' कॅन्सर उपचारांमध्ये जीवघेण्या केमोथेरपीची आता गरज नाही, संशोधकांचा दावा

कॅन्सर उपचारांमध्ये जीवघेण्या केमोथेरपीची आता गरज नाही, संशोधकांचा दावा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कॅन्सर म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. हा एक जीवघेणा आजार आहे, हे मुख्य कारण; मात्र याव्यतिरिक्त कॅन्सरच्या उपचारांदरम्यान होणारी अवस्था सुद्धा वाईट असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

केमोथेरपीसारखा एकच आणि भयंकर उपचार कॅन्सर या दुर्धर आजारावर उपलब्ध आहे. या उपचारादरम्यान केस गळणं आणि इतर अनेक परिणाम शरीरावर होत असतात. कॅन्सरमुळे येणाऱ्या मृत्यूपेक्षाही रुग्ण या एकूण प्रवासाला अधिक घाबरतो. संपूर्ण बरं होण्याची खात्री नाही. तेदेखील जमून आलंच, तरीही त्यानंतरचं आयुष्य सुरळीत आणि कमी त्रासाचं असेल याचीही शाश्वती नाही.

 

cancer inmarathi 1

 

कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं, तर केमोसारख्या अतिशय त्रासदायक उपचारांचा सामना पुन्हा करावा लागणार ही भीती मनात कायमच राहण्याची शक्यता. या सगळ्या गोष्टींच त्रास आता कमी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शास्त्रद्यांनी केलेल्या दाव्यानुसार, आता कॅन्सरवरील उपचारांसाठी केमोथेरपीसारख्या वेदनादायक उपचारांची गरज नाही. एक नवा पर्याय आता शोधून काढण्यात आला आहे. आजच्या लेखातून याबद्दलच माहिती घेऊयात.

अमेरिका आणि भारताने एकत्र येऊन लावलाय शोध…

अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकमधील ११ शास्त्रज्ञ आणि भारतातील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराजमधील अलाहाबाद विद्यापीठाची टीम या शास्त्रद्यांनी कॅन्सरवर नवीन उपचार पद्धती शोधून काढली असल्याचा दावा केला आहे.

अलाहाबाद विद्यापीठातील बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर मुनीश पांडे हे डॉ. यांग ली यांच्या नेतृत्वखाली असलेल्या या टीममधील एक महत्त्वाचे सदस्य आहेत.

अमेरिकेत सुरु असलेल्या या प्रयोगातून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार यापुढे कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी केमोथेरपीसारख्या अत्यंत त्रासदायक पद्धतीचा अवलंब करावा लागणार नाही. कुठल्याही प्रकारच्या रेडिएशनची गरजही भासणार नाही. परिणामी, यामुळे शरीरावावर होणारे दुष्परिणाम कमी होतील. कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी ही खूपच महत्त्वाची बाबा ठरणार आहे.

अमेरिकेतील या प्रयोगातून असं दिसतंय की…

 

Cancer symptoms feature Image

 

जवळपास वर्षभरापासून अमेरिकेत हा प्रयोग यशस्वीपणे सुरु आहे.सध्या तरी हा प्रयोग उंदरांवर करण्यात येत असून, मनुष्य देहावर अजूनही कोणताही प्रयोग करण्यात आलेला नाही.. मात्र एक वर्षानंतर हाती आलेल्या निष्कर्षांनुसार लवकरच मानवी देहावर सुद्धा या उपचाराचा प्रयोग करण्यात यावा यासाठी हे शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

या उपचारांचा प्रयोग मनुष्यावर सुरु झाल्यावर यातून येणारे निष्कर्ष अधिक महत्त्वपूर्ण ठरतील यात शंकाच नाही.

विपरीत परिणाम थांबणार…

 

medical inmarathi1

 

केमोथेरपी हा अत्यंत क्लेशदायक उपचार आहे. यामुळे माणूस कॅन्सरमधून बरा होत असला, तरी इतर अनेक त्रास मागे लागतात असं म्हणायला हवं.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरचा ट्युमर नष्ट करत असताना, केवळ कॅन्सरच्या पेशींच नव्हे तर इतर पेशींना सुद्धा हानी पोहचते. काहीवेळा या पेशी सुद्धा मृत होतात. शरीरासाठी हे फारसे लाभदायक ठरत नाही. शरीरावर केमोथेरपी आणि रेडिएशनचा विपरीत परिणाम होत असतो.

मिथाईलग्लॉक्सलच्या वापराने मात्र हा त्रास कमी होणार आहे. असा दावा या शास्त्रज्ञांकडूनच करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये रेडिएशनचा वापर करण्याची गरज पडणार नाही. म्हणजेच या रेडिएशनचा परिणाम शरीरावर होण्याची शक्यताच या ट्रीटमेंटमधून काढून टाकण्यात आली आहे.

या नव्या उपचारांमुळे कॅन्सर पेशंट वाचण्याची, त्याचे आयुष्य वाढण्याची शक्यता अधिक असेल यात शंका नसल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?