' निष्काळजीपणा आणि एका साध्या चुकीची गंभीर शिक्षा भोगतोय ‘बचपन का प्यार’ चा सहदेव – InMarathi

निष्काळजीपणा आणि एका साध्या चुकीची गंभीर शिक्षा भोगतोय ‘बचपन का प्यार’ चा सहदेव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही महिन्यांपुर्वी सोशल मिडीयावर ‘बचपन का प्यार’ नावाचं एक वादळ घोंगावत होतं. प्रचंड व्हायरल झालेल्या या गाण्यावर रील्स करण्याच्या मोह भल्याभल्यांना आवरता आला नाही. इन्स्टाग्रामवर तर या गाण्याने अक्षरशः थैमान घातलं होतं.

नेटकऱ्यांना या गाण्याचे शब्द, त्याची चाल जितकी आवडली, त्यापेक्षाही जास्त हे गाणं गाणारा निरागस सहदेव भावला. चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता ठरवलेल्या सुरात ‘बचपन का प्यार मेरा भुल नही जाना रे’ ही त्याने केलेली आर्जव प्रचंड हिट ठरली. अनेकांनी गाण्यापेक्षा जास्त हा सहदेव कोण, कुठला? याचीच माहिती इंटरेनवरून गोळा केली.

 

bachpan ka pyar im

 

हा सहदेव दिर्दो इतका कमीवेळात लोकप्रिय झाला की कौतुकासह बक्षिसं, स्कॉलरशीप यांची त्यावर खैरात करण्यात आली. केवळ एका  गाण्याच्या आधाराने व्हायरल झालेला सहदेव सध्या मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

सध्या सहदेव हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंंज देत आहे. धक्का बसला ना? वरकरणी लहान वाटणाऱ्या एका गंभीर चुकीची शिक्षा तो भोगतोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नक्की काय घडलं?

मंगळवारी सहदेव आपल्या मित्रांसह बाईकवरून निघाला होता. शबरी नगरीकडे जाताना त्याच्या गाडीला अपघात झाला. मात्र यावेळी सहदेवने हेल्मेट घातले नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

sahdev im

 

सध्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

बादशहा करतोय प्रार्थना

सदहेवसह बचपन का प्यार या गाण्यात प्रसिद्ध रॅपर बादहशहानेही सूर मिसळले होतेे. त्यामुळे तेंव्हापासून बादशहा आणि सहदेव यांची घट्ट मैत्री झाली. सहदेवच्या अपघातानंतर बादशहाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

 

sahdev im

 

आपल्या ट्विटमध्ये बादशहा म्हणतो, ”मी सध्या सहदेवच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्यांना मी सर्वतोपरी मदत करणार आहे. मात्र सहदेवला आपल्या सगळ्यांच्याच प्रार्थनांची गरज आहे.” त्याच्या या ट्विटमुळेच सहदेवच्या अपघाताबाबत सर्वांना माहिती मिळाली.

सहदेवने सगळ्यांंचेच मनोरंजन केले, त्यामुळे आता सर्वांनीच त्याच्यासाठी प्रार्थना करा अशी विनंतही बादशहाने केली आहे.

प्रकृती स्थिर पण…

उपचारांना तो प्रतिसाद देत असून तब्बल ५ तासानंतर त्याला शुद्ध आली. त्यामुळे सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

तब्बेत सुधारत असली तरी डोक्याला झालेली जखम भरून निघण्यास काही कालावधी लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेल्मेट घातले असते तर…

प्रवास करताना हेल्मेट घालण्याची ताकीद वारंवार दिली जाते. मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. सहदेवने जर हेल्मेट घातले असले तर कदाचित त्याला एवढी दुखापत झाली नसती. किमान डोक्याला झालेली इजा टळली असती.

किमान या उदाहरणावरून तरी प्रत्येकाने दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर करणे किती गरजेचे आहे हे लक्षात येईल.

 

helmet im

 

सहदेवची प्रकृती लवकर बरी होवो आणि या निरागस सहदेवकडून आणखीन गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळो, ही प्रार्थना…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?