' रियल लाईफ टारझन, असामान्य आयुष्य जगणाऱ्या या माणसाबद्दल जाणून घ्या – InMarathi

रियल लाईफ टारझन, असामान्य आयुष्य जगणाऱ्या या माणसाबद्दल जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहानपणी तुम्ही टारझन किंवा मोगली ही कार्टून्स बघितली असतील, संध्याकाळ झाली आणि ‘टारझन’चा चित्रपट टीव्हीवर लागला, की लहान मुलंच काय, मोठी माणसं सुद्धा टीव्हीसमोरून हलत नाहीत.

जंगलात छोटीशी चड्डी घालून प्राण्यांमध्ये बागडणाऱ्या टारझनला बघितलं की फार कौतुक वाटतं. कसं बरं याला प्राण्यांमध्ये खेळणं जमत असेल? आपण तर हे प्राणी केवळ फोटोतच पाहिले असतात. त्यांच्याविषयी ऐकूनच एवढी भीती वाटते, की त्यांच्या जवळ जाणं तर दूरचीच गोष्ट.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण जर आम्ही सांगितलं, की असा एक माणूस आहे, जो वाघांसोबत खेळतो, अस्वलांची पापी घेतो, माकडांसोबत झाडांवर चढतो, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? तुम्ही म्हणाल ही काय चेष्टा आहे, पण ही चेष्टा नाही, तर सत्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खऱ्याखुऱ्या टारझनबद्दल सांगणार आहोत.

 

kody antle inmarathi1

 

हा माणूस वाघांसोबत खेळतो.. माकडचाळे करतो, वाघांशी शर्यत लावतो.. आणि याचं नाव आहे ‘kody-antle’. लहानपणापासून प्राण्यांसोबत वाढल्यामुळे या प्राण्यांशी खेळणं त्याला अजिबातच अवघड जात नाही.

kody antle सोशलमिडीयावर खूपच सक्रिय आहे. इंस्टाग्राम आणि टिक-टॉकवर त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याचे वडील Doc Antle हे वाघांचे ट्रेनर आहेत. आपण ऑनलाईन सिरीजमध्ये जे वाघ किंवा प्राणी बघतो, त्यांना ट्रेन करण्याचं काम ते करतात, पण त्यांचा मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त फेमस आहे.

 

 

Myrtle Beach Safari आणि The Institute for Greatly Endangered and Rare Species (or T.I.G.E.R.S.) या संस्था त्याच्या वडिलांनी चालू केल्या. kody-antle लहानपणापासून वाघांच्या पिंजऱ्यातच वाढलाय, त्यामुळे वाघ – माकडं हे जणू काही त्याचे मित्र आहेत.

 

kody antle inmarathi

 

तुम्ही त्याच्या इंस्टाग्रामवर किंवा टिक- टॉक हॅन्डलवर पाहिलंत, तर वाघांशी खेळताना, त्यांचे मुके घेताना तुम्हाला अनेक व्हिडीओज दिसतील. वाघांशी शर्यती लावताना, त्यांच्यासोबाबत पकडापकडी खेळताना, त्यांना कुरवाळताना kody दिसतो.

तुम्ही प्राण्यांवर मनापासून प्रेम केलंत, तर प्राणीही तुम्हाला जीव लावतात हेच यातून दिसतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?