलाईन वर्कर्स आणि कोमॉर्बिड (सहव्याधी रुग्ण) यांनीच घ्यायचा आहे.

या डोसला कोविड १९ प्रिकॉशन डोस म्हणलं गेलं आहे. १० जानेवारी २०११ पासून देशभरात या प्रिकॉशनरी डोसची सुरवात होणार आहे.

हा बुस्टर सध्या कोणी घ्यायचा आहे?

आरोग्य कर्मचारी आणि फंटलाईन वर्कर्स, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक ज्यांना मधुमेह, ह्रदविकार अशा इतर काही व्याधी आहेत. कर्करोग किंवा इतर आजार असणारे अथवा होऊन गेलेले रुग्ण/ व्यक्ती.

ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी व्यक्तींना हा डोस घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

 

vaccine inmarathi

 

कोविड १९- प्रिकॉशन डोससाठी कोणती कागपत्रं गरजेची आहेत?

ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आरोग्य प्रमाणपत्र दाखविणं गरजेचं आहे, या प्रमाणपत्रात त्यांना जी व्याधी आहे त्याचा उल्लेख असणं गरजेचं आहे.

नोंदणीकृत आरोग्य अधिकार्‍याचं ( RMO) तसं प्रमाणपत्र गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र स्कॅन करून कोविन पोर्टलवर अपलोड करायचं आहे अथवा लसीकरण केंद्रावर दाखवावं लागेल.

दुसरा डोस आणि प्रिकॉशनरी डोसमधे किती अंतर असायला हवं?

पीटीआय मधील रिपोर्टनुसार दुसरा डोस आणि तिसरा डोस ज्याला प्रिकॉशनरी डोस असं म्हणलं जाणार आहे, या दरम्यान ९ ते १२ महिन्यांचं अंतर असणं आवश्यक आहे.

लसीसाठी नोंदणी कशी करावी?

राष्ट्रीय आरोग्य संथा (NHA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस शर्मा जे भारत सरकारची कोविन पोर्टलची जबाबदारी सांभाळतात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रिकॉशनरी डोससाठी देखिल पूर्वीप्रमाणेच (४५ वर्षावरील व्यक्तिंचं लसीकरण नोंदणी ज्याप्रकारे झाली त्याचप्रकारे) नोंदणी करावयाची आहे. यात पूर्वीप्रमाणेच कोमॉर्बिड वर्गवारीदेखिल आहे.

 

cowin im

 

अर्थात याबाबत अधिक सर्वेक्षण, चाचण्या सुरु असल्याने दररोज नवी माहिती समोर येत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नोंदणी करण्यापुर्वी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती तपासावी असेही आवाहन करण्यात येत आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार भारतात साधारण १३ कोटीहून अधिक ज्येष्ठांना या प्रिकॉशनरी डोसचा लाभ घेता येणार आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?