' करोडो भारतीयांच्या घरातल्या भिंतीवर हमखास दिसणाऱ्या ‘कालनिर्णय’चा इतिहास! – InMarathi

करोडो भारतीयांच्या घरातल्या भिंतीवर हमखास दिसणाऱ्या ‘कालनिर्णय’चा इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२१ वर्ष संपायला अवघे काहीच दिवस उरले आहेत. आपल्या वर्तमानकाळातील आठवणी भूतकाळाच्या कप्प्यात सरकत जातात. याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक नवीन वर्षात बदलणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भिंतीवर असलेलं कॅलेंडर.

कॅलेंडरचा वापर प्रामुख्याने सण-उत्सव, जयंती-पुण्यतिथी आणि राशी भविष्य बघण्यासाठी केला जातो. अशाच एका कॅलेंडर विषयी आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या स्थापनेची ५० वर्ष पूर्ण केली आहे आणि या कॅलेंडरचे नाव आहे ‘कालनिर्णय’.

 

kalnirnay IM

 

२०२२ मध्ये या कॅलेंडरला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. १९७३ मध्ये जयंतराव साळगांवकर यांनी या कॅलेंडरची सुरुवात केली होती. आज हे कॅलेंडर सर्वात मोठे प्रकाशन कॅलेंडर असले तरी या कॅलेंडरचे सुरूवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जेव्हा जयंतराव हे कॅलेंडर सुरु करणार होते, तेव्हा त्यांनी या कॅलेंडर मध्ये पंचांग समाविष्ट करण्याचा बेत केला होता, परंतु जेव्हा त्यांनी त्यांच्या या कल्पनेविषयी लोकांना सांगितले तेव्हा सगळ्यांनीच त्यांची खिल्ली उडवली होती.

जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला होता, त्यावेळी कॅलेंडर हे विनामूल्य सहज उपलब्ध असायचे. परंतु तरीदेखील जयंतराव यांनी ही जोखिम घेतली आणि कॅलेंडर छापायला आणि विकायला सुरूवात केली.

दहावी पास असलेल्या जयंतराव यांनी त्यांच्याकडे असलेल्या ज्योतिषशास्त्राचे ज्ञान आणि छपाई कौशल्याच्या जोरावर या व्यावसायामध्ये २६०० रुपये गुंतवले होते.

 

jayantrao salgaonkar IM

 

१९७३ मध्ये कालनिर्णय दिनदर्शिकेची प्रथम आवृत्ती घेऊन ते अनेक दुकानदारांकडे गेले, परंतु एकाही दुकानदाराने त्यांना एडवांस पैसे दिले नाही. परंतु जयंतराव तरी कुठे थांबणार होते, त्यांनी पण ही अट मान्य करून घेतली.

जर आज आपण २०२१ मध्ये याचा विचार केला तर एकूण १.५ कोटी पेक्षा जास्त घरांमध्ये कालनिर्णयचे कॅलेंडर आपल्याला दिसून येईल. तसेच हे कॅलेंडर भारताच्या एकूण ७ भाषांमध्ये उपलब्ध आहे त्या म्हणजे हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमीळ आणि इंग्रजी.

आपल्या मनात एक विचार नक्की येत असेल की, कालनिर्णय मध्ये नेमके असे काय आहे की, ते एवढ्या कमी वेळात इतके लोकप्रिय झाले. तर त्यामागचे कारण म्हणजे एकाच कॅलेंडरमध्ये असलेली विविध प्रकारची माहिती.

जसे की पंचांग, सणवार, राशी-भविष्य, तिथी नक्षत्रे, शास्त्रार्थ इत्यादी विषयांप्रमाणेच या कॅलेंडरमध्ये अनेक विषयांवर आधारित लेख आणि माहिती आढळून येतात.

