' फेअर अँड लव्हली गर्लला उद्भवला होता एक गंभीर आजार, नेमका काय आहे तो जाणून घ्या – InMarathi

फेअर अँड लव्हली गर्लला उद्भवला होता एक गंभीर आजार, नेमका काय आहे तो जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज घरात एखादी व्यक्ती जरी नुसती शिंकली तरी घरातील इतर मंडळी सावध होतात, शिंकणाऱ्या व्यक्तीवर मग भडीमार होतो तो वेगवेगळ्या काढ्यांचा, गरमपाण्याचा, वाफेचा, कोरोनामुळे आणि आता ओमिक्रोनमुळे सगळेच धास्तावले आहेत. आज अनेक कटुंबात कोरोनामुळे घरातील कमावती मंडळी गेली त्यामुळे त्या अशा कुटुंबांचा आधारच हरवला आहे.

कोरोनातून लोक बाहेर येत नाहीत तोवर ओमिक्रोनमुळे लोक चिंतेत पडले आहेत. एकीकडे लग्न होऊ घातलेली जोडपी पटापट आपले लग्न उरकून टाकत आहेत तर दुसरीकडे सरकार खबरदारी घेण्यास सांगत आहे. आज भारतात जरी १०० कोटीच्या वर लसीचे डोस लोकांनी घेतले असले तरी अर्ध्या अधिक मंडळींचे दोन्ही डोस बाकी आहेत.

 

corona vaccination center inmarathi
theguardian.com

कोरोना सारखा साथीचा आजार आला तेव्हा अनेक तज्ञ मंडळींनी यावर संशोधन केले आणि त्यांनी असे सांगितले की या महामारीवर एकच उपाय म्हणजे लसीकरण, या साथीच्या आजरावर निदान लसीकरण हा एक उपाय तरी आहे मात्र असे काहींजगात रोग आहेत ज्यावर आजतागायत औषध निर्माण करता आले नाही.

नुकतंच बॉलीवूडची अभिनेत्री यामी गौतम हिने आपल्याला झालेल्या आजराची माहिती काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाऊंटवर टाकली होती. तिला केराटोसिस पिलारिस हा आजार अनेक वर्षांपासून होता. हा आजार त्वचेशी निगडित आहे, चला तर मग जाणून घेऊयात नेमका काय आहे हा आजार…

 

yami inmarathi
pinterest.com

 

काय आहे नेमका हा आजार?

हा आजार प्रामुख्याने कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. हा सामान्यतः हातावर चेहऱ्यावर, नितंबावर होतो. शरीराच्या ज्या भागात हा आजार होतो तिथे लाल किंवा गुलाबी डाग निर्माण होतात. या परिस्थितून जाणारी लोक प्रामुख्याने मेकअपमधील कन्सीलर वापरतात, जेणेकरून असे डाग दिसणार नाहीत. त्वचा कोरडी पडते.

 

ker inmarathi

 

कारणे :

हा आजार प्रामुख्याने त्वचेवरील केसांमध्ये केरोटीनेचे प्रमाण जास्त झाल्याने उदभवतो. जे त्वचेच्या छिद्रांना बंद करते त्यामुळे त्वचेच्या आणखीन समस्या निर्माण होतात.

 

ker inmarathi 1

 

लक्षणे :

त्वचेची अशी स्थिती असलेल्या लोकांना सामन्यतः हातावर, मांड्यांवर, गाल किंवा नितंबावर पुरळ येतात मात्र त्यामुळे कोणत्या वेदना होत नाहीत. मात्र या भागातील त्वचा कोरडी आणि खडबडीत बनते. बदलत्या हवामानानुसार याची स्थिती सुद्धा बिघडते.

 

dry skin inmarathi

 

उपचार :

तज्ञांच्या मते ही एक सामान्य त्वचेची स्थिती आहे. यावर कोणतीच अशी ठोस उपाययोजना नाही. हा रोग नैसर्गिकरित्या आणि वेळेनुसार कमी होतो.

वातावरणातील बदलांमुळे केवळ शरीराच्या आतच नव्हे तर बाहेरील भागात सुद्धा अनेक आजार उदभवत आहेत. प्रामुख्याने ज्यांची त्वचा नाजूक आहे किंवा ज्यांना ऍलर्जी नामक प्रकार होतो त्यांनी वेळीच काळजी घ्यायला हवी.

 

rain 22 inmarathi

आज बॉलीवूडमधील अनेक सेलेब्रेटींना कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केली आहे आणि पुन्हा एकदा तयच जोशात कामाला सुद्धा लागले आहेत. यामीला झालेला हा आजार तितकासा गंभीर नसला तरी तिच्यासारख्या नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या अभिनेत्रीला आपल्या भावी करियरसाठी काळजी घ्यायलाच हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?