समाजातील वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहकवर्ग आणि त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन या कॅलेंडरच्या अनेक वेगवेगळ्या आवृत्त्या प्रकाशित करण्यात येतात. जसे की नोटपॅड, श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, स्वादिष्ट, आरोग्य, थ्री इन वन क्युबिकल, मोठे व छोटे ऑफिस, मीडिअम, मायक्रो, पॉकेट डायरी, कार, डेस्क, वर्षचंद्रिका, विकली नोट प्लॅनर, इयर प्लॅनर अशा विविध प्रकारच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या जातात.

kalnirnay product IM

 

याचबरोबर कालनिर्णय हे देशामधील पहिले असे कॅलेंडर आहे जे वेबसाईट आणि ऍपद्वारे ही उपलब्ध करून दिले आहे.

भारतीय समाजात कुठलेही एखादे नवीन कार्य सुरु करायचे असेल, एखादी गाडी विकत घ्यायची असेल किंवा घराचे किंवा दुकानाचे वास्तु करायचे असेल तर, भारतीय लोक सर्वप्रथम एकच गोष्ट बघतात ते म्हणजे शुभ मुहूर्त आणि याच मुद्द्यावर कालनिर्णयने सगळ्यात जास्त भर दिला आहे.

त्यामुळे तुम्ही कालनिर्णय चे कुठलेही कॅलेंडर बघा त्यामध्ये तुम्हाला शुभ मुहूर्तांचे अगदी बारीक-बारीक तपशील दिलेले दिसतात.

जयंतराव यांच्यासाठी कॅलेंडर सुरु करणे आव्हानात्मक तर होतेच, पण त्याचप्रमाणे या इंटरनेटच्या युगामध्ये या कॅलेंडरला टिकवून ठेवणे पुढच्या पिढीसाठी देखील तेवढेच आव्हानात्मक होते.

साळगांवकर कुटूंबीयांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कालनिर्णयची वेबसाईट आणि ऍप च्या माध्यमातून नवीन ओळख निर्माण केली. मागे एका मुलाखतीमध्ये जयंतराव यांनी सांगितले होते की, ७० च्या दशकामध्ये राज्यात टाइपोग्राफरची नियुक्ती करणारी आणि कलरिंग स्कॅनर घेणारी आमची पहिली कंपनी होती.

 

kalnirnay printing IM

 

उत्तम दर्जाचे कागद बनवण्यासाठी त्यांनी काही खास प्रकारच्या मशीनरी बनवून घेतल्या होत्या.

कालनिर्णयची सुरुवात ही फक्त पाच लोकांना घेऊन झाली होती, ज्यामध्ये डिजाइनिंग, प्रिंटिंग आणि वितरण ही कामे करणारी माणसं होती. कालनिर्णय हे ग्रेगोरियन आणि भारतीय कॅलेंडरचे एकत्रित स्वरूप आहे.

सुरूवातीच्या दिवसांमध्ये कॅलेंडरची विक्री खुप कमी होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या काही पत्रकार मित्रांच्या मदतीने आणि काही त्यांच्या व्यवसायिकांच्या मदतीने कॅलेंडरचं मार्केटिंग सुरू केलं.

 

kalnirnay marketing IM

 

सुरूवातीच्या दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे १९७४ मध्ये या कॅलेंडरच्या फक्त १५००० आवृत्त्या विकल्या गेल्या होत्या, परंतु आता दरवर्षी दीड कोटीहून अधिक आवृत्त्या विकल्या जातात. हे कॅलेंडर तैयार करण्यासाठी १५० लोकांची एक टीम सतत संशोधन करत असते.

जयंतराव यांच्या निधनानंतर सध्याच्या घडीला साळगांवकर कुटुंबामध्ये जयराज, शक्ती, जयेंद्र आणि समर्थ ही लोक ‘कालनिर्णय’ चे कामकाज बघत आहेत.

 

jayraj salgaonkar IM

 

अनेक नव-नवीन कल्पना वापरून यांच्या महसुलाचा वार्षिक वाढीचा दर १०-१५ टक्के आहे. तसेच कोरोना महामारीच्या वेळी लॉकडाऊन असूनही यांनी ५० कोटी रूपयांची कमाई केली होती.

अशा या आपल्या मायमराठीमधून सुरु झालेल्या कॅलेंडरला पुढच्या वर्षी ५० वर्ष पूर्ण होणार आहे. त्याबद्दल सळगांवकर कुटुंबाचे इनमराठी परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